Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पोलिसांवर केलेल्या जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी तिघांना पाच वर्षांची सक्तमजुरी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

पोलिसांवर केलेल्या जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी तिघांना पाच वर्षांची सक्तमजुरी

Surajya Digital
Last updated: 2021/03/03 at 6:09 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

सोलापूर : सराईत गुन्हेगारांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिस पथकावर चिंचोली काटी येथे जीवघेणा हल्ला झाला. या हल्ल्यात पोलिस नाईक सुभाष शेंडगे यांच्या डाव्या पायाच्या घोट्यास व हातास गंभीर जखम झाली. या प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. पी. आव्हाड यांनी आरोपींना पाच वर्षांच्या सक्‍तमजुरीची शिक्षा ठोठावली.

सराईत गुन्हेगार बापू चव्हाण, लखन श्‍यामराव काळे व किसन श्‍यामराव काळे असे शिक्षा ठोठावलेल्या आरोपींची नावे आहेत.  सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार लखन काळे व किसन काळे हे चिंचोली काटी (ता. मोहोळ) येथील त्यांचे नातेवाईक बापू चव्हाण यांच्या घरात लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर 1 नोव्हेंबर 2014 रोजी पोलिस उपनिरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली दहा पोलिसांचे पथक त्या ठिकाणी पोचले.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

चव्हाण याला पोलिस कारवाईची चाहूल लागली. त्यानंतर त्याने लखन व किसन काळे यांना सावध केले. चव्हाण हा कुऱ्हाड घेऊन बाहेर आला तर दोन्ही काळे तलवारी घेऊन घराबाहेर आले. पोलिस आणि त्यांच्यात झालेल्या झटापटीत एकाने पोलिस नाईक सुभाष शेंडगे यांच्या डोक्‍यात वार करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी तो हुकवण्यासाठी उजवा हात समोर केला आणि त्यात त्यांच्या हाताचे हाड मोडले. त्यानंतर किसन काळे याने शेंडगे यांच्या पायावर वार करून त्यांचा घोटा तोडला.

या प्रकरणानंतर मोहोळ पोलिसांनी तत्काळ तपास करीत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. हल्ल्यानंतर तिघेही हत्यारे घेऊन पसार झाल्याने हत्यारे जप्त केलेली नव्हती. न्यायालयाने सरकारी वकिलांचा युक्‍तिवाद ग्राह्य धरून तिघांनाही पाच वर्षांच्या सक्‍तमजुरीची शिक्षा ठोठावली. या प्रकरणात सरकारतर्फे ॲड. शांतवीर महिंद्रकर यांनी तर आरोपींतर्फे ॲड. गडदे यांनी काम पाहिले.

You Might Also Like

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

TAGGED: #Solapur #districtcourt #5yearcanvention, #पोलिसांवर #जीवघेण्या #हल्ल्याप्रकरणी #तिघांना #सक्तमजुरी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article “आई-बहिणीची थट्टा होणार असेल तर राष्ट्रपती राजवट हा एकच मार्ग”
Next Article साता-यात पेट्रोलची पाइपलाइन फोडली, विहिरीही पेट्रोलने भरल्या

Latest News

पहिली ते चौथी हिंदी भाषा नसावी – उपमुख्यमंत्री पवार
Top News June 27, 2025
गुजरात : जगन्नाथ रथयात्रेत बिथरले हत्ती, अनेक जखमी
देश - विदेश June 27, 2025
आषाढी एकादशीनिमित्त पुणे विभागातून आणखी तीन विशेष रेल्वे
Top News June 27, 2025
उबाठा कामगार सेनेचे डॉ.काकडे यांचा रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश
महाराष्ट्र June 27, 2025
युद्धबंदीनंतरही इस्रायलचा इराणला त्यांचे युरेनियम परत करण्याचा इशारा
देश - विदेश June 27, 2025
युद्धविरामानंतर खामेनी यांचा इस्रायल विरुद्धच्या युद्धात विजयाचा दावा
देश - विदेश June 27, 2025
तळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिला – डॉ. जब्बार पटेल
महाराष्ट्र June 27, 2025
पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला
महाराष्ट्र June 27, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?