सोलापूर, 24 जुलै – सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद खाजगी रजेवर जात असून, त्यांच्या 15 दिवसांच्या अनुपस्थितीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) कुलदीप जंगम यांच्याकडे जिल्हाधिकारीपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. ही माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
कुलदीप जंगम यांचा 15 दिवसांचा कलेक्टर कार्यकाळ
कुलदीप जंगम यांनी सोलापूर जिल्हा परिषदेतील कार्यभार स्वीकारून अकरा महिने पूर्ण केले आहेत. आता जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या अनुपस्थितीत जंगम हे 15 दिवसांसाठी सोलापूरचे प्रभारी जिल्हाधिकारी असतील.
वारीच्या यशस्वी नियोजनात ‘कुमार-जंगम’ जोडीचा वाटा
नुकत्याच पार पडलेल्या आषाढी वारीचे उत्कृष्ट नियोजन करताना जिल्हाधिकारी आशीर्वाद आणि सीईओ जंगम यांनी उत्तम समन्वय साधल्याचे सर्वत्र कौतुक झाले. त्यामुळे प्रशासनाच्या विश्वासास पात्र ठरलेल्या जंगम यांच्यावर आता अधिक जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
सोलापुरात जंगम यांच्यावर कौतुकाचा वर्षाव
कलेक्टरपदाचा अतिरिक्त कार्यभार मिळाल्याने जंगम यांच्यावर जिल्ह्यातील राजकीय व सामाजिक वर्तुळातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्यांना यामुळे जिल्हाधिकारीपदाचा अनुभव मिळणार आहे, जो त्यांच्या प्रशासकीय कारकीर्दीसाठी महत्वाचा ठरणार आहे.