Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापूरमध्ये खळबळ; माजी आमदारासह २९ जणांना अटक
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

सोलापूरमध्ये खळबळ; माजी आमदारासह २९ जणांना अटक

Surajya Digital
Last updated: 2021/12/18 at 8:38 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

सोलापूर : सोलापूर शहरात कर्नाटकातील इंडीचे माजी आमदार रविकांत पाटील यांच्यासह २९ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. शहरातील होटगी रोड विमानतळ परिसरातील एका हॉटेलमध्ये गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला. त्यावेळी हॉटेलमध्ये पत्त्यांचा जुगार सुरू असल्याचे निदर्शनास आले. यावेळी जुगाराचे साहित्य आणि रोख रक्कम पोलिसांनी जप्त केली. होटगी रोडवर विमानतळाशेजारील हे हॉटेल रविकांत पाटील यांच्या मालकीचे आहे.

होटगी रोडवर विमानतळाशेजारी माजी आमदार रविकांत पाटील यांच्या मालकीचे हॉटेल आहे. त्याठिकाणी जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांना मिळाली. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकिशोर साळुंखे व सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश महाडिक यांच्या पथकाने रात्री ११ च्या सुमारास हॉटेलवर छापा टाकला. त्यावेळी हॉटेलमध्ये पत्त्यांचा जुगार सुरू असल्याचे निदर्शनास आले.

या छाप्यात पोलिसांनी हॉटेल मालक रविकांत पाटील यांच्यासह जुगार खेळणार्‍या तब्बल २९ जणांना ताब्यात घेतले. यावेळी जुगाराचे साहित्य आणि रोख रक्कम पोलिसांनी जप्त केली. त्यानंतर रविकांत पाटील यांच्यासह सर्वच जुगार्‍यांना विजापूर नाका पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्याठिकाणी मध्यरात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

कारवाईचे अधिक व्हिडिओ पाहण्यासाठी surajya digital फेसबुक पेजला भेट द्या

दरम्यान, रविकांत पाटील यांना ताब्यात घेतल्याचं समजताच त्यांच्या समर्थकांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात मोठी गर्दी केली होती.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

* सांगोला येथून ९२ हजाराचे लोखंड पळविले

सोलापूर : सांगोला येथील हॉटेल अविरतच्या पाठीमागील मोकळ्या जागेतून चोरट्याने ९२ हजाराची लोखंडी सळई चोरून नेली. ही घटना काल शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडली. हॉटेलच्या पाठीमागील मोकळ्या जागेत बांधकामासाठी लोखंडी सळई ठेवण्यात आली होती. चोरट्यांनी १ हजार४०० किलो सळई चोरून नेली. अशा आशयाची फिर्याद बाबासाहेब गळवे यांनी सांगोला पोलिसात दाखल केली. हवालदार वजाळे पुढील तपास करीत आहेत.

* ट्रॅक्टरची ट्रॉली निसटून दुचाकीला धडक दिल्याने दोघे जखमी

सोलापूर : टेंभुर्णी ते कुर्डवाडी रोड वरील तांबवे शिवारात वेगाने जाणाऱ्या ट्रॅक्टरच्या पाठीमागील पिन निसटून ट्राली पुढे  जाऊन एका दुचाकीला धडकल्याने  ब्रह्मदेव शांतीलाल लोंढे (वय २७) आणि त्याचा भाऊ विष्णू लोंढे (वय २५ दोघे रा. निमगाव तालुका माढा) हे दोघे गंभीर जखमी झाले. हा अपघात गुरुवारी सकाळच्या सुमारास घडला. लोंढे बंधू दुचाकीवरून निघाले होते त्यावेळी ट्रॅक्टरच्या पाठीमागील ट्रॉली निसटून समोरच्या दुचाकीला धडकली. त्यात दोघे गंभीर जखमी झाले. या प्रकरणात टेंभुर्णीच्या पोलीसांनी दत्ता महादेव चव्हाण (रा. आढेगाव)या ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. हवालदार तांबोळी पुढील तपास करीत आहेत .

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #Excitement #Solapur #arrested #formerMLA, #सोलापूर #खळबळ #माजीआमदार #२९जणांना #अटक
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना ही छोटी गोष्ट – बसवराज बोम्मई
Next Article श्री दत्त जयंतीनिमित्त अक्कलकोट वटवृक्ष मंदिरात भाविकांची गर्दी

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?