Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: स्मार्ट ई-बस लवकरच एसटीच्या ताफ्यात दाखल – मंत्री प्रताप सरनाईक
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

स्मार्ट ई-बस लवकरच एसटीच्या ताफ्यात दाखल – मंत्री प्रताप सरनाईक

admin
Last updated: 2025/06/11 at 4:13 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

पुणे, 11 जून (हिं.स.) – ए.आय. तंत्रज्ञानावर आधारित एकात्मिक सुरक्षा प्रणाली असलेल्या स्मार्ट ई- बसेस लवकरच एसटीच्या ताफ्यात दाखल होतील. असा विश्वास परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला. ते पुण्यामध्ये स्मार्ट ई-बस सादरीकरण प्रसंगी पत्रकारांशी बोलत होते.

मंत्री सरनाईक म्हणाले की, राज्य शासनाचे ई- वाहनांना प्रोत्साहन देण्याचे धोरण एसटी महामंडळाने देखील अंगीकारले असून भविष्यात घेण्यात येणाऱ्या स्वमालकीच्या ५ हजार बसेस पैकी दरवर्षी किमान १ हजार बसेस या ई- बसेस घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अर्थात, या ई-बसेस देखील ए.आय. तंत्रज्ञानावर आधारित एकात्मिक सुरक्षा प्रणाली बसवलेल्या असाव्यात अशा सूचना संबंधित बस तयार करणाऱ्या कंपनीला आम्ही सांगितले आहे. त्यानुसार त्यांनी उत्तर प्रदेश परिवहन महामंडळासाठी तयार केलेल्या स्मार्ट ई-बसचे सादरीकरण करण्यात आले.

नव्या ई-बसमध्ये चालकांच्या हालचाली वर लक्ष ठेवणारे ए.आय. तंत्रज्ञानावर आधारित CCTV कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. गाडी चालवताना जर चालक जांभळ्या देत असेल किंवा मोबाईल वापरत असेल तर सदर कॅमेरे मागील प्रवाशांना याबाबत अलर्ट करतील तशा प्रकारचा धोक्याचा अलार्म देखील वाजवला जाईल, अशी यंत्रणा नव्या स्मार्ट ई- बसेस मध्ये असणार आहे. तसेच महिलांची सुरक्षितता लक्षात घेता प्रवाशांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी देखील बसमध्ये दोन सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. बसला अचानक आग लागल्यास ती आग अल्पावधीत विझवण्यासाठी फोम बेस अग्नीशामक यंत्रणा बसमध्ये असावी असे मत यावेळी मंत्री सरनाईक यांनी व्यक्त केले. याबरोबरच स्वारगेटच्या घटनेनंतर बंद बस ही कोणत्याही बाह्य हस्तक्षेपामुळे उघडली जाणार नाही. तसा प्रयत्न केल्यास धोक्याचा अलार्म वाजेल अशी यंत्रणा देखील नव्या स्मार्ट ई-बसमध्ये बसविण्यात येणार असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यावेळी सांगितले.

You Might Also Like

मुंबई : लोकलमध्ये मोटरमन केबिनमध्ये असणार आता सीसीटीव्ही कॅमेरा

पंतप्रधान मोदींनी कलम ३७० हटवून डॉ. मुखर्जी यांचा संकल्प पूर्णत्वास नेला – रविंद्र चव्हाण

मुंबई : फिल्म सिटीमध्ये हिंदी मालिकेच्या सेटवर भीषण आग

भारत विरुद्ध इंग्लंड लीड्स कसोटी रंगतदार अवस्थेत

विद्यार्थिनींकडून कोणतेही शुल्क घेऊ नका – चंद्रकांत पाटील

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article पश्चिम रेल्वेवर तांत्रिक बिघाड; चाकरमान्यांचे हाल
Next Article पालखीसोबत जाणाऱ्या वारकऱ्यांची व विविध दिंड्यांची तयारी अंतिम टप्प्यात

Latest News

मुंबई : लोकलमध्ये मोटरमन केबिनमध्ये असणार आता सीसीटीव्ही कॅमेरा
महाराष्ट्र June 23, 2025
पंतप्रधान मोदींनी कलम ३७० हटवून डॉ. मुखर्जी यांचा संकल्प पूर्णत्वास नेला – रविंद्र चव्हाण
महाराष्ट्र June 23, 2025
मुंबई : फिल्म सिटीमध्ये हिंदी मालिकेच्या सेटवर भीषण आग
महाराष्ट्र June 23, 2025
ऑलिंपियन ललित उपाध्यायची आंतरराष्ट्रीय हॉकीमधून निवृत्ती
देश - विदेश June 23, 2025
इस्रायल- इराण युद्धाचा परिणाम भारताच्या एलपीजी गॅसवर होणार
देश - विदेश June 23, 2025
सीरियाच्या दमास्कस चर्चमध्ये बॉम्बस्फोटात २२ जणांचा मृत्यू
देश - विदेश June 23, 2025
इराणवरील हल्ल्यावरून रशिया, चीनची अमेरिकेवर टिका
देश - विदेश June 23, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड लीड्स कसोटी रंगतदार अवस्थेत
महाराष्ट्र June 23, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?