Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापूर शहर जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त 15 हजार 474; एकूण मृत्यू 655 तर 11 हजाराहून जादा कोरोनामुक्त
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

सोलापूर शहर जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त 15 हजार 474; एकूण मृत्यू 655 तर 11 हजाराहून जादा कोरोनामुक्त

Surajya Digital
Last updated: 2020/08/23 at 12:27 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

सोलापूर : सोलापूर शहरातील कोरोनाबाधितांची ग्रामीण भागातील संक्रमितांची संख्या वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली आहे. पंढरपूर, बार्शी या दोन तालुक्यांतील रुग्णसंख्या रोजच वाढत असल्याचे दिसून येत आहे. शनिवारी शहरात 58 आणि ग्रामीण भागात 265, अशा 323 पॉझिटिव्ह रुग्णांची नव्याने नोंद झाली आहे. शहरात एक आणि ग्रामीण भागातील 8, असा 9 जणांचा मृत्यू झाला आहे.

शनिवारी एकाच दिवशी ग्रामीण भागातील 650 आणि शहरातील 38 जण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत शहरासह ग्रामीण भागात मिळून कोरोनाबाधितांची संख्या 15 हजार 474 वर पोहोचली असून मृतांची संख्या 655 झाली आहे. 11 हजार 178 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

सोलापूर शहरात शनिवारी 1 हजार 117 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 1 हजार 59 जणांचे अहवाल निगेटिव्ह, तर 58 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. एका व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

शनिवारअखेर सोलापूर शहर व जिल्ह्यातील जवळपास 1 लाख 27 हजार 980 जणांची कोरोना तपासणी करण्यात आली. त्यापैकी 1 लाख 26 हजार 825 जणांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 1 लाख 12 हजार 332 जणांचे अहवाल निगेटिव्ह, तर 15 हजार 474 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आणखी 155 जणांचे अहवाल येणेबाकी आहेत.

* शनिवारच्या अहवालातील 9 मृत्यू

ग्रामीण भागात मृत्यू झालेल्यांमध्ये माळशिरस तालुक्यातील फोंडशिरस येथील 40 वर्षीय पुरूष, माळशिरस तालुक्यातील संगम येथील 63 वर्षीय महिला, बार्शी तालुक्यातील काटेगाव येथील 75 वर्षीय पुरूष, बार्शी शहरातील उपळाई रोड येथे राहणारे 28 वर्षीय पुरूष, बार्शी शहरातील कासारवाडी रोड परिसरातील 65 वर्षीय पुरूष, माढा तालुक्यातील चिंकहिल येथील 56 वर्षीय पुरूष, करमाळा शहरातील एस. टी. कॉलनीतील 84 वर्षीय पुरूष, पंढरपूर तालुक्यातील गादेगाव येथील 80 वर्षीय पुरूष, तर शहरातील भवानी पेठ परिसरात राहणार्‍या एका 81 वर्षीय पुरूषाचादेखील मृत्यू झाला आहे.

* पंधरा हजार पार; ग्रामीणची चिंता

सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात आजपर्यंत 9 हजार 211 जण कोरेानाबाधित आढळून आले आहेत. शहरात 6 हजार 263, असे एकूण 15 हजार 474 जण सोलापूर जिल्ह्यात कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यापैकी 11 हजार 178 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत शहरात 397, तर ग्रामीण भागात 258, अशा एकूण 655 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सोलापूर शहरातील 1 हजार 188 जणांवर आणि ग्रामीण भागातील 2 हजार 473 अशा एकूण 3 हजार 661 जणांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरु असल्याची माहिती आरोग्य विभागाच्यावतीने देण्यात आली आहे.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #Gramin #solapur #सोलापूरग्रामीण #15हजार
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article उजनी झाली ७५ टक्के; दौंडमधून ३५ हजार ४६३ क्युसेक्सने विसर्ग, लवकरच शंभर टक्के
Next Article संविधानाचा अवमान करणा-या प्रविण तरडेवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?