सोलापूर : मुंबई, पुण्यात काेराेना रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या बातम्या येत आहेत. त्यात काेराेनाच्या विषाणूने सोलापुरात शिरकाव केला आहे. शहरात एक आणि ग्रामीणमध्ये तीन रूग्ण नव्याने आढळून आले आहेत. Corona infiltration again in Solapur; Infected four people, including a doctor
शहरात दीड महिन्यानंतर एक रुग्ण आढळून आला आहे. हे रुग्ण म्हणजे एका खासगी रुग्णालयात कार्यरत असलेल्या डाॅक्टर आहेत. शहरात एक आणि ग्रामीणमध्ये तीन रूग्ण आढळले. शहरात जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात काेराेनाचा उद्रेक झाला हाेता. यानंतर स्थिती नियंत्रणात आहे.
दीड महिन्यापूर्वी एक रुग्ण आढळून आला हाेता. हा रुग्णही चारच दिवसांत बरा झाला. खासगी रुग्णालयात कार्यरत असलेल्या डाॅक्टरांची आराेग्य तपासणी आणि काेराेना चाचणी झाली. काेराेना चाचणी पाॅझिटिव्ह आल्याचे पालिकेला कळविण्यात आले.
ग्रामीण भागात शनिवारी (ता. 4) १४५ चाचण्या झाल्या. यातून तीन रुग्ण आढळून आले. यात दाेन पुरुष, तर एका महिलेचा समावेश आहे. ग्रामीणमध्ये शुक्रवारी दाेन रुग्ण आढळून आले. यामुळे ग्रामीण भागातील सक्रिय रुग्णांची संख्या पाच झाली आहे.
ग्रामीणमध्ये पाच सक्रिय रुग्ण आहेत. यात बार्शी तालुक्यात दाेन, मंगळवेढा, माेहाेळ, दक्षिण साेलापूर तालुक्यात प्रत्येकी एक रुग्ण आहे. अक्कलकाेट, करमाळा, माढा, माळशिरस, उत्तर साेलापूर, पंढरपूर, सांगाेला तालुक्यात शनिवारअखेर एकही रुग्ण नव्हता.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
□ आरटीपीसीआर चाचण्यावर भर देण्याचा आदेश
महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना काेराेनाच्या आरटीपीसीआर चाचण्या वाढविण्याचे आदेश आराेग्य अधिकारी डाॅ. बसवराज लोहारे आणि डाॅ. शीतलकुमार जाधव यांनी दिले आहेत. काेराेनाची सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांची रॅपीड ॲन्टिजन टेस्ट करू नका. आरटीपीसीआर करण्यावरच भर द्या, असा निराेप आहे. मनपा आराेग्य केंद्रात दरराेज २० ते ३० चाचण्या व्हाव्यात, असे आयुक्त पी. शिवशंकर यांनी आदेश दिले आहेत.
□ डफरीन हॉस्पिटलसह इतर रुग्णालयांचे होणार आधुनिकीकरण : आरोग्याधिकारी
कोरोना काळात शहरांतील आरोग्य यंत्रणा तोकडी पडली होती. परंतु, ही यंत्रणा परिपूर्ण करून नागरिकांना मोठ्या प्रमाणात आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचे कामदेखील प्रशासनाने केले आहे. Dufferin Hospital Modernization
शासनाच्या ‘लक्ष्य’ आणि ‘कायापालट’ या योजनेंतर्गत अत्याधुनिक दवाखाना उभारण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. खासगी दवाखान्याप्रमाणे सर्व वैद्यकीय सुविधा, उपचार पद्धती मिळण्यासाठी डफरीन हॉस्पिटलसह इतर रुग्णालयांचे आधुनिकीकरण केले जाणार आहे.
बदलत्या जीवनशैलीमुळे, स्पर्धात्मक वाटचालीमुळे विविध नवनवीन आजार उद्भवू लागले आहेत. महापालिकेच्या दवाखान्यांमध्ये प्राथमिक उपचार आणि प्रसूती केंद्र, लसीकरण व माता बालसंगोपनाचे कार्यक्रम प्राधान्याने राबविले जातात. या धोरणात्मक उपक्रमांपलीकडे जात पॉलिक्लिनिकच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या आरोग्य सुविधा देण्यात येणार असल्याचेही आरोग्याधिकारी डॉ. लोहारे यांनी सांगितले.