सोलापूर, 16 एप्रिल (हिं.स.)।
स्व. बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेत सांगोला तालुक्यातील नरळेवाडी, वाकी (शिवणे), शिवणे, एखतपूर, सांगोला, कमलापूर या गावांना समावेश करण्यात आला असल्याची माहिती माजी आमदार शहाजी पाटील यांनी दिली.
स्व. बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेतून शेतीसाठी पाणीपुरवठा करण्यासाठी माजी आमदार शहाजी पाटील यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे नुकतीच पत्राद्वारे मागणी केली होती. या मागणीचा सहानुभूतिपूर्वक विचार करून जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्व. बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेमध्ये नव्याने तालुक्यातील सहा गावांचा समावेश करून या गावातील शेतीसाठी पाणी देण्याची कार्यवाही करण्याचे आदेश कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक यांना दिले आहेत.