सोलापूर : पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यातील माजी जिल्हा परिषद सदस्य आणि बोराळेचे सरपंच बाबासाहेब भीमराव पाटील (वय 70) यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. नुकत्याच झालेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जाहीर सभेत त्यांनी हजेरी लावली होती. पाटील यांच्या निधनामुळे मंगळवेढा तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरु होती. आता प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. राष्ट्रवादीने भारत भालकेंचे सुपुत्र भगीरथ भालके यांना उमेदवारी दिली आहे. त्याविरोधात भाजपने समाधान आवताडे यांना रिंगणात उतरवलं आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात मतदान संपेपर्यंत निर्बंधातून सवलत दिली आहे.
https://twitter.com/SurajyaDigital/status/1382920484560334848?s=20
काही दिवसांपूर्वी पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत विविध प्रचारसभा झाल्या. राष्ट्रवादीचे उमेदवार भगिरथ भालके यांच्या प्रचारसभेला अजित पवारांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला होता. या प्रचारसभेला माजी जिल्हा परिषद सदस्य आणि बोराळेचे सरपंच बाबासाहेब भीमराव पाटील हे देखील उपस्थित होते. त्यांचा आता कोरोनामुळे बळी गेला आहे. हेच मयत अनेकाच्या संपर्कात आल्याने आता खळबळ माजली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
9 एप्रिलला सभेपूर्वी बाबासाहेब भीमराव पाटील यांनी आरोग्य तपासणी केली होती. तसेच त्यांना कोरोनाची लक्षण दिसत असल्याने पाटील यांनी कोरोनाची चाचणीही केली होती. पाटील यांना या सभेवेळी त्रास जाणवत होता. ही सभा संपल्यानंतर त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. यानंतर त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान काल मध्यरात्री पाटील यांचा मृत्यू झाला.
https://twitter.com/SurajyaDigital/status/1382911669408440320?s=20
तर दुसरीकडे याच बोराळे गावात कोरोनाचा विस्फोट पाहायला मिळत आहेत. बोराळे गावात आतापर्यंत 40 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील अनेक नागरिक हे अजित पवारांच्या जाहीर सभेत सहभागी झाले होते. यामुळे बोराळे गावात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे.