Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: शिवसेना – दसरा मेळाव्याचे एक घट्ट नाते; म्हणून दोन्ही गट मेळाव्यासाठी आग्रही
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

शिवसेना – दसरा मेळाव्याचे एक घट्ट नाते; म्हणून दोन्ही गट मेळाव्यासाठी आग्रही

Surajya Digital
Last updated: 2022/09/03 at 4:32 PM
Surajya Digital
Share
5 Min Read
SHARE

 

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)□ नवीन राजकीय खेळी ! दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाचा अर्ज□ दसरा मेळाव्यात राज ठाकरेंची एंट्री□ ‘उद्धव ठाकरे मराठ्यांचा द्वेष करतात’

मुंबई : एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेत मोठे वादळ आले असून सर्वच गोष्टींवर शिंदे गटाकडून दावा केला जात आहे. पक्ष, चिन्ह, वारसा याबरोबरच दसरा मेळावा कोण घेणार यावरून एकनाथ शिंदे आणि उध्दव ठाकरे समोरा-समोर उभे ठाकले आहेत. आता यात एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी मोठे वक्तव्य करून खळबळ माजवली आहे.  Shiv Sena – Dussehra gatherings have a strong relationship; So both the groups insisted on meeting
Shinde group

शिवसेना कोणाची यावर सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगात सुनावणी सुरु आहे. शिवसेना आणि दसरा मेळाव्याचे एक घट्ट नाते आहे. या पार्श्वभूमीवर या वर्षी जो गट मेळावा घेईल तो गट कोर्टात पुरावा म्हणून वापर करतील म्हणूनच दोन्ही गट मेळाव्यासाठी आग्रही झाले आहेत.

दीपक केसरकर म्हणाले की, एकनाथ शिंदेंनी दसरा मेळावा घ्यावा असा आग्रह शिंदे गटाच्या आमदारांचा आहे. गणेश चतुर्थीनंतर दसऱ्याला शिंदे गटाच्या आमदारांनी मुंबईतच राहावे, अशा सूचना आमदारांना एकनाथ शिंदेनी दिल्याची माहिती समोर येत आहे.

एकनाथ शिंदेंनी दसरा मेळावा घ्यावा असा आग्रह शिंदे गटाच्या आमदारांचा आहे. गणेश चतुर्थीनंतर दसऱ्याला शिंदे गटाच्या आमदारांनी मुंबईतच राहावे, अशा सूचना आमदारांना एकनाथ शिंदेनी दिल्याची माहिती आहे. शिंदे गटाचा दसरा मेळावा होणार का? असा प्रश्न विचारल्यावर दीपक केसरकर यांनी याबाबत मुख्यमंत्री यांची भेट घेवूनच मगच निर्णय घेतलाय.

शिंदे गटातील आमदार परतीच्या मार्गावर आहेत, असे कोण सांगत असेल तर ते त्यांचे दिवास्वप्न आहे. आम्ही गुवाहाटीत असतानाही असे दावे वारंवार करण्यात आले होते. उलट गुवाहाटीतून मुंबईत आल्यावर आणखी एक आमदार आमच्या गटात सहभागी झाला, असा टोला शिंदे गटाचे मुख्य प्रवक्ते आणि राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी लगावला. शिंदे गटातून आता एकही आमदार माघारी परतणार नसल्याचा दावा त्यांनी केला.

दीपक केसरकर म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी आपले आहेत ते आमदार सांभाळावेत, नाहीतर एक आमदार अगोदरच गेला आहे, ते उर्वरीत कधी जातील हे तुम्हाला कळणारही नाही. त्यामुळे चुकीची वक्तव्ये करू नका, असा सल्ला दिला. शिक्षकांकडे विद्यार्थी घडवण्याची जबाबदारी आहे. यामुळे राष्ट्रीय जबाबदारी सोडून त्यांच्याकडे अन्य कामांची अतिरिक्त जबाबदारी दिली जात असेल तर त्याबद्दल आपण निश्चितच पुनर्विचार करू, असे त्यांनी सांगितले.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

दरवर्षी दसरा मेळाव्याच्या दिवशी शिवसेनेकडून मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानावर भव्य सभेचं आयोजन करत शक्ती प्रदर्शन केलं जातं. यंदा मात्र वातावरण वेगळं आहे. शिवसेनेतील अनेक दिग्गज नेत्यांनी बंडखोरी करुन भाजपसोबत हातमिळवणी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात ही बंडखोरी करण्यात आली आहे. या बंडखोरीनंतर शिवसेनेचा बंडखोर गटदेखील दसरा मेळाव्याबद्दल विविध दावे करताना दिसत आहे.

 

 

□ नवीन राजकीय खेळी ! दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाचा अर्ज

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिंदे गटाने दसरा मेळाव्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडे अर्ज केला आहे. यापूर्वी उद्धव ठाकरे यांच्या गटाने दसरा मेळाव्यासाठी पालिकेकडे अर्ज केला होता. यामुळे हा वाद आता चिघळण्याची शक्यता आहे. शिंदेंनी दसऱ्याच्या वेळी सर्व आमदारांना मुंबईत राहण्याचा सुचना दिल्या आहेत. शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी हा अर्ज केला आहे.

 

□ दसरा मेळाव्यात राज ठाकरेंची एंट्री

 

शिवसेना कुणाची याचा निर्णय कोर्टात होणार आहे. परंतू दसरा मेळावा शिवाजी पार्कवर कोण घेणार याबाबत सध्या वाद सुरु आहे. एकनाथ शिंदे व उद्धव ठाकरे यांच्यात हा वाद आहे. अशातच शिंदे गट राज ठाकरे यांना दसरा मेळाव्याला आमंत्रित करण्याची तयारी सुरु आहे. शिंदे गट राज यांना दसरा मेळाव्याला आणणार असल्याची चर्चा आहे. अशातच मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी केलेल्या ट्वीटमुळे या चर्चांना उधाण आलं आहे.

 

□ ‘उद्धव ठाकरे मराठ्यांचा द्वेष करतात’

 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मराठाद्वेष्टे आहेत, हे आपण जबाबदारीने बोलत असल्याचे शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी केला. मराठा व्यक्ती मोठा झालेला त्यांना आवडत नाही, असेही रामदास कदम म्हणाले आहेत. तसेच, मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांच्या पाठीत खंजीर खुपसला. गद्दार उद्धव ठाकरे आहेत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाहीत असेही रामदास कदम म्हणाले आहेत.

You Might Also Like

शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री

महाराष्ट्रातील भाजपा कार्यकर्त्यांना लाभणार रवी नामक ‘दादा’ !

तेलंगणा : भाजप नेते राजा सिंह यांचा राजीनामा

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील दोन वारकऱ्यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू

अपूर्व हिरे बुधवारी भाजपामध्ये करणार प्रवेश

TAGGED: #ShivSena #Dussehra #gatherings #strong #relationship #both #groups #insisted #meeting #Shindegroup, #शिवसेना #दसरा #मेळावा #एक #घट्ट #नाते #दोन्हीगट #आग्रही #शिंदेगट
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article 200 किलो गव्हापासून गणेश मूर्ती; शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना करणार मदत
Next Article सोलापूर : कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांना मिळणार शैक्षणिक खर्च

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?