Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापूर जिल्हा वार्षिक योजनेच्या 349.87 कोटी रुपयांच्या आराखड्यास मान्यता
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsअर्थाअर्थसोलापूर

सोलापूर जिल्हा वार्षिक योजनेच्या 349.87 कोटी रुपयांच्या आराखड्यास मान्यता

Surajya Digital
Last updated: 2021/01/23 at 7:00 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

सोलापूर : जिल्हा वार्षिक योजनेच्या सन 2021-22 साठीच्या 349.87 कोटी रुपयांच्या प्रारुप आराखड्यास आज शनिवारी मान्यता देण्यात आली. जिल्ह्याच्या प्राधान्याच्या योजना लक्षात घेऊन वार्षिक योजनेसाठी 95 कोटी रुपयांची अतिरिक्त मागणी केली जाणार असल्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.

पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. जिल्हा नियोजन भवनमध्ये झालेल्या या बैठकीस व्यासपीठावर जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुध्द कांबळे, खासदार ओमराजे निंबाळकर, रणजितसिंह नाईक निंबाळकर, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्त पि. शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा नियोजन अधिकारी सर्जेराव दराडे उपस्थित होते. कोरोना काळात निधन झालेले जेऊरवाडी ग्रामपंचायतीचे शिपाई गणपत जाधव यांची पत्नी सुरताबाई जाधव व मुलगा रमेश जाधव यांना पालकमंत्री भरणे यांच्या हस्ते 50 लाखांच्या निधीचा धनादेश देण्यात आला.

पालकमंत्री भरणे यांनी सांगितले, सन 2021-22 च्या आराखड्यासाठी सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेसाठी यंत्रणाकडून 802.53 कोटी रुपयांची मागणी आली होती. जिल्हा नियोजन समितीने 349.87 कोटी रुपयांच्या आराखड्यास मंजुरी दिली. अनुसूचित जाती उपयोजनेसाठी 181.82 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. मात्र 151.67 कोटी रुपयांच्या आराखड्यास मंजुरी देण्यात आली. आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजनांसाठी 4.15 कोटी रुपयांच्या आराखड्यास मान्यता देण्यात आली.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

जिल्ह्यातील प्राधान्याच्या सर्वसाधारण योजनेसाठी 95 कोटी रुपयांची अतिरिक्त मागणी केली जाणार आहे. उपमुख्य मंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत ही अधिकची मागणी केली जाईल, असे भरणे यांनी सांगितले.

राज्य शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निधी वितरणासाठी काही निर्बंध घातले होते मात्र आता 2020-21 साठीचा जिल्हा नियोजन समितीचा पूर्ण निधी उपलब्ध झाला आहे. या निधीच्या खर्चाचे नियोजन करण्यात आले आहे. अधिकाऱ्यांनी याबाबत पुढाकार घेवून काम करावे आणि विकासकामे वेळेत पुर्ण करावीत असे पालकमंत्री भरणे यांनी सांगितले.

बैठकीत जिल्हा परिषदेच्या सोलापूर शहरातील शाळांचे महानगरपालिकेकडे हस्तांतरण, पालखी मार्गावरील शाळांच्या पुनर्बांधणी, कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्यांची दुरुस्ती, राष्ट्रीयकृत बॅकामार्फत कर्ज वितरण आदी मुद्यांवर चर्चा झाली. बैठकीस आमदार बबनराव शिंदे, सुभाष देशमुख, विजयकुमार देशमुख, राजेंद्र राऊत, शहाजीबापू पाटील, संजय शिंदे, प्रशांत परिचारक, रणजितसिंह मोहिते पाटील, राम सातपुते, सचिन कल्याणशेट्टी, आमदार प्रणिती शिंदे यांच्यासह समितीचे सदस्य, पदाधिकारी आणि अधिकारी उपस्थित होते.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #सोलापूरजिल्हा #वार्षिकयोजनेच्या #349.87कोटीरुपयांचा #आराखड्यास #मान्यता
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article लालूप्रसाद यादवांची तब्येत आणखी बिघडली, उपचारासाठी पुत्र तेजस्वी यादव मुख्यमंत्र्यांना भेटणार
Next Article हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याचे अनावरण, अनेक दिग्गज एकत्र

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?