Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सिक्सरकिंग पुन्हा मैदानात उतरणार, युवीने निवृत्तीचा निर्णय घेतला मागे
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsखेळ

सिक्सरकिंग पुन्हा मैदानात उतरणार, युवीने निवृत्तीचा निर्णय घेतला मागे

Surajya Digital
Last updated: 2020/12/15 at 9:36 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

चंदीगड : विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू ३९ वर्षीय युवराज सिंगने निवृत्तीचा निर्णय मागे घेतला आहे. टीम इंडियाचा ‘सिक्सर किंग’ आता स्थानिक क्रिकेटमध्ये पुनरागमनासाठी सज्ज झाला आहे. जानेवारीपासून सुरू होणाऱ्या टी-२० स्पर्धेत युवी सर्वांना दिसू शकतो.

पुढील महिन्यात होणाऱ्या सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत पंजाबच्या संभाव्य ३० खेळाडूंच्या यादीत युवराज सिंगचा समावेश करण्यात आला आहे. २०११ सालच्या आंतरराष्ट्रीय विश्वचषक स्पर्धेत सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार पटकावलेल्या युवराजने गेल्या वर्षी जून महिन्यात क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

पण आता पंजाब क्रिकेट असोसिएशनचे सचिव पुनीत बाली यांच्या विनंतीनंतर युवराजने पुन्हा एकदा मैदानात उतरण्याची तयारी दाखवली आहे.

भारतासाठी ३०४ एकदिवसीय सामने, ४० कसोटी आणि ५८ टी-२० सामने खेळलेल्या ३९ वर्षीय युवराज सध्या मोहालीच्या पीसीए स्टेडियममध्ये सराव करत आहे. त्यानं इन्स्टाग्रामवर फलंदाजीचा सराव करत असतानाचा एक व्हिडिओ देखील पोस्ट केला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर युवराजने कॅनडाच्या ग्लोबल टी-२० स्पर्धेत सहभाग घेतला होता. बीसीसीआयच्या मार्गदर्शनाखाली होत असलेली सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धा १० जानेवारीपासून सुरू होणार आहे.

You Might Also Like

विराट कोहलीच्या सोशल मीडियावरील पोस्टची क्रिकेट जगतात चर्चा

आयपीएल लिलाव १३ ते १५ डिसेंबर दरम्यान होण्याची शक्यता

शुभमन गिलकडून रोहित आणि विराटवर कौतुकांचा वर्षाव

महिला एकदिवसीय विश्वचषक : भारतीय संघाची विजयी सलामी

आशिया कपमध्ये २१ सप्टेंबर रोजी पुन्हा भारत पाकिस्तानमध्ये महामुकाबला

TAGGED: #सिक्सरकिंग #पुन्हामैदानात #उतरणार #युवीने #निवृत्तीचा #निर्णय #घेतलामागे
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article “रेकॉर्डवर सांगतोय, मराठा आरक्षण देताना इतरांना धक्का लावणार नाही”
Next Article इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेचे ‘डाकपे’ अ‍ॅप लाँच

Latest News

Как чувство риска помогает почувствовать себя энергичным
Top News December 16, 2025
Почему мы нравится мониторить за чартами
Top News December 16, 2025
По какой причине человекам приятно следить за процессом чужим опасностью
Top News December 16, 2025
Genießen Sie die handheld App von Spingranny Casino für Casino-Spiele in Deutschland
Top News November 3, 2025
Lemon Casino – Word nu lid en spin voor levensveranderende prijzen
Top News November 3, 2025
Kifizetések és befizetések a Shuffle Játékteremben Magyarországon
Top News November 3, 2025
Kraken Casino – Türkiye Oyuncuları İçin Premium Bir Çevrimiçi Casino
Top News November 3, 2025
Spielen Sie Live-Spiele und erzielen Sie sofort über das Spingranny Casino
Top News November 3, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?