Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पंढरपूर  ।  पुजाऱ्याच्या धाडसामुळे देवीच्या पादुका चोरणारा जेरबंद
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

पंढरपूर  ।  पुजाऱ्याच्या धाडसामुळे देवीच्या पादुका चोरणारा जेरबंद

Surajya Digital
Last updated: 2023/03/19 at 8:31 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE
पंढरपूर  – श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या परिवार देवता पैकी एक असणाऱ्या श्री अंबाबाई देवी मंदिरातील पितळेच्या पादुका चोरून नेणाऱ्या चोरट्यास समितीच्या पुजाऱ्याने पाठलाग करून पोलिसांच्या ताब्यात दिले. Pandharpur. Jailed Solapur criminal who stole the goddess’s shoes due to the courage of the priest
याप्रकरणी पंढरपूर तालुक्यातील आढीव  येथील बाळू मच्छिंद्र खाडे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती अशी की, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या अंतर्गत 28 परिवार देवता असून यापैकी चंद्रभागेच्या काठावर अंबाबाई देवीचे मंदिर आहे. रविवारी सकाळी नेहमीप्रमाणे येथील पुजारी महेश दिलीप मंजरतकर हा सकाळी पूजा केल्यानंतर मंदिरातील परिसराची स्वच्छता करीत असताना देवीच्या समोरील पाच किलो वजनाच्या दर्शनासाठी ठेवलेल्या पितळी पादुका नसल्याचे त्याच्या लक्षात आले. सदर पादुकांचा शोध घेत असताना मंदिराच्या दरवाज्यातून एक व्यक्ती पळून जाताना मंजरतकर याने पाहिले. संशय आल्यामुळे त्याने सदर व्यक्तीचा पाठलाग करून त्यास महाद्वार येथे पकडले. सदर चोरट्यास पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. मंदिर समिती पुजाऱ्याने दाखविलेल्या धाडसामुळे सदर चोरटा जेरबंद झाला.

○ लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील घरातील आटा चक्कीला आग

सोलापूर :  बेगमपेठ येथील लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील पाचव्या मजल्यावर राहणाऱ्या रहिवाशांच्या घरातील आटा चक्कीला शनिवारी रात्री आग लागली.याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान हे घटनास्थळी दाखल झाले.दरम्यान,त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करीत आग लगेच विझवली.ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याची प्राथमिक माहिती अग्निशमन दलाचे केदार अवटे यांनी दिली.यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

○ हॅण्डल लॉक असलेली दुचाकी घरासमोरुन केली लंपास

 
सोलापूर : घरासमोर हॅण्डल लॉक करून ठेवलेली दुचाकी क्रमांक एम.एम.१३. डी.एच. ६८३४ ही अज्ञात चोरट्याने दि.१७ मार्च रोजी दुपारी एक ते सव्वा दोन वाजण्याच्या दरम्यान भावनाऋषी हॉस्पिटल फुलारी अपार्टमेंट न्यू पाच्छा पेठ येथे घडली.
याप्रकरणी विजय आप्पाराव सालवे (वय-५५, रा.भावनाऋषी हॉस्पिटल, फुलारी अपार्टमेंट) यांनी जेलरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा पुढील तपास सहायक फौजदार अवचारे हे करीत आहेत.

● लग्नात मानपान केला नाही म्हणून विवाहितेचा छळ ; पतीसह चौघांवर गुन्हा

सोलापूर :  तुझ्या वडिलांनी लग्नात हुंडा दिला नाही व योग्य मानपान केला नाही तसेच तुझ्या वडिलांनी दोन तोळे सोने दिले नाही असे म्हणत चार तोळे सोने व चार चाकी गाडी घेण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये घेऊन ये म्हणून विवाहितेला घरात उपाशी कोंडून शारीरिक व मानसिक त्रास देऊन छळ केल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना सन २०१४ ते ५ ऑगस्ट या कालावधी दरम्यान फिर्यादी यांच्या सासरी घडली. याप्रकरणी नेहा प्रज्योतीपती वास्टर (वय-२७,रा.रविवार पेठ) यांनी जेलरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पती प्रज्योतीपती यादगीरराव वास्टर, दीर बलभीम यादगीरराव वास्टर, सासरे यादगीरराव विश्वनाथ वास्टर व नणंद वंदना सुनील भालेराव (सर्व.रा.जोशी वाडा, हैदराबाद) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा पुढील तपास पोसई मोतेकर हे करीत आहेत.

You Might Also Like

उजनीतून ३७ लाख युनिट वीजनिर्मिती

सोलापूर विमानतळ परिसराची संयुक्त पाहणी

भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर

भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत

सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल

TAGGED: #Pandharpur #Jailed #Solapur #criminal #stole #goddess's #shoes #dueto #courage #priest, #पंढरपूर    #पुजारी #धाडस #देवी #पादुका #चोरणारा #जेरबंद
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी आजी माजी आमदार अधिकाऱ्यासह शेतकऱ्याच्या बांधावर; पंचनामे सुरू
Next Article सोलापूर । भाजपच्या निवडणुकीचे नेतृत्व आता यंग ब्रिगेडच्या हाती

Latest News

वडोदरा पूल दुर्घटना – पंतप्रधानांकडून मृतांच्या कुटुंबियांसह जखमींसाठी आर्थिक मदत जाहीर
Top News July 9, 2025
संजय गायकवाडांना समज देणार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राजकारण July 9, 2025
इंग्लंडचे माजी पंतप्रधान ऋषी सुनक गोल्डमन सॅक्समध्ये वरिष्ठ सल्लागार म्हणून सामील होणार
देश - विदेश July 9, 2025
महाराष्ट्रासारखंच बिहारमध्ये मतांच्या चोरीचा प्रयत्न सुरू – राहुल गांधी
Top News July 9, 2025
मला सरकार चालवल्याबद्दल नोबेल मिळाला पाहिजे- अरविंद केजरीवाल
Top News July 9, 2025
राजस्थानात हवाई दलाचे लढाऊ विमान कोसळले, दोन मृतदेह सापडले
देश - विदेश July 9, 2025
केजरीवालांच्या याचिकेवर दिल्ली हायकोर्टाची ईडीला नोटीस
Top News देश - विदेश July 9, 2025
मुंबई, मराठी माणसाच्या भल्यासाठी राज आणि मी एकत्र आलोय – उद्धव ठाकरे
राजकारण July 9, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?