Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: भाजप  डॉ. आंबेडकर जयंती साजरी करणार; मागासवर्गीय मतांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

भाजप  डॉ. आंबेडकर जयंती साजरी करणार; मागासवर्गीय मतांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न

Surajya Digital
Last updated: 2023/04/14 at 2:36 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा) ○ इच्छुकांना आणले फोकसमध्ये

सोलापूर : आगामी काळात होणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने आपली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता भाजप मोठ्या प्रमाणात आंबेडकर जयंती साजरी करणार आहे.  BJP Dr. Ambedkar Jayanti will be celebrated; Solapur election is an attempt to attract the votes of the backward classes त्यासाठी सोलापूर भाजप अनुसूचित जाती आघाडीला मैदानात उतरवले आहे. या नव्या प्रयोगामुळे मागासवर्गीय मतांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न भाजप करताना दिसून येत आहे.

महापालिका निवडणूक असो वा लोकसभा निवडणूक असो भाजप प्रत्येक निवडणूक व्यूहरचना करून लढतो, हे आतापर्यंत सिद्ध झाले आहे. आताही भाजपकडून तसेच नियोजन करण्यात येत आहे. प्रदेश भाजपाने संपूर्ण राज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे सोलापूरसह सर्व जिल्ह्यात भाजपकडून न्याय सप्ताह साजरा करण्यात येत आहे.

 

सोलापूर शहरात आगामी काळात महापालिका निवडणूक, लोकसभा निवडणूक होणार आहे. ही निवडणूक समोर ठेवून भाजपने आता मागासवर्गीय मतांकडे आपला मोर्चा वळवला आहे. त्याचाच एक भाग म्हणून सोलापुरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त भाजप अनुसूचित जातीतर्फे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. माजी सामाजिक न्याय मंत्री दिलीप कांबळे यांना त्यासाठी मैदानात उतरवले आहे. त्यांचे डॉक्टर आंबेडकर यांच्या जीवनावर व्याख्यान आयोजित केले आहे.

भाजपकडून अनुसूचित जाती घटकांची मोर्चेबांधणी या निमित्ताने केले जात असल्याचे दिसून येत आहे. आजपर्यंत काँग्रेसकडून मागासवर्गीय मतांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. तीच मते काँग्रेससाठी निर्णायक ठरत होते. दरम्यान २०१९ रोजी सोलापूर शहरांमध्ये वंचित आघाडीचा प्रवेश झाला.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

खुद्द वंचित आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभा निवडणुकीत एन्ट्री केली. त्यामुळे मागासवर्गीय मतांचे ध्रुवीकरण झाले. सुमारे पावणे दोन लाख मते प्रकाश आंबेडकर यांना मिळाली. दलित वर्ग मोठ्या प्रमाणात वंचितकडे वळाल्याचे या निवडणुकीत दिसून आले. प्रकाश आंबेडकर जर निवडणूक रिंगणात नसले असते तर कदाचित भाजप आणि काँग्रेसमध्ये अटीतटीची लढाई झाली असती असे बोलले जात आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीतही शहर उत्तर मधून आनंद चंदनशिवे यांना वंचित आघाडीतर्फे २५ हजारांपेक्षा जास्त मते मिळाली होती. मात्र आनंद चंदनशिवे त्यानंतर आनंद यांनी वंचित आघाडीला रामराम केला. तेव्हापासून शहरात वंचित आघाडीचा प्रभाव थोडा कमी झाला आहे. आता याचाच फायदा घेण्यासाठी भाजप सरसावली आहे. त्यामुळेच आता भाजप अनुसूचित जातीतर्फे आंबेडकर प्रेमींसाठी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रथमच भाजपकडून या कार्यक्रमाचे आयोजन होत आहे. भाजपचा हा कार्यक्रम म्हणजे मागासवर्गीय मतांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयोग असल्याचे बोलले जात आहे.

 

○ इच्छुकांना आणले फोकसमध्ये

 

भाजप अनुसुचित जातीतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात येत आहे. यासाठी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये भाजपकडून महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्यांनाही फोकस केल्याचे दिसून आले.

 

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #BJP #DrAmbedkar #Jayanti #celebrated #Solapur #election #attempt #attract #votes #backward #classes, #भाजप  #डॉआंबेडकर #जयंती #साजरी #मागासवर्गीय #खेचण्याचा #प्रयत्न #सोलापूर
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापूर । गस्तीसाठी आले गुरखे ; चौघांना मिळाली भीमेत जलसमाधी, नेपाळी कुटुंब झाले पोरके
Next Article FRP साखर कारखानदारांनी थकविले 691 कोटी, सहकारीपेक्षा खाजगी कारखान्यांची थकबाकी जादा

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?