Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: रात्री आकाशातून हे काय पडले? चंद्रपूर जिल्ह्यात सापडले अवशेष
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

रात्री आकाशातून हे काय पडले? चंद्रपूर जिल्ह्यात सापडले अवशेष

Surajya Digital
Last updated: 2022/04/03 at 1:02 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

मुंबई : महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात रात्री आकाशातून काहीतरी पडताना लोकांना दिसलं, तसे अनेक व्हिडिओही समोर आले. मात्र नेमकं काय पडलं? याचा ठावठिकाणा कुणालाच लागेना झाला. आकाशातून लाल झोत दिसणारी वस्तू चंद्रपूर जिल्ह्यात कोसळली आहे. आकाशात 7 ते 8 वाजल्याच्या दरम्यान मोठ्या आगीच्या लोळासह वस्तू खाली पडताना लाखो लोकांनी पाहिले. गडचिरोली जिल्ह्यातही अशाच प्रकारे आकाशातून लाल झोत खाली कोसळत असल्याचे दिसले.

 

शनिवारी रात्री महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील अनेक भागात लोकांनी आकाशात रहस्यमयी आगीचा गोळा पडताना पाहिला. आकाशातील हे दृश्य महाराष्ट्रातील नागपूर, चंद्रपूर, अकोला, जळगाव आदी जिल्ह्यांत पाहायला मिळालं. अशात चंद्रपूर जिल्ह्यातील पवनपार गावात आकाशातून पडलेल्या वस्तूचा आणखी एक भाग गवसला आहे. सुमारे साडेपाच किलो वजनाचा धातूचा गोळा आढळला.

आकाशातील हे अद्भूत दृश्य महाराष्ट्रातील नागपूर, चंद्रपूर, अकोला, जळगाव आदी जिल्ह्यांत पाहायला मिळालं. अशात चंद्रपूर जिल्ह्यातील पवनपार गावात आकाशातून पडलेल्या वस्तूचा आणखी एक भाग गवसला आहे. सुमारे साडेपाच किलो वजनाचा धातूचा गोळा आढळला. लाडबोरी गावातील शेतात धातूचे मोठे तुकडे आढळून आलेत. यातला एक गोल तुकडा सगळ्यात मोठा आहे.

राज्यात वाशिम, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, उस्मानाबाद, लातूर अशा विविध भागातील नागरिकांना संध्याकाळच्या सुमारास आकाशातून काहीतरी पडताना पाहायला मिळालं. ती वस्तू जळताना दिसत असल्यामुळे नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली होती. मात्र, पडणारी वस्तू नेमकी काय आहे? याची नेमकी माहिती अद्याप कळू शकलेली नाही.

What fell from the night sky? Remains found in Chandrapur district

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

पवनपार लगतच्या जंगलात हा गोळा आढळल्याची ग्रामस्थांनी माहिती दिली आहे. प्रशासनाने स्थानिकांशी संपर्क साधत नक्की घटनेची माहिती घेतली. जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात लाडबोरी गावलगतच्या शेतात उपग्रह वा यानाचे तुकडे पडले. लाडबोरी गावात कोसळलेल्या रिंग सदृश्य वस्तूचा अभ्यासकांनी आढावा घेतला आहे.

हा मोठा तुकडा एखादा निकामी उपग्रह वा यानाच्या इंधन टाकीचा तुकडा असावा एवढा मोठा आहे. याशिवाय अन्य धातूचे तुकडेही शेतात पडले आहेत.

इस्रो अथवा अन्य कुठल्याही अंतराळ संशोधन यंत्रणेनं अशा पद्धतीनं कुठली वस्तू पडली असावी याबाबत अधिकृत खुलासा केलेला नसल्याचं लक्षात आणून दिलं आहे. सद्य पोलिसांनी हे तुकडे ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.

लाडबोरी येथे धातूच्या पत्र्याचे मोठे तुकडे आढळून आल्यामुळे हा प्रकार उल्कापाताचा नसल्याचंही म्हटलं जात आहे. शनिवारी रात्री चंद्रपूरसह विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये आकाशात अनोखं दृश्य पाहायला मिळालं. कांनी हे दिव्य दृश्य आपल्या कॅमेऱ्यात कैद करून सोशल मीडियावर शेअर केले. काही वेळातच ते सोशल मीडियावर व्हायरल झाले.

राज्यातील विविध भागात नागरिकांना रात्री 8 च्या सुमारास तीन ते चार जळालेल्या अवस्थेतील वस्तू आकाशातून कोसळताना पाहायला मिळाल्या. या वस्तू पडत असताना जळत असलेल्या या वस्तूंच्या मागे रॉकेटप्रमाणे जाळ आणि धूर दिसत होता. आकाशातून पडत असलेल्या या वस्तू पाहून उल्कापात होत असल्याची शक्यता वर्तवण्यात आली. तर अनेकांनी विमान अपघात, त्याचबरोबर उपग्रह कोसळल्याचा अंदाजही बांधला होता. मात्र, आकाशातून पडत असलेली वस्तू नेमकी काय होती? माहिती मिळू शकली नाही.

You Might Also Like

पालखी सोहळ्यासाठी ३५०० पोलिसांचा बंदोबस्त, साध्या आणि वारकऱ्यांच्या वेशातही पोलीस

‘जारण’ ने १२ दिवसांत कमावले ३.५ कोटी

नाशिकमधील उबाठा गटाच्या चार माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

भारतीयांनी तेहरान सोडून सुरक्षित ठिकाणी जावे

आषाढी एकादशीच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी महापूजेचे मुख्यमंत्र्यांना निमंत्रण

TAGGED: #night #sky #Remains #found #Chandrapur #district, #रात्री #आकाश #चंद्रपूर #जिल्हा #अवशेष
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article आता घर घेणे झाले महाग, होमलोनवरील ही सूट बंद
Next Article फडणवीस : राज ठाकरे बोलतायत ते सत्यच, राज ठाकरेंच्या टीकेला शरद पवारांचं उत्तर

Latest News

पालखी सोहळ्यासाठी ३५०० पोलिसांचा बंदोबस्त, साध्या आणि वारकऱ्यांच्या वेशातही पोलीस
महाराष्ट्र June 18, 2025
काश्मीर मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी स्वीकारली जाणार नाही – पंतप्रधान मोदी
देश - विदेश June 18, 2025
वारकरी भक्तीयोग’कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता सर्वांनी पुढाकार घ्यावा – चंद्रकांतदादा पाटील
Top News June 18, 2025
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, इराणकडून इस्राइल विरोधात युद्धाची घोषणा
देश - विदेश June 18, 2025
‘जारण’ ने १२ दिवसांत कमावले ३.५ कोटी
महाराष्ट्र June 18, 2025
कोणताही देश दहशतवादाला पाठिंबा देत असेल तर त्याला त्याची किंमत मोजावी लागेल – पंतप्रधान मोदी
देश - विदेश June 18, 2025
भारत-कॅनडा करणार उच्चायुक्तांची पुनर्स्थापना
देश - विदेश June 18, 2025
ट्रम्प यांच्या पोस्टमुळे तेहरानमध्ये भीतीचं वातावरण, लोकांनी सोडले शहर
देश - विदेश June 18, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?