Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: माऊलींच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यात ‘हरी नामा’च्या गजरात आगमन
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Top News

माऊलींच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यात ‘हरी नामा’च्या गजरात आगमन

Surajya Digital
Last updated: 2022/07/04 at 10:26 PM
Surajya Digital
Share
5 Min Read
SHARE

 

Contents
□ जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले पालखीचे स्वागतस्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)□  पालखी सोहळा नातेपुतेकडे मार्गस्थ□ पालखी सोहळ्यात अशी यंत्रणा

□ जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले पालखीचे स्वागत

पंढरपूर – पंढरपूर आषाढी वारी सोहळ्यासाठी विठ्ठलाच्या दर्शनाच्या ओढीने आळंदीतून निघालेल्या संतश्रेष्ठ ‘श्री’ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे हरी नामाच्या गजरात आज सोलापूर जिल्ह्यात कारुंडे येथील धर्मपुरी बंगला येथे आगमन झाले. जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी माऊलींच्या पादुकांचे पूजन करून पालखीचे स्वागत केले. Mauli’s palanquin arrives in Solapur district on the eve of ‘Hari Nama’ Malshiras Natepute

 

संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी स्वागत समारंभास माजी आमदार रामहरी रूपनवर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव, अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिंमत जाधव,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, प्रांताधिकारी आप्पासाहेब समिंदर उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपुजे, तहसिलदार जगदिश निंबाळकर, गट विकास अधिकारी विनायक गुळवे, सरपंच अमोल पाटील आदी उपस्थित होते. तत्पूर्वी , माऊलीच्या पालखी सोहळ्यातील अश्वाचे पूजनही जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.

 

माऊलींच्या पालखीचे आगमन सकाळी 11.30.च्या सुमारास धर्मपुरी बंगला येथे झाले. तत्पूर्वी , सातारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बंन्सल, मुख्यकार्यकारी अधिकारी विनय गौडा, अप्पर पोलीस अधीक्षक अजय बोराडे , अतिरिक्त जिल्हाधिकारी माधवी सरदेशमुख तसेच जिल्हा प्रशासनातील अधिकारी यांनी माऊलींच्या पालखीला भावपूर्ण निरोप दिला.

चला पंढरीसी जाऊं। रखमुमादेविवरा पाहू॥

डोळे निवतील कान। मना तेथे समाधान ॥

संतां महंता होतील भेटी। आनंदे नाचो वाळवंटी॥

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

या संत तुकाराम महाराज अंभगाने हरिनामाच्या गजरात पालखीचा जिल्हाप्रवेश झाला. पालखी अगमनापूर्वी आयोजित कार्यक्रमात धर्मपुरी येथे आरोग्य विभागाने कला पथकाव्दारे आरोग्य विषयक विविध योजनांची वारक-यांमध्ये जागृती करण्यासाठी कार्यक्रम घेण्यात आले. वारीमधील महिला वारकऱ्यांसाठी माफक दरात सॅनिटरी पॅड उपलब्ध व्हावे म्हणून वेंडर मशीन विसावा ठिकाणी बसविली आहे, त्याप्रमाणेच आरोग्य विभागाने वारी मध्ये प्रथमच स्तनदा मातासाठी हिरकणी कक्ष सेवा उपलब्ध करून दिली आहे.

 

यावेळी जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी ‌शंभरकर यांच्या हस्ते आळंदी देवस्थानचे मुख्य विश्वस्त योगेश देसाई पालखी सोहळा प्रमुख ॲड. विकास ढगे तसेच बाळासाहेब चोपदार यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या आषाढी यात्रा २०२२ या सोलापूर जिल्हा माहिती पुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. त्यानंतर या ठिकाणी वृक्ष संवर्धनाचा संदेश देण्यासाठी सर्व मान्यवरांच्या हस्ते वृक्षरोपण करण्यात आले.

यावेळी जिल्हा प्रशासनातील सर्व मान्यवर अधिकाऱ्यांनी टाळ हाती धरुन हरी नामाचा गजर करीत पालखी सोहळ्याबरोबर विसाव्या पर्यंत पायी चालले. कांरुडे येथे विसावा घेऊन माऊलींची पालखी सोलापूर जिल्ह्यातील पहिल्या मुक्कामासाठी नातेपुतेकडे रवाना झाली.

 

पालखी सोहळ्याबरोबर येणाऱ्या वारकरी भाविकांना पालखी मार्गावर तसेच पालखी मुक्कामाच्या ठिकाणीस्वच्छ पिण्याचे, आरोग्य सुविधा, स्वच्छता,सुरक्षा तसेच विद्युत पुरवठा आदी आवश्यक सुविधा जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आल्या आहेत.

 

□  पालखी सोहळा नातेपुतेकडे मार्गस्थ

पालखी सोहळा नातेपुतेकडे मार्गस्थ होत असताना रिमझिम पावसात सुरुवात झाली माऊली पालखी सोहळा विठू नामाच्या गजरात रिमझिम पावसात भिजत पालखी सोहळ्याचे नातेपुते नगरीत स्वागत होताच नातेपुते नगरपंचायतच्या वतीने नगराध्यक्ष उत्कर्षा राणी पलंगे उपनगराध्यक्ष मालोजीराजे देशमुख सार्वजनिक बांधकाम सभापती अतुल पाटील पाणीपुरवठा व स्वच्छता सभापती स्वाती बावकर महिला व बालकल्याण सभापती संगीता काळे तसेच नातेपुते नगरपंचायत चे सर्व नगरसेवक, नगरसेविका, मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी पालखी सोहळ्याचे स्वागत केले.

सोहळ्यातील वारकरी मंडळींना सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने ठिकठिकाणी प्राथमिक उपचार करण्यासाठी आरोग्य कर्मचारी तसेच आरोग्य दुत यांच्या नेमणूका केल्या होत्या अनेक ठिकाणी पिण्यासाठी पाण्याचे टँकर, स्वच्छालयासाठी मोबाईल टॉयलेट उपलब्ध करून दिले होते. ग्रामस्थांच्या वतीने अनेक ठिकाणी दिंडीतील वारकऱ्यांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.

 

□ पालखी सोहळ्यात अशी यंत्रणा

४० अधिकारी ,१०५७ पोलीस कर्मचारी यांची पालखी सोहळ्यात बंदोबस्त करणार आहेत यामध्ये अप्पर पोलीस अधीक्षक १, उपविभागीय अधिकारी ४, पोलीस निरीक्षक ११, पुरुष सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस सब इन्स्पेक्टर २८, सहाय्यक अमलदार, अमलदार पोलीस निरीक्षक पोलीस सब इन्स्पेक्टर ६ ,पुरुष पोलीस अंमलदार ३५०, महिला पोलीस ९०, वाहतूक पोलीस ४८, व्हिडिओग्राफर ७, गामा कमांडो १६२ ,होमगार्ड ४००, एस. आर. पी. २ प्लाटून, बॉम्बशोधक पथक २ अशी यंत्रणा श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात लावण्यात आलीय.

सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हा बंदोबस्त लावण्यात आले आहे. दंगा करणाऱ्या व कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी निरीक्षण करण्यासाठी स्वयंसेवक व पोलीस यांचे पथक नेमण्यात आले आहे.

》 मनोज सोलवणकर ( सहाय्यक पोलीस निरीक्षक, नातेपुते पोलीस ठाणे )

 

You Might Also Like

पुणे – पालिकेच्या पाणी मीटर मोहिमेत अडथळा आणल्यास गुन्हा दाखल करण्याचे निर्देश

सरन्यायाधीशावर हल्ल्याचा प्रयत्न, लातूरातील वकिलांनी काढला मोर्चा

जर यावेळी युद्ध झाले, तर पाकिस्तानचा मोठा विजय होईल – पाक संरक्षणमंत्री

राष्ट्रवादी काँग्रेस : शरद पवारांचे असंख्य कार्यकर्ते अजित पवारांकडे

काँग्रेसने पोस्ट केलेल्या पंतप्रधान मोदींच्या आईचा एआय व्हिडिओवर भाजपाची टीका

TAGGED: #Mauli #palanquin #arrives #Solapur #district #HariNama #Malshiras #Natepute, #माऊली #पालखी #आषाढीवारी #सोलापूर #जिल्हा #हरीनाम #गजरात #आगमन #वेळापूर
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article विश्वासदर्शक ठरावावेळी सोलापूरचे दोन आमदार परदेश दौ-यावर, काँग्रेसचे दहा आमदार गैरहजर
Next Article वारकरी वेशभूषेत कलेक्टर, सिईओ अन् एसपी…!, हरीत वारीमुळे वारकरी व विश्वस्त सुखावले…!

Latest News

बिहार विधानसभा निवडणूक: एनडीएमध्ये जागावाटपाच्या सूत्रात बदलाची शक्यता
राजकारण October 14, 2025
राहुल गांधींनी घेतली आयपीएस अधिकारी वाय. पुरण कुमार यांच्या कुटुंबाची भेट
देश - विदेश October 14, 2025
चीनमध्ये 4.2 रिश्टर स्केलवर तीव्रतेचा भूकंप
देश - विदेश October 14, 2025
गडचिरोली : नक्षलवादी नेता ‘भूपती’चे 60 सहकाऱ्यांसह आत्मसमर्पण
महाराष्ट्र October 14, 2025
कर्नाटकातील १२ भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या घरांवर लोकायुक्तांनी टाकले छापे
देश - विदेश October 14, 2025
शांतता टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला एकत्र काम करावे लागेल – लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी
देश - विदेश October 14, 2025
धाराशिव जिल्हा परिषद गट आरक्षण जाहीर; ५५ पैकी २८ जागा महिलांसाठी राखीव
महाराष्ट्र October 14, 2025
धाराशिव : कोटक बँकेचा पूरग्रस्तांना मदतीचा हात
महाराष्ट्र October 14, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?