Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सीताराम घनदाट यांचा असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपामध्ये प्रवेश
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

सीताराम घनदाट यांचा असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपामध्ये प्रवेश

admin
Last updated: 2025/03/18 at 7:33 PM
admin
Share
3 Min Read
SHARE

मुंबई, 18 मार्च (हिं.स.)। गंगाखेडचे माजी आमदार सीताराम घनदाट यांनी मंगळवारी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला. प्रदेश कार्यालयात झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते आ. बबनराव लोणीकर, प्रदेश सरचिटणीस संजय केनेकर, प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी, रामप्रसाद बोर्डीकर, राहुल लोणीकर, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी उपस्थित होते. श्री. चव्हाण यांनी सर्वांचे भाजपामध्ये स्वागत केले.

श्री. घनदाट यांच्या बरोबर परभणी जिल्ह्यातील जिल्हा परिषदेचे अनेक माजी सदस्य, माजी नगराध्यक्ष, बाजार समिती सदस्य, नगरसेवक, सरपंचांसह अनेक कार्यकर्त्यांनी यावेळी भाजपामध्ये प्रवेश केला. राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर, आ. बबनराव लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रवेश झाले.

यावेळी श्री. रविंद्र चव्हाण म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र घडणार याचा विश्वास वाटल्याने श्री. घनदाट यांच्यासह अनेकांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. अभ्यूदय बँकेच्या माध्यमातून सहकार क्षेत्रात मोठं काम करणारे श्री. घनदाट यांच्या भाजपा प्रवेशामुळे परभणीमध्ये पक्ष संघटनेला बळ मिळणार आहे.

श्री. घनदाट यांच्यासोबत शरद पवार गटाचे परभणी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रसाद बुधवंत, ‘वंचित’ आघाडीचे नेते सुरेश फड, अनंत देशमुख, सरपंच गजानन कांगणे, रमेश गिते यांच्यासह अनेकांनी भाजपामध्ये प्रवेश केला. परतूर (मंठा) नगराध्यक्ष वैजनाथ बोराडे, मंठा माजी नगराध्यक्ष नितीन राठोड, मंठा नगरसेवक विकास सूर्यवंशी यांच्यासह अन्य 10 नगरसेवकांनी भाजपा प्रवेश केला.

भाजपामध्ये प्रवेश केलेल्या पालम तालुक्यातील पदाधिका-यांमध्ये परभणीचे माजी जिल्हा परिषद सदस्य सदाशिवअप्पा ढेले, जयसिंगराव शिंदे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष गोपीनाथराव तुडमे, नगरसेवक कैलास रुद्रवार, गौतम हत्तीआंबीरे, पंचायत समिती माजी सभापती आत्माराम सोडनर, सुभाषराव धुळगुंडे पेंडु, पेंडु खुर्दे सरपंच देवबा धुळगुंडे, पेंडु बु. सरपंच दत्तराव धुळगुंडे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

*रत्नागिरी तालुक्यात उबाठा शिवसेनेच्या पदाधिका-यांचा भाजपा प्रवेश -*

भाजपामध्ये प्रवेश केलेल्या रत्नागिरी तालुक्यातील उबाठा शिवसेनेच्या पदाधिका-यांमध्ये शिवसेना उप तालुका प्रमुख राकेश साळवी, कार्यालय प्रमुख संदीप सुर्वे, शाखाप्रमुख दीपक गावडे व दत्ता घडशी, उपविभाग प्रमुख (नाचणे) दिनेश रेमुलकर, सचिव दीपक सुकल यांच्यासह अनेकांचा समावेश आहे.

*छत्रपती संभाजीनगर येथील शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिका-यांचाही प्रवेश –*

छ. संभाजीनगर येथील शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या पदाधिका-यांनीही याच कार्यक्रमात भाजपामध्ये प्रवेश केला. इतर मागास बहुजन कल्याण मंत्री, दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांच्या नेतृत्वाखाली हे पक्षप्रवेश झाले. यावेळी आ. निरंजन डावखरे आणि जिल्हाध्यक्ष शिरीष बोराळकर उपस्थित होते. भाजपामध्ये प्रवेश केलेल्या पदाधिका-यांमध्ये शहर जिल्हा कार्याध्यक्ष अभिषेक देशमुख, विजय निकाळजे, शहर सचिव अंकुश जाधव, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश पाटील, मध्य विधानसभा अध्यक्ष फिरोज कुरेशी, अल्पसंख्याक विभाग शहर अध्यक्ष अस्लम शरीफ आदींचा समावेश आहे.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article शांतता व संयम पाळत धार्मिक सण साजरे करावेत; मुख्यमंत्र्यांचे जनतेला आवाहन
Next Article लक्झरी बस मधून अवैध माल वाहतूक थांबवावी- मनसे

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?