Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: बंद पुकारणार्‍या व्यापार्‍यांना सामाजिक कार्यकर्ते कोर्टात खेचणार
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

बंद पुकारणार्‍या व्यापार्‍यांना सामाजिक कार्यकर्ते कोर्टात खेचणार

Surajya Digital
Last updated: 2021/09/18 at 12:52 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

बार्शी : बंद पुकारणे नागरिकांच्या मूलभूत हक्काचे हनन असल्याने सर्वोच्च न्यायालयाने बंद पुकारणे बेकायदेशीर असल्याचा केरळ उच्च न्यायालयाचा निर्णय अपिलात कायम केला आहे. बंद पुकारल्यामुळे होणारी नुकसानभरपाई आयोजकांकडून वसूल करणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे बार्शीमध्ये बंद पुकारणार्‍या व्यापार्‍यांना कोर्टात खेचण्याची तयारी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. बंदबाबत प्रसिध्दीमाध्यमात येणार्‍या बातम्यांचे पुरावा म्हणून संकलन होत आहे.

विविध संघटना, राजकीय पक्ष यांच्याकडून वारंवार बंद पुकारण्यात येत असल्यामुळे केरळमधील नागरिकांनी तेथील उच्च न्यायालयात बंद विरोधात याचिका दाखल केल्या होत्या. या याचिकांच्या एकत्रित सुनावणीत उच्च न्यायालयाने बंद पुकारणे बेकायदेशीर आणि घटनाबाह्य ठरवत त्यामुळे नागरिकांच्या मूलभूत हक्कावर गदा येत असल्याचा निर्वाळा दिला होता. त्याचप्रमाणे बंद काळात होणार्‍या नुकसानभरपाईबाबत आयोजकांना जबाबदार ठरविले होते. स्थानिक प्रशासनाला बंदबाबत आयोजकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात अपील झाले होते. तेथे सर्वोच्च न्यायलयानेही उच्च न्यायालयाची भूमिका योग्य ठरविली होती. त्यानंतर बंदच्या आयोजनाबाबत बंधने आली आहेत.

बार्शीमध्ये अलीकडे किरकोळ कारणावरुन बंद पुकारण्याची फॕशन आली आहे. एकीकडे कोरोनाकाळात दुकाने, व्यापार बंद ठेवावा लागल्यामुळे आमचे खूप आर्थिक नुकसान झाले आहे, अशी आवई उठवून प्रशासनाला कोरोना बंधने उठविण्याबाबत वारंवार आवाहन करणारेच आता बंद पुकारण्याबाबत पुढाकार घेत असल्याची विसंगती दिसून येत आहे. बंदमुळे काही जणांचे फावत असले तरी ज्यांचे अगदीच हातावर पोट आहे. त्यांची मात्र मोठी पंचाईत होते. त्यामुळे जाहीरपणे अथवा सोयिस्कररित्या बंद पाळण्याचा प्रयत्न हा नागरिकांच्या मूलभूत हक्कावर गदा आणणारा असल्याने बंदच्या आयोजकांना न्यायालयात खेचण्याचा निर्धार सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे.

* दरोडाप्रकरणी दोघांना पोलीस कोठडी
मोहोळ : भाविकाच्या गाडीवर १ लाख १८ हजार रुपयाचा दरोडा प्रकरणी दोन संशयितांना मोहोळ पोलिसांनी अटक केली असून त्यांना न्यायालयात  उभे केले असता त्याना चार दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहितीनुसार,  वसई पालघर येथील कुवर महंमद नादिर, त्यांचे मित्र नितीन पांचाळ व ड्राइवर उमाशंकर बसवराज यादव हे तिघे जण ईरटीका (कार नं- एम एच २ इ आर ५३४४) या गाडीतून तुळजापूर येथे दर्शनासाठी निघाले होते. दरम्यान १६ सप्टेंबर रोजी सकाळी ६ :३० वाजताच्या सुमारास मोहोळ- वैराग रोडवर नरखेड  भोयरे पाटी जवळ लघुशंकेसाठी गाडी थांबवली असता अचानक चेहऱ्याला मास्क बांधलेले सहा ते सात इसमानी गाडीला घेराव घातला. व गाडीतून ड्रायव्हर उमाशंकर बसवराज यादव, नितीन पांचाळ सह फिर्यादी नादिर यास बाहेर ओढून यांच्या खिशातील ९७ हजार ५०० रुपयांच्या रोख रकमेसह, ३ मोबाईल व १ घड्याळ असा एकूण १ लाख १८ हजार ५०० ऐवज चोरून पोबारा केला होता.
यात एका महिलेसह सात संशयित आरोपींवर दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी हारकू रामराया काळे व अनिल अनसर शिंदे (रा वैराग) या दोघांना मोहोळ पोलिसांनी अटक केली असून शुक्रवारी  त्यांना मोहोळ येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने  चार दिवसांची पोलिस कस्टडी सुनावली.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #Socialworkers #protesting #traders #court, #बंद #पुकारणार्‍या #व्यापार्‍यांना #सामाजिक #कार्यकर्ते #कोर्टात #खेचणार
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article पेट्रोल-डिझेलला जीएसटी कक्षेत आणण्यास राज्य सरकारचा विरोध; GST परिषदेची बैठक संपली, मात्र दरांबाबत निर्णयच नाही
Next Article लोकल दहशतवाद्यांच्या निशाण्यावर, ‘गॅस अटॅकची योजना, त्यात बाँम्ब ठेवल्याची फोनद्वारे खोटी माहिती

Latest News

Почему переживание «почти получилось» мотивирует не сдаваться
Top News December 8, 2025
test
Top News December 7, 2025
test
Top News December 7, 2025
Roulette Real Money India with Jackpots
Top News December 7, 2025
Play Live Roulette UK for Beginners: A Comprehensive Guide
Top News December 7, 2025
Каким образом личные мотивы формируют действия
Top News December 7, 2025
Gentle Monster Eyewear Designer Glasses With KUN 2025 Moncler+Gentle Monster
Top News December 7, 2025
Vale Fresh Pieces Zip Up Hoodies
Top News December 7, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?