प्रतिनिधी
अकलुज -रात्रीच्या वेळी घरावर दगड का टाकले ? अशी विचारणा केल्याच्या कारणावरून विळयाने केलेल्या मारहाणीत वृद्धपिता आणि त्यांचा मुलगा असे दोघेजण जखमी झाले. ही घटना बोरगाव (ता.माळशिरस) येथे शनिवारी रात्रीच्या सुमारास घडली .
ज्ञानेश्वर शामराव बचुटे (वय ६६ ) आणि त्यांचा मुलगा सुशांत बचुटे (वय ३० रा.बोरगाव) अशी जखमींची नावे आहेत. या संदर्भात ज्ञानेश्वर बचुटे यांनी अकलूज पोलिसात फिर्याद दाखल केली. त्याप्रमाणे पोलिसांनी शिवाजी शामराव भोसले (रा. बोरगाव ) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. शिवाजी भोसले याने शनिवारी रात्री १९ वाजेच्या सुमारास बचुटे यांच्या घरावर टाकला होता. या संदर्भात ज्ञानेश्वर यांनी त्यास विचारणा केली असता त्याने हातातील विळ्याने त्यांना आणि भांडण सोडवण्यात आलेल्या त्यांच्या मुलाला मारहाण करून जखमी केले. अशी नोंद पोलिसात झाली. हवालदार जाधव पुढील सभास करीत आहेत.