मुख्य हेडिंग
महाभयंकर : मानलेला भाऊ निघाला महागद्दार अन् विश्वासघातकी
विवाहितेला प्रियकरासह नेऊन शरिराचे तोडले अक्षरश: लचके
– ‘भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याला हरताळ फासून
– वासनेची भूक भागविण्यासाठी लॉजवर नेऊन
कंबरेच्या बेलटने मारहाण करत आळीपाळीने लुटली आब्रु
– जीव मारण्याची धमकी देऊन वासनेची आग शमली
शिवाजी भोसले
सोलापूर : भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याला हरताळ फासून वासनेची भूक भागविण्यासाठी मानलेल्या 34 वर्षीय बहिणीला तिच्या प्रियकरासह लॉजवर नेऊन आळीपाळीने शरिराचे लचके तोडत ‘त्या’ अभागी विवाहित महिलेची आब्रु लुटण्याचा महाभयंकर, अत्यंत संतापजनक अन् धक्कादायक प्रकार सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात बार्शी शहर हद्दीत घडला आहे. विवाहितेने वासनांधांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला तेव्हा, तिला कंबरेच्या पट्याने मारुन शांत करीत मानलेला भाऊ आणि प्रियकाराने वासनेची आग शमवली. यावेळी विवाहितेस जीवे मारण्याची धमकी या दोघांनी दिली. या महाभयानक घटनेने बार्शीचे समाजनमन अक्षरश: हादरले. त्या दोघा नराधमांनी जो प्रकार केला, त्याबद्दल संतापचा कडेलोट झाला.कानात शिशे ओतल्याप्रमाणे त्या नराधमांबद्दल संताप आल्याच्या प्रतिक्रिया येथील समाजमनातून उमटल्या.
या अत्यंत गंभीर प्रकरणी शारिरीक आणि मानसिक त्रास असह्य झाल्याने पिडित विवाहित महिलेने अखेर बार्शी तालुका पोलिस ठाण्यात शनिवार (ता.23) फिर्याद दिली. त्यावरुन प्रियकर सुरेश माळी आणि मानलेला भाऊ संतोष भानवसे या दोघा संशयितांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 376 (बलात्कार), 323 (मारहाण), 506 (जिवे मारण्याची धमकी) आणि 34 (सामूहिक कट) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींची पीडित महिलेशी आधीपासून ओळख होती. याचाच गैरफायदा आरोपींनी घेतला. 22 डिसेंबर 2024 रोजी शहरातील एका मंगल कार्यालयात पार पडलेल्या विवाह सोहळा पार पडल्यानंतर आरोपींनी महिलेला घरी सोडतो असे सांगून गाडीत बसवले. गाडी घरी न नेता, आरोपींनी तिला कुर्डूवाडी रोडवरील एका लॉजमध्ये नेले. लॉजवर पोहचल्यानंतर महिलेला संशय आल्याने तिने विरोध केला. त्यावर आरोपींनी जीवे मारण्याची धमकी देत कंबरेच्या पट्ट्याने मारुन जबरदस्तीने जबरी शरीरसंबंध ठेवल्याचे फिर्यादीत नमुद आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक बालाजी वळसने करत आहेत.
चौकट
लॉजमधील कर्मचार्यामुळे सुटली बिचारी
पीडितेनं विरोध केल्यानंतर आरोपींनी तिला कमरेच्या पट्ट्याने मारहाण केली. तसेच त्यांनी तिच्या कपड्यांची विटंबना करत किळसवाणं वर्तन केले. महिलेने मदतीसाठी आरडाओरड केली असता, लॉजचा कर्मचारी आवाज ऐकून घटनास्थळी धावला. त्याने दरवाजा उघडून महिलेची सुटका केली.
दोघा नरधमांना पोलीस कोठडीची हवा
सुरेश परसु माळी व संतोष भास्कर भानवसे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. या दोघांनाही अटक करून बार्शी न्यायालयात हजर करण्यात आले, त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. घटनेचा तपास सुरु आहे.
अत्याचार परिसिमा गाठत वरुन पुन्हा धमकी
विवाहित महिलेवर दोघा नरधमांनी अत्याचार तर केलाच केला. बहिण-भावाच्या पवित्र नात्याचे अक्षरश: कोळसा केला. अत्यंत बहिणीच्या शरिराचे लचके तोडण्याचा अत्यंत निंदणीय अन् किळसवाणी प्रकार केला. एवढ्यावर न थांबलेल्या संतोष भास्कर भानवसे या मानलेल्या भावाने प्रियकर सुरेश परसु माळी याच्या मदतीने धमकी दिली. तू गावात राहायचे नाही. तू पुण्यात जाऊन राहायचे. जर पोलिसात तक्रार दिली तर तुला जिवंत सोडणार नाही
नेमकं काय घडलं?
पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 34 वर्षीय विवाहित पीडितेचा नवरा पुण्यामध्ये सेंट्रींग काम करतो, तर पिडित विवाहित महिला तीन महिन्यांपासून आपल्या मुलीसोबत बार्शीमध्ये राहते. सुरेश परसु माळी याच्यासोबत संबंधित पिडितेचे सुमारे सात वर्षांपासून प्रेमसंबंध होते. सुरेशचा मित्र संतोष भास्कर भानवसे हा विवाहितेला बहीण मानत होता. सुरेश माळी व संतोष भानवसे हे दोघे सप्टेंबर महिन्यात पुण्यातून पीडितेला बार्शीकडे न्यायला आले. त्यास पीडितेने नकार देताच सुरेशने तिला मारहाण केली होती. त्यानंतर पिडित विवाहित महिला बार्शीत आल्यावर संतोषने सांगितले की, तू माझी बहीण आहेस. तुझं सुरेश (विवाहितेचा प्रियकर) ऐकतो. त्यामुळे त्याच्या मुलीसोबत माझ्या मुलाचे लग्न जमवून दे. तेव्हा सुरेशशी बोलून त्याच्या मुलीचे संतोषच्या मुलाशी लग्न जुळवून दिले. दि. 22 डिसेंबर 2024 रोजी पिडिता लग्नाला आली होती. लग्न झाल्यानंतर पीडितेचा पती जास्त दारूच्या नशेत असल्याने त्याला सुरेश माळी व संतोष भानवसे यांनी वर्हाडाच्या गाडीत पाठवून दिले. त्यानंतर रात्री साडे अकराच्या सुमारास या दोघांनी मिळून पिडितेस ‘चल तुला घरी तुझ्या गावी घेऊन जातो’ असे म्हणून सुरेश माळी याने त्याच्या स्वीफ्ट गाडीमध्ये बसवून कुर्डुवाडी रस्त्यावरच्या लॉजवर नेले. तिथे सुरेश माळी आणि संतोष भानवसे यांनी आळीपाळीने महिलेवर जबरी अत्याचार केला.
::::::::::::::::::::::::::
नराधमांच्या भितीपोटी पिडितेला तक्रार देण्यास उशीर
या प्रकारानंतर पीडितेला एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. दोन दिवस उपचार घेतल्यानंतर तिला डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर आरोपींनी तिला तुळजापूर रोडवर नेऊन पोलिसांत तक्रार दिल्यास जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली. भीतीपोटी महिलेला तक्रार नोंदवता आली नाही. पण आरोपी पीडितेचा छळ करत राहिले.अखेर मानसिक आणि शारीरिक त्रास सहन न झाल्याने पीडितेनं 23 मार्च 2025 रोजी बार्शी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.