सोलापूर : अत्यावश्यक कारणे सांगून रस्त्यावर नागरिकांची होणारी गर्दी पाहता पालिका प्रशासनाचा आज मोठा निर्णय घेतला आहे. सोलापूर शहरात आता अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी 7 ते दुपारी 1 वाजेपर्यंतच सुरु राहणार आहेत.
https://twitter.com/SurajyaDigital/status/1382935575347400705?s=20
शहरातील सर्व किराणा दुकान, भाजी मंडई, डेअरी, बेकरी, मटण, चिकन, अंडी दुकाने तसेच सर्व प्रकारच्या खाद्यपदार्थ दुकाने सकाळी 7 ते दुपारी 1 पर्यंत सुरू ठेवता येणार आहेत. केवळ दूध संकलनसाठी डेअरी चालकांना सायंकाळी 6 ते 7 पर्यंत परवानगी दिली आहे. या शिवाय कोरोना चाचणी निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र दुकानात लावणे बंधनकारक आहे. पालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी सुधारित आदेश काढले आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या दुकानांच्या मालकांनी ग्राहकांना उभे राहण्याकरिता किमान एक मीटर अंतरावर गोल रिंगण आखणे आवश्यक राहील व भारत सरकारच्या दिलेल्या निकषानुसार लवकरात लवकर लसीकरणं करून घ्यावे सर्व दुकानदारांनी कोविड19 बाबत सुरक्षेचे सर्व उपाय जसे की पारदर्शकता काचेतून ग्राहकांशी संवाद साधने किंवा फेशिल्ड, इलेक्ट्रॉनिक पेमेंट इत्यादीचे काटेकोर पणे वापर करावे तसे न केल्यास महानगरपालिकेच्या वतीने त्यांच्यावर ती कारवाई करण्यात येईल अशी माहिती आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली.
https://twitter.com/SurajyaDigital/status/1382957776675082240?s=20
* सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचा हाहाकार
– सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचा हाहाकार, आज शुक्रवारी जिल्ह्यात तब्बल दीड हजार लोकांचे अहवाल पॉझिटिव्ह
– एका दिवसात तब्बल 1500 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर 24 जणांचा मृत्यू,
– शहरातील 371 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर 7 जणांचा मृत्यू,
– ग्रामीण भागात 1129 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आणि 17 जणांचा मृत्यू
https://twitter.com/SurajyaDigital/status/1383060182993752067?s=20