सोलापूर, 4 मे (हिं.स.)
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत आपल्या खंद्या समर्थकांचा झालेला पराभव नेत्यांच्या जिव्हारी लागला आहे.
अनुसूचित जाती-जमातीमधून बोरामणीचे रवी रोकडे यांचा पराभव झाला. यापूर्वीच्या जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांची पत्नी स्वाती या भाजपच्या उमेदवार होत्या. त्यांचा पराभव काँग्रेसच्या उमेदवार मुस्तीस्थित रेखा गायकवाड यांच्याकडून झाला. म्हणून, नेतृत्वाशी एकनिष्ठ असलेल्या रोकडे यांना आ. सचिन कल्याणशेट्टी यांनी पॅनेलमधून आपल्याच कोट्यातून संधी दिली होती. मात्र, यात त्यांचा दणकून पराभव झाला. रोकडेच्या पत्नीचा जिल्हा परिषद निवडणुकीत व रोकडेचा आता बाजार समिती निवडणुकीत झालेला पराभव आ. कल्याणशेट्टींच्या जिव्हारी लागला आहे.