Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सिद्धेश्वर एक्प्रेससह सोलापूर विभागातील पाच रेल्वेगाड्या गुरुवारपासून धावणार
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

सिद्धेश्वर एक्प्रेससह सोलापूर विभागातील पाच रेल्वेगाड्या गुरुवारपासून धावणार

Surajya Digital
Last updated: 2021/06/27 at 9:02 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

सोलापूर : कोरोनाची परिस्थिती सावरल्यानंतर रेल्वे मंत्रालयाने काही रेल्वेगाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये ‘सोलापूर-मुंबई सिद्धेश्वर एक्प्रेस’चाही समावेश आहे. सोलापूर विभागातील एकूण पाच रेल्वेगाड्या येत्या गुरुवार ( ता. 1 जुलै)पासून सुरू होणार असल्याची माहिती सोलापूर विभागाच्या वाणिज्य विभागाने दिली आहे.

फी माफ; पुणे विद्यापीठाचा निर्णय, कोणासाठी वाचा https://t.co/zSb6tkXVVF

— Surajya Digital (@SurajyaDigital) June 27, 2021

1 जुलैपासून ‘सिद्धेश्वर एक्प्रेस’ तिच्या निर्धारित वेळेत सुटणार. रेल्वेतून प्रवास करणा-यांना टेस्ट अथवा लसीकरणाचे बंधन नाही. रेल्वे स्थानकावर संशयितांची कोरोना टेस्ट होईल. प्रत्येकाचे थर्मल स्क्रीनिंग होणार. आजारपणात प्रवास नकोच. आरक्षण कन्फर्म झालेल्यांनाच प्रवास करता येईल. कोरोनाची लाट ओसरल्यानंतर आता 1 जुलैपासून सोलापूर-मुंबई सिद्धेश्वर एक्प्रेस पूर्वीच्या वेळेत धावणार आहे. त्याशिवाय सोलापूर विभागातून धावणा-या आणखी चार एक्प्रेस गाड्यांचाही त्यात समावेश आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता असल्याने रेल्वे स्थानकावर प्रत्येक प्रवाशाची ऑक्सिजन व टेम्परेचर लेव्हल तपासली जाणार आहे. तर, संशयितांची कोरोना टेस्टही केली जाऊ शकते. परंतु आरक्षित तिकिटाशिवाय अन्य कोणत्याच प्रवाशाला त्या रेल्वेगाड्यांतून प्रवास करता येणार नाही. आरक्षण कन्फर्म न झालेल्या व वेटिंगवरील प्रवाशांना प्रवास करता येणार नाही.

मिताली राजचा विक्रम ! सचिननंतर 'अशी' कामगिरी करणारी पहिली क्रिकेटर https://t.co/vN0TbbFC74

— Surajya Digital (@SurajyaDigital) June 27, 2021

गुरुवारपासून सुरू होणा-या रेल्वेत सोलापूर-मुंबई सिद्धेश्वर एक्प्रेस, सोलापूर-हसन एक्प्रेस, मुंबई-लातूर एक्प्रेस, मुंबई-बिदर एक्प्रेस आणि शिर्डी-दादर एक्प्रेसचा समावेश आहे.

कोरोनाचा धोका अजूनही पूर्णपणे टळला नसल्याने जनरल कोच सुरू करण्यासंदर्भात अजूनही निर्णय झालेला नाही. लाखो कर्मचा-यांचा पसारा सांभाळणा-या रेल्वेला कोरोनाच्या संकटामुळे आर्थिक अडचणीत टाकले. त्यातून आता मार्ग काढताना रेल्वे पूर्वपदावर येईल असे नियोजन करण्यात आल्याचेही अधिका-यांनी सांगितले.

सोलापूर : लॉकडाऊनमध्ये काळजी घेतली मात्र अनलॉकमध्ये बेजबाबदार का ? पहा सोलापूरची बालकलाकार ओवी तडवळकर काय सांगतीय, ऐका थोडं… #ovi #ओवी #लॉकडाऊन #surajyadigital #lockdown #Unlock #solapur #सोलापूर #care #listen #सुराज्यडिजिटल pic.twitter.com/WcAL7qtszq

— Surajya Digital (@SurajyaDigital) June 27, 2021

You Might Also Like

सोलापूर : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत तारण ठेवलेले सोने निघाले बनावट

सोलापूर जिल्ह्यातील सरपंचांसाठी नव्याने आरक्षण सोडत काढली जाणार

सोलापूर : रुग्णालयात उपचाराविना थांबवून ठेवलेल्या नवजातासह आईचा मृत्यू

सोलापुरातील स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी

उजनीतून ३७ लाख युनिट वीजनिर्मिती

TAGGED: #Fivetrains #Solapur #division #Siddheshwar #Express #run, #सिद्धेश्वरएक्प्रेस #सोलापूर #विभागातील #पाचरेल्वेगाड्या #धावणार
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article फी माफ; पुणे विद्यापीठाचा निर्णय, कोणासाठी वाचा
Next Article सोलापूर : सोमवार ते शुक्रवार चार वाजेपर्यंत दुकाने राहणार सुरु

Latest News

कपिल शर्माच्या हॉटेलवरील हल्ल्यात खलिस्तानी दहशतवाद्यांचा हात
देश - विदेश July 11, 2025
अमेरिकेकडून लेखी हमी मिळेपर्यंत अणु चर्चा नाही -इराण
देश - विदेश July 11, 2025
गुजरात पूल दुर्घटना : मृतांचा आकडा १७ वर तर ३ जणांचा शोध अजूनही सुरू, ४ अधिकारी निलंबित
देश - विदेश July 11, 2025
सोलापूर : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत तारण ठेवलेले सोने निघाले बनावट
सोलापूर July 10, 2025
सोलापूर जिल्ह्यातील सरपंचांसाठी नव्याने आरक्षण सोडत काढली जाणार
सोलापूर July 10, 2025
crime
सोलापूर : रुग्णालयात उपचाराविना थांबवून ठेवलेल्या नवजातासह आईचा मृत्यू
सोलापूर July 10, 2025
पावसाळ्यात वाढला डेंग्यूचा धोका; सहा महिन्यात २८७ जणांना डेंग्यूची लागण
महाराष्ट्र July 10, 2025
सोलापुरातील स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी
सोलापूर July 10, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?