Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापूर । आरसेटीमार्फत मोफत व्यवसाय प्रशिक्षणांचा लाभ घेण्याचे आवाहन
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

सोलापूर । आरसेटीमार्फत मोफत व्यवसाय प्रशिक्षणांचा लाभ घेण्याचे आवाहन

Surajya Digital
Last updated: 2023/04/12 at 8:18 PM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

 

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)● महापालिकेतील 19 कर्मचाऱ्यांना आरोग्य निरीक्षकपदी पदोन्नती !○ यांची झाली आरोग्य निरीक्षकपदी पदोन्नती 

सोलापूर – ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार युवक – युवतींना मोफत व्यवसाय प्रशिक्षण देवून उद्योग व्यवसायाकडे वळविण्याच्या हेतूने सुरू असलेल्या बँक ऑफ इंडिया संचलित ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था अर्थात (आरसेटी) मध्ये या वर्षी जवळपास ३० व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात येणार असून, सर्व मोफत निवासी स्वरुपाचे असणार आहेत. तरी सर्व ग्रामीण भागातील युवक युवतींना या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे संचालक दीपक वाडेवाले यांनी पत्रकाद्वारे केले आहे.

 

यामध्ये युवतींसाठी शिवणकला, ब्युटीपार्लर, ज्युट प्रॉडक्ट उद्यमी, वस्त्र चित्रकला, ज्वेलरी बनविणे तसेच युवकांसाठी दुचाकी दुरुस्ती, मोबाईल रिपेअरिंग, फोटोग्राफी आणि व्हीडिओग्राफी व शेतीपूरक प्रशिक्षण शेळीपालन, दुग्धव्यवसाय व गांडूळखतनिर्मिती अशा वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण वर्षभर चालणार आहे.

 

या सर्व प्रशिक्षणासाठी लागणारे साहित्य, प्रशिक्षणार्थींची निवास आणि भोजनाची व्यवस्था पूर्णपणे मोफत आहे. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर पुढील दोन वर्षे पाठपुरावा करुन व्यवसाय उभारणीस मदत करण्यात येते. या प्रशिक्षणासाठी प्रशिक्षणार्थी हा सोलापुर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील असावा व त्याचे वय १८ पूर्ण व ४५ वर्षाच्या आतील असावे. अधिक माहितीसाठी ९२७२२०७१११ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही . वाडेवाले यांनी केले आहे.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

● महापालिकेतील 19 कर्मचाऱ्यांना आरोग्य निरीक्षकपदी पदोन्नती !

सोलापूर : महापालिकेच्या आकृतीबंधातील आरोग्य निरीक्षकांच्या एकूण ७७ मंजूर पदांपैकी १९ पदे पदोन्नतीने भरण्यात आली आहेत. महापालिकेतील मजूर, झाडूवाला, कनिष्ठ श्रेणी लिपिक व बिगारी यांना आरोग्य निरीक्षकपदी पदोन्नती देण्यात आली आहे. याबाबतचे आदेश सोमवारी महापालिका आयुक्त शितल तेली – उगले यांनी काढले आहेत. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

महापालिकेच्या मंजूर आकृतीबंधात आरोग्य निरिक्षकांची एकूण ७७ पदे मंजूर आहेत. या मंजूर पदापैकी ५८ (७५ टक्के) पदे सरळसेवेने व १९ (२५ टक्के) पदे पदोन्नतीने भरणेबाबत नव्याने मंजूर केलेल्या सेवाप्रवेशामध्ये नमूद आहे. त्यानुसार वर्ग-३ व ४ संवर्गातील या पदासाठी सेवाप्रवेशमध्ये आरोग्य निरिक्षक पदासाठी विहित केलेली शैक्षणिक व अन्य अर्हता धारण करणारे कर्मचारी यांच्याकडून अर्ज मागविण्यात आलेले होते.

 

विहित केलेल्या अर्हतानुसार कागदपत्राची तपासणी होवून त्यानुसार खातेनिहाय समितीमध्ये ४३ अर्जदारापैकी ३२ अर्जदार यांना पात्र व ११ कर्मचारी यांना अपात्र करण्यात करण्याबाबत तसेच पात्र कर्मचारी यांचे विभागीय चौकशी, गोपनिय अहवाल व मक्ता व दायित्वे तपासणी करून त्यांचे आरोग्य निरिक्षक (पदोन्नती) या संवर्गातील रिक्त पदावर सेवा जेष्ठतेनुसार नियुक्ती करण्याबाबत निर्णय झालेला आहे.

 

खातेनिहाय पदोन्नती समितीने पात्र ठरविण्यात आलेल्या कर्मचारी यांची आरोग्य निरिक्षक या पदावर अटीस अधीन राहून तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नतीने नियुक्ती देण्यात येत आहे. याबाबतचे कार्यालयीन आदेश महापालिका आयुक्त शीतल तेली – उगले यांनी आज सोमवारी काढले आहेत.

○ यांची झाली आरोग्य निरीक्षकपदी पदोन्नती 

 

– आरोग्य निरीक्षकपदी पदोन्नती झालेल्या कर्मचाऱ्यांचे नाव व कंसात पदनाम असे :

अंजली गिरिष काकडे (मिडवाईफ), नितीन बाळकृष्ण नराळे(मजूर), खाजप्पा अशोक कट्टीमनी (वाहनचालक), सोमनाथ एस ताकभाते (क.श्रे. लि.), रविंद्र राजाभाऊ सर्वगोड (क.श्रे. लि.), सोमनाथ नागनाथ सिध्दगणेश( क.श्रे. लि.), भैय्यासाहेब बाबुराव डोळसे (झाडूवाला),
शिलरत्न महादेव दुडे ( बिगारी), दत्ता तानाजी म्हस्के (मजूर), पद्मावती निलमणी इंगळे (झाडूवाला), अ. वाहिद म. अली पेरमपल्ली (वरिष्ठ क्षेत्रकार्यकर्ता),
अतुल अभिमान मस्के (झाडूवाला), शिवप्रसाद विलास कुलकर्णी (बिगारी), विश्वास लुमवेल क्षिरसागर (क.श्रे. लि.), श्रीदेवी सुधाकर गायकवाड (बिगारी), गोरीशंकर प्रकाश बनसोडे (बिगारी), शुभम अरूण रणखांबे (बिगारी), सौ.सुप्रिया महेश कांबळे (बिगारी)
अशोक देविदास इंगळे (झाडूवाला) आदी.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #Solapur #Rural #appeal #advantage #free #business #training #through #RCET, #सोलापूर #आरसेटी #मोफत #व्यवसाय #प्रशिक्षण #लाभ #आवाहन
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article …म्हणून प्रिया बेर्डेना दिली राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी; केला भाजपात प्रवेश
Next Article सोलापूर । सुनेने केला सासूचा गळा आवळून खून, कारण वाचाल तर व्हाल थक्क

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?