Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: कोरोनाविषयी बेडची माहिती मिळणार एका क्लिकवर जिल्हा प्रशासनाचा उपक्रम
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूर

कोरोनाविषयी बेडची माहिती मिळणार एका क्लिकवर जिल्हा प्रशासनाचा उपक्रम

Surajya Digital
Last updated: 2020/08/21 at 6:41 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

सोलापूर : कोरोना झाला तर सामान्य जनतेला कोणत्या हॉस्पिटलमध्ये जावे… बेड उपलब्ध आहे का…महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेत आहे का…. याची माहिती नसते. मात्र आता दवाखान्याच्या नाव, फोनसह बेड उपलब्धतेची माहिती एका क्लिकवर मिळणार आहे. जिल्हा प्रशासनाने www.solapur.gov.in/corona या संकेतस्थळावर सामान्य जनतेला माहिती उपलब्ध करून दिली असल्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगितले.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा प्रशासनाने आपल्या आधुनिक उपक्रमाद्वारे सर्व नागरिकांना दिलासा दिला आहे. ग्रामीण भागातील सर्व कोविड सेंटरमधील, सामान्य तसेच महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत खाटांच्या उपलब्धतेची माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. ही माहिती नियमित दररोज अपडेट केली जात असून सध्यस्थितीत माहिती बिनचूक ठेवण्याचे आदेश सर्व कोविड सेंटर्सना देण्यात आले आहेत. जिल्ह्यातील कोरोनाच्या डीसीएच, डीसीएचसीमधील अद्ययावत बेडची माहिती सामान्य जनतेसह जिल्हा प्रशासनाला पाहता येते. या संकेतस्थळाचे संपूर्ण नियंत्रण अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव आणि जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत हे करीत आहेत.

*  जनतेचा वेळ वाचणार

संकेतस्थळाच्या उपक्रमामुळे कोरोनाविषयी दवाखान्यांची, बेडच्या उपलब्धतेची माहिती सामान्य जनतेला एका छताखाली मिळणार आहे. दवाखाना शोधायला लागत नसल्यामुळे जनतेचा वेळ वाया जाणार नाही. पर्यायी दवाखान्यांची माहिती मिळाल्याने कोरोना रूग्णांवर त्वरित उपचार होणार आहेत, असेही श्री. शंभरकर यांनी स्पष्ट केले.

* कसे वापराल

www.solapur.gov.in/corona या संकेतस्थळावर जावून सोलापूर जिल्हा (ग्रामीण) – कोविड रुग्णासाठी हॉस्पिटल निहाय खाटांची माहिती, यावर क्लिक केल्यास तालुकानिहाय खाटांची माहिती त्वरित मिळते. यामध्ये दवाखाना, त्यांचा संपर्क क्रमांक, पत्ता, एकूण खाटा, कोरोनासाठी खाटा, रिकाम्या खाटा यांची संपूर्ण माहिती मिळते. याशिवाय जिल्ह्यातील महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेत समाविष्ट 16 दवाखान्याची माहितीही याचपद्धतीने देण्यात आली. दररोज हे संकेतस्थळ दोनवेळा अपडेट केले जात असल्याने उपलब्ध खाटांची माहिती मिळण्यास मदत होत आहे.

*  आठवडाभरात ॲपद्वारेही माहिती

संकेतस्थळाव्यतिरिक्त कोरोना रूग्णालयांची आणि उपलब्ध खाटांची माहिती अजून सोईस्कररित्या मिळण्यासाठी ॲप तयार करण्यात येत आहे. आठवडाभरात आता ॲपद्वारेही माहिती जनतेला मिळणार आहे. यामुळे ॲपद्वारे आणि मोबाईलवरही माहिती सहज जनतेसाठी उपलब्ध होणार असल्याचे जिल्हाधिकारी शंभरकर यांनी स्पष्ट केले.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #सोलापूर #कोरोना #माहिती #एका #क्लिकवर
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापूर शहरात 37 कोरोनाग्रस्ताची भर; एक मृत्यू तर 38 जणांची मात
Next Article कॉलरट्यूनला नागरिकदेखील कंटाळले; कॉलरट्यून बंद करण्याची मनसेचे मागणी

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?