Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: नूतणीकृत इंद्रभुवन इमारतीचे गुरुवारी उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

नूतणीकृत इंद्रभुवन इमारतीचे गुरुवारी उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

Surajya Digital
Last updated: 2023/05/24 at 5:09 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

 

सोलापूर : महापालिका आवारातील सोलापूरच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या 110 वर्षांच्या हेरिटेज वास्तू असलेल्या नूतनीकृत इंद्रभुवन इमारतीचे लोकार्पण गुरुवार, 25 मे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. ऑनलाइन कळ दाबून हा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती महापालिका अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी दिली. Deputy Chief Minister Solapur Devendra Fadnavis inaugurated the renovated Indrabhuvan building on Thursday.

110 वर्षांच्या इंद्रभुवन या हेरिटेज वास्तूला जतन करण्यासाठी स्मार्ट सिटीच्या 5.13 कोटीच्या निधीतून नुतनीकरण करण्यात आले आहे. साधारणतः 11महिन्यात या इमारत नूतनीकरणाचे काम नेटक्या पद्धतीने करण्यात आले आहे. सनरक्षण हेरिटेज कन्सल्टंट या कंपनी मार्फत हे नूतनीकरणाचे काम करण्यात आहे. कंजर्वेशन आर्किटेक्चर मुनिश पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे 150 कारागीर यासाठी परिश्रम घेतले आहेत.

 

या इमारतीवर आकर्षक विद्युत रोषणाई कायमस्वरूपी करण्यात आली आहे. यामुळे अत्यंत मनोहारी आणि विलोभनीय असे इमारतीचे दर्शन घडत आहे. अतिशय उत्कृष्ट पद्धतीने कारागिरांनी या इमारतीला गत सौंदर्य प्राप्त करून दिले.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

 

दरम्यान, महापालिका अधिकाऱ्यांच्या कार्यालयासाठीची अंतर्गत फर्निचर व इतर कामे हाती घेण्यात येत आहेत. त्यानंतर महापालिकेच्या प्रमुख अधिकाऱ्यांची कार्यालये या इंद्रभुवन इमारतीत पुन्हा स्थलांतरित करण्यात येतील. या इंद्रभवन इमारतीत महापालिका आयुक्त, 2 अतिरिक्त आयुक्त, दोन उपायुक्त, चार सहाय्यक आयुक्त यांची कार्यालय राहणार आहेत तर खाली कलादालन असणार आहे. यामध्ये ऐतिहासिक वस्तू संग्रहालय राहणार आहे.

● दुसऱ्या मजल्यावर आयुक्तांचे कार्यालय तर पहिल्या मजल्यावर सेंट्रल हॉल

मुंबईनंतर सोलापुरात हेरिटेज वास्तूमध्ये महापालिका आयुक्तांचे कार्यालय आहे. सोलापुरातील इंद्रभुवन ही वास्तू हेरिटेज वास्तू आहे. 110 वर्षांपूर्वी आकर्षक अशी ही इमारत उभारण्यात आली होती. नूतनीकरणामुळे या इमारतीला दिमाखदार असे गतवैभव प्राप्त झाले आहे. या इमारतीत खालच्या बाजूला कलादालन, ऐतिहासिक वस्तू संग्रहालय राहणार आहे. यामध्ये पूर्व इतिहास असलेले छायाचित्रही लावण्यात आले आहेत तसेच पहिल्या मजलावर सेंट्रल हॉल राहणार आहे तर दुसऱ्या मजल्यावर महापालिका आयुक्तांचे कार्यालय राहणार आहे.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #Inauguration #renovated #Indrabhuvan #building #DeputyChiefMinister #Solapur #Thursday #Devendrafadanvis, #नूतणीकृत #इंद्रभुवन #इमारत #गुरुवारी #उपमुख्यमंत्री #देवेंद्रफडणवीस #लोकार्पण #सोलापूर
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article नाना बनले… ‘हायकंमाड’ ! थोडी हवेची नशा चढते ?
Next Article पोलीस निरीक्षकांसह 300 पोलिसांच्या अंतर्गत बदल्या

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?