Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापुरात पिकअप उलटल्याने 9 प्रवासी जखमी; नवर्‍याच्या घरात का राहते म्हणून सवतीला मारहाण
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

सोलापुरात पिकअप उलटल्याने 9 प्रवासी जखमी; नवर्‍याच्या घरात का राहते म्हणून सवतीला मारहाण

Surajya Digital
Last updated: 2022/02/17 at 10:23 PM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

 

सोलापूर – पुणे महामार्गावरील मोहोळ नजीक असलेल्या यावली जवळ वेगाने जाणारी पीकप उलटल्याने 9 प्रवासी जखमी झाले. हा अपघात आज पहाटे 5 वाजेच्या सुमारास घडला.

महेंद्र चव्हाण (वय 25), अनिकेत चव्हाण (वय 20), राधा चव्हाण (वय 25), अंबिका काळे (वय 22 सर्व रा.सेटलमेंट फ्री कॉलनी सोलापूर), युसुफ अली (वय ४५ रा.पुणे), बापू सागर (वय 35 रा. तुळजापूर), सचिन कांबळे (वय 35 रा. धोत्रीकरवस्ती सोलापूर), सुनील बनसोडे (वय 39 रा. बुधवार पेठ सोलापूर) आणि ताजुद्दिन तुरेवाले (वय 40 रा.पुणे) अशी जखमींची नावे आहेत. ते सर्वजण पुणे ते सोलापूर असा पिकअपमधून प्रवास करीत होते. पहाटेच्या सुमारास हा अपघात घडला. सर्व जखमींना सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघाताची प्राथमिक  नोंद तालुका पोलिसात झाली आहे.

□ परगावच्या ट्रकचालकाला मार्केट यार्डात मारहाण

सोलापूर – येथील श्री सिध्देश्‍वर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये परगावच्या ट्रकचालकाला 5 ते 6 जणांनी मिळून मारहाण केली. ही घटना दि. 11 फेब्रुवारी रोजी घडली.

महमंद रफिक म.इसाक नदाफ (वय 42, रा. 5/10, मेरा भारत महान नगर विजापूर रोड सोलापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मिळालेली माहिती अशी की, राजस्थान हरियाना रोडवेजची डब्लू बी 11 डी 4187  या क्रमांकांच्या ट्रक चा चालक सुरेंद्र यादव याला कांदा विभागात ट्रक लावत असताना अबरार शकीर महमद शेख, जहाँगिर सय्यद, सिकंदर सय्यद व त्यांचे तीन साथीदारांनी येवून तेरी गाडी यहॉ पे नही रूकाना बाहर का ट्रान्सपोर्टवाला है तू सोलापूर का नही है तेरी ट्रक यहॉ भरणे का नही अगर तू मेरी बात नही सुनता है तो तू मेरे को दो हजार रूपये हफ्ता दे नही दिया तो गाडी का काच फोडकर नुकसान करूंगा असे म्हणून दमदाटी करून खंडणीची मागणी केली आणि मारहाण केले.

9 injured as pickup overturns in Solapur Swati beaten for staying in Navraya’s house

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

त्यानंतर सकाळी फिर्यादी कांद्याचा लिलाव संपवून पायी चालत जात असल्याचे पाहून आरोपींनी येवून तू बाहर के गाडी क्यु लगा रहा है असे म्हणून खाली पाडून मारहाण केले आणि हातातील 12 हजार 500 रूपयाचे रॅडो घड्याळ जबरदस्तीने काढून चोरून नेले अशी नोंद जेलरोड पोलीस ठाण्यात झाली असून पुढील तपास महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक शेख करीत आहेत.

□ नवर्‍याच्या घरात का राहते म्हणून सवतीला मारहाण

सोलापूर – जुना विडी घरकुल परिसरात पहिल्या पत्नीने येवून दुसर्‍या पत्नीला तू माझ्या नवर्‍याच्या घरात का राहाते म्हणून मारहाण करून जखमी केले.

ही घटना दि. 15 फेब्रुवारी रोजी घडली. श्रीदेवी अमर मद्राल (वय 37, रा. जे ग्रुप 2/135 प्रगती चौक जुना विडी घरकुल सोलापूर) असे जखमीचे नाव आहे. ही आणि तचा मुलगा जिवांश हा त्यांच्या घरात टिव्ही पाहात बसलेले असताना गणेश तुम्मा यांची पत्नी लावण्या गणेश तुम्मा आणि तिची आई अन्नपुर्णा रच्चा या दोघी हैदराबाद येथून आल्या आणि त्यांनी तू माझ्या नवर्‍याच्या घरात का राहाते असे म्हणून शिवीगाळ करून मारहाण केली.

मुलाला खाली पाडून डोक्यात स्टीलची बाटली मारून जखमी केले , अशी फिर्याद श्रीदेवी मद्राल यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिली. पुढील तपास पोलीस नाईक गायकवाड करीत आहेत.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #9injured #pickup #overturns #Solapur #beaten #staying #Navraya's house, #सोलापूर #पिकअप #९प्रवासी #जखमी #नवर्‍याच्या #घरात #सवतीला #मारहाण
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article महाळुंग श्रीपूर नगराध्यक्ष निवडणुकीतून राष्ट्रवादीची माघार, स्थानिक आघाडीच्या लक्ष्मी चव्हाण होणार बिनविरोध नगराध्यक्ष
Next Article लग्न घरी दुःख कोसळले; रात्री ११ महिलांचा विहिरीत बुडून मृत्यू

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?