Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापुरातील पाच उपजिल्हाधिका-यांच्या बदल्या; नव्याने तीन उपजिल्हाधिकारी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूर

सोलापुरातील पाच उपजिल्हाधिका-यांच्या बदल्या; नव्याने तीन उपजिल्हाधिकारी

Surajya Digital
Last updated: 2020/10/03 at 12:23 AM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

सोलापूर : सोलापूर जिल्हा महसूल प्रशासनातील उपजिल्हाधिकारी दर्जाच्या पाच व तहसीलदार दर्जाच्या पाच अधिकाऱ्यांच्या बदल्या महसूल विभागाने केल्या आहेत. बार्शी व माळशिरस या तालुक्‍यांना नवीन तहसीलदार मिळाले असून सोलापूर जिल्ह्यातील उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांची पुन्हा सोलापूर जिल्ह्यात बदली झाली आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

भूसंपादन क्रमांक एकचे अधिकारी दीपक शिंदे यांची बदली दक्षिण सोलापूर व अक्कलकोटच्या प्रांत अधिकारी पदी झाली आहे. निवडणूक शाखेच्या उपजिल्हाधिकारी स्नेहल भोसले यांची बदली पुणे येथे भूसंपादन अधिकारी पदी झाली आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी उत्तम पाटील यांची बदली पुणे जिल्ह्यात पुनर्वसन अधिकारी म्हणून झाली आहे.

रोजगार हमी शाखेचे उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण यांची बदली पुणे जिल्ह्यातील खेड-राजगुरुनगरचे प्रांताधिकारी पदी झाली आहे. सोलापुरातील भूसंपादन क्रमांक सातचे अधिकारी शैलेश सूर्यवंशी यांची बदली सातारा जिल्ह्यातील माण-खटावच्या प्रांताधिकारी पदी झाली आहे.

* नव्याने तीन उपजिल्हाधिकारी

सोलापूर जिल्ह्यात नव्याने तीन उपजिल्हाधिकारी आले आहेत. त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील महसूल शाखेचे उपजिल्हाधिकारी श्रावण क्षिरसागर यांची बदली सोलापुरात भूसंपादन अधिकारी क्र. 11 याठिकाणी झाली आहे. पुणे जिल्ह्यातील पुनर्वसन अधिकारी भारत वाघमारे यांची बदली सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक शाखेत झाली आहे. साताऱ्याच्या भूसंपादन अधिकारी डॉ. रेखा सोळंके यांची बदली सोलापूरच्या भूसंपादन अधिकारी क्रमांक एक पदी झाली आहे. सोलापुरातील निवडणूक शाखेचे तहसीलदार दगडू कुंभार यांची बदली मिरजच्या तहसीलदारपदी झाली आहे. सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या महसूल शाखेतील तहसीलदार श्रीकांत पाटील यांची बदली सोलापूर शहरातील अन्नधान्य वितरण अधिकारी कार्यालयात झाली आहे.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #सोलापूर #पाचउपजिल्हाधिकारी #बदल्या #नवे #तीन
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापुरात लाखाच्या बनावट नोटा जप्त; दोघांना अटक
Next Article बिहार निवडणूक : एनडीएचे जहाज फुटीच्या खडकावर आदळणार की काय ?

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?