Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: रस्त्यात एसटी बसचे स्टिअरिंग झाले लॉक; लग्न सोहळ्यासाठी निघालेल्या कारला नेले फरफटत
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

रस्त्यात एसटी बसचे स्टिअरिंग झाले लॉक; लग्न सोहळ्यासाठी निघालेल्या कारला नेले फरफटत

Surajya Digital
Last updated: 2023/05/21 at 9:03 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)□ विजापूर रोडवर पहाटे अपघात तरुण जागीच ठार

सोलापूर : भरधाव एसटी बसचे स्टिअरिंग लॉक झाले आणि कारला फरफटत नेल्याची घटना पंढरपूर- मल्हारपेठ मार्गावर घडली. यात चालकासह दोघे जण जखमी झाले आहेत. हा अपघात आज सकाळी पंढरपुरात झाला. Steering of ST bus got locked on the road; Pandharpur Solapur driver injured when a car going for a wedding was taken away

 

अपघातात कारचालकासह दोघे जण जखमी झाले. कारचालकाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला पंढरपूर येथील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले. हा अपघात आज रविवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास कटफळ (शेरेवाडी) स्टॉपजवळ घडला. कार चालक सोमनाथ गेनदेव शिंदे (३५) व केदारी भागवत पाटील, (वय ४५, दोघेही रा. निमगाव, ता. माढा), अशी जखमींची नावे आहेत.

पोलिस सूत्राकडील माहितीनुसार माढा तालुक्यात निमगाव येथील सोमनाथ गेनदेव शिंदे व त्यांचा मित्र केदारी भागवत पाटील हे दोघे जण मिळून रविवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास कार (एमएच ४५ एएल ८०२२)मधून सांगली जिल्ह्यात आटपाडी येथे विवाह सोहळ्यासाठी निघाले होते.

राज्य परिवहन महामंडळ, पाटण आगाराची एसटी बस (एमएच १४ / बीटी ४१०५) कराडहून सोलापूरला निघाली होती. दोन्ही वाहनांची पंढरपूर- मल्हार पेठ महामार्गावर कटफळ शिवारात समोरासमोर धडक झाली. अपघातात चालक सोमनाथ शिंदे व केदारी पाटील हे दोघे जण जखमी झाले. अपघातानंतर एसटी बसचेेे स्टिअरिंग लाॅक झाले आणि एसटीने कार तशीच पुढे फरफटत नेल्याचे पोलिसांनी सांगितले. सुदैवाने एसटीमधील प्रवाशांना काहीही झाले नाही.

अपघाताची माहिती मिळताच पोलिस हेडकॉन्स्टेबल बापूसाहेब झोळ, पोलिस नाईक केदारनाथ भरमशेट्टी, पोलिस कॉन्स्टेबल लक्ष्मण वाघमोडे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि मदत केली.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

□ विजापूर रोडवर पहाटे अपघात तरुण जागीच ठार

 

सोलापूर  – अनोळखी वाहनाच्या धडकेने पादचारी तरुण गंभीर जखमी होऊन जागीच मरण पावला . हा अपघात विजापूर रोडवरील बाकळे कलेक्शन जवळ शनिवारी पहाटेच्या सुमारास घडला.
 राहुल दिलीप राठोड (वय२६ रा. नेहरूनगर, विजापूर रोड ) असे मयताचे  नाव आहे. पहाटे अडीच वाजेच्या सुमारास  विजापूर रोडवरील बाकडे कलेक्शन जवळ तो अनोळखी वाहनाच्या अपघातात गंभीर जखमी आढळला होता. त्याला पोलिसांनी शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तो उपचारापूर्वी मयत झाला.
 मयत राहुल राठोड हा अविवाहित असून तो बाकळे कलेक्शन येथे कामाला होता. त्याच्या पश्चात आई, एक भाऊ आणि एक बहीण असा परिवार आहे. या अपघाताची नोंद विजापूर नाका पोलिसात झाली असून हवालदार म्हेत्रे पुढील तपास करीत आहेत.

You Might Also Like

भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर

भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत

सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल

पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर

मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या

TAGGED: #Steering #STbus #locked #ontheroad #Pandharpur #Solapur #driver #injured #car #wedding #takenaway, #रस्ता #एसटीबस #स्टिअरिंग #लॉक #पंढरपूर #सोलापूर #लग्नसोहळा #कार #फरफटत #अपघात #चालक
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सुशीलकुमार शिंदेंचा वारंवार अपमान होऊ देणार नाही : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले
Next Article भाजपचे तिन्ही आमदार एकत्र येणार; माने- हसापुरे एकदिलाने लढणार

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?