–पैशावरून कडाक्याचे भांडण,दोस्त भडकला
छातीत सत्तूर खुपसून मित्राचाच घात केला
मंगळवेढा तालुक्यातील बोराळे गावात रात्रीचा थरार
केवळ 12 तासात खुन्याला जेरबंद करण्यात यश
मंगळवेढा- प्रतिनिधी
मंगळवेढा तालुक्यातील बोराळे गावात रविवारी रात्री थरार घडला. ठिबक सिंचनासाठी दिलेले पैसे मागूनही न दिल्याने👍 दोन मित्रांमध्ये फोनवर कडाक्याचे भांडण झाले. वारंवार पैसे मागूनही तो देत नाही, याचा दुसर्या मित्राला राग आला. त्याने रात्री भर चौकात जावून आपल्याच मित्राच्या छातीत सत्तूरने वार करून त्याचा खून केला आणि तेथून रात्रीच पसार झाला. ही घटना रात्री साडे नऊच्या सुमारास छत्रपती चौकात घडली. महेश उदयकुमार गोवर्धन असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून आरोपी भिमराव उर्फ बाळू कृष्णा चौगुले वय 35 वर्षे, रा. बोराळे ता. मंगळवेढा यास बारा तासांच्या आत अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की- आरोपी भिमराव उर्फ बाळू कृष्णा चौगुले याने मध्यस्थी राहुन मयत महेश उदयकुमार गोवर्धन यास बटईने घेतलेल्या े तामदर्डी येथील शेतीसाठी लागणारे ठिबक सिंचनचे साहित्य घेवून दिले होते. त्याचे पैसे गोवर्धन याच्याकडून येणेबाकी होते. आरोपी हा त्या पैशाची फोनवरुन मागणी करत होता. त्यावेळी त्यांच्यात फोनवर वादावादी झाली होती. त्याचा राग मनात धरुन भिमराव उर्फ बाळू चौगुले याने सोमवारी सुमारास बोराळे ता. मंगळवेढा येथील छत्रपती चौकात मयत गोवर्धन याच्या छातीत चाकू सारख्या हत्याराने वार करुन, त्यास गंभीर दुखापत करुन जीवे ठार मारले. याप्रकरणी महेशचे वडील उदयकुमार दादाराव गोवर्धन व्य 65 वर्ष व्यवसाय- मजुरी रा मठ विभाग बोराळे ता मंगळवेढा यांनी फिर्याद दिली असून त्यानुसार भिमराव चौगुले विरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
सुमारे एक वर्षापासून प्रमोद प्रभाकर स्वामीं रा पुणे यांची बोराळे हद्दीत असलेली आठ एकर शेत जमिन बटईने घेतली असून महेश हा त्यावर उदरनिर्वाह करायचा. माझा मुलगा महेश याचे गावात राहणारा बाळु चौगुले याच्याशी मैत्री असल्याने ते दोघेजण शेतात काय काम असल्यास मिळून जात येत होते.
धमकी दिली आणि करून दाखवले सोमवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास बाळु चौगुले हा मोटारसायकवरुन घरी आला व त्याने आम्हाला महेश कोठे गेले आहे तो मला आज भेटला नाही असे म्हणून तो परत निघून गेला त्यानंतर सायंकाळी साडेसहाच्या सुमारास परत बाळू चौगुले हा मोटारसायकल वरुन एकटाच घरी आला आम्हाला महेश घरी आला नाही का? त्याला आज सोडत नाही जिवे ठार मारतो असे म्हणून शिवीगाळ करुन निघुन गेला,असे फिर्यादीत नमूद आहे.
बारा तासात अटक खून केल्यानंतर भिमराव हा तेथून पसार झाला.पोलिसांनी परिसरात पथके पाठवून त्याला पकडण्याची मोहीम राबवली.तो तामदर्डी परिसरात लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.अवघ्या 12 तासात पोलिसांनी ही मोहीम फत्ते केली.
ही कामगिरी मंगळवेढा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्ताञय बोरीगिड्डे,सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद लातुरकर,सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश वाघमोडे, विजय पिसे, खंडागळे, वाघमोडे, पवार, कांबळे, गेजगे, दुधाळ, देशमुख यांच्या पथकाने केली आहे. गुन्ह्याचा अधिक तपास सपोनि अंकुश वाघमोडे हे करत आहेत.