नवी दिल्ली : चिनी इंटरनेट कंपनी क्वायशो टेक्नॉलॉजीच्या ‘स्नॅक व्हिडिओ’ या व्हिडिओ अॅपवर बंदी घालण्यात यावी,’ अशी मागणी ‘सेंटर फॉर डिजिटल इकॉनॉमी पॉलिसी रिसर्च’ या अभ्यासगटाने पत्राद्वारे केलीआहे.
‘टिकटॉक’ला स्पर्धा करण्यासाठी ‘क्वायशो टेक्नॉलॉजी’ने एप्रिलमध्येच अॅप लाँच केले होते. हे भारताने जूनमध्ये ‘टिकटॉक’सह चीनच्या ५९ अॅपवर बंदी घातली आहे. त्यानंतरच, ‘स्नॅक व्हिडिओ’ जास्त प्रमाणात डाउनलोड करण्यात आला आहे. ‘आतापर्यंत बंदी घालण्यात आलेल्या चिनी अॅपमध्ये असणारे धोके या अॅपमध्येही दिसून येतात. किंबहुना, सध्या बंदी घातलेल्या अॅपच नव्या नावाने किंवा नव्या रुपामध्ये समोर आले आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
भारत सरकारच्या आदेशांचा भंग करत, ते सध्या वापरण्यात येत आहे,’ असे ‘सेंटर फॉर डिजिटल इकॉनॉमी पॉलिसी रिसर्च’चे अध्यक्ष जयजित भट्टाचार्य यांनी या पत्रात नमूद केले आहे. ‘क्वायशो टेक्नॉलॉजी कंपनीने ‘क्वाय’ नावाचे अॅप विकसित केले आहे. त्याच्या माध्यमातून स्नॅक व्हिडिओ बनविले जातात, अशा बातम्या माध्यमांत प्रसिद्ध झाल्या आहेत,’ याकडेही भट्टाचार्य यांनी लक्ष वेधले आहे.
* गुगल प्लेस्टोअरच्या रँकिंगनुसार आघाडीचे ॲप
टिकटॉक आणि अन्य चिनी अॅपमध्ये असणारे धोके या अॅपमध्येही असल्याचे केंद्रीय गृह मंत्रालय आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती-तंत्रज्ञान मंत्रालयाला लिहिलेल्या या पत्रामध्ये म्हटले आहे. ‘स्नॅक व्हिडिओ’ हे अॅप सध्या ‘गुगल प्ले स्टोअर’वर उपलब्ध असून, ते ‘गुगल प्ले स्टोअर’च्या रँकिंगनुसार ते भारतातील आघाडीचे अॅप आहे. ‘टिकटॉक’वर बंदी घालण्यात आल्यानंतर, भारतामध्ये ‘जोश’, ‘मोज’, ‘एमएक्स-टकाटक’ यांसारखी अॅप लाँच करण्यात आली; मात्र, ‘स्नॅक व्हिडिओ’ त्यांच्यापेक्षा आघाडीवर आहे. ‘एमएक्स टकाटक’ हे ‘टाइम्स इंटरनेट कंपनी’च्या ‘एमक्स प्लेयर’च्या मालकीचे असून, ‘टाइम्स इंटरनेट’ ही ‘टाइम्स ऑफ इंडिया समूहातील’ कंपनी आहे.