Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापुरात साखर उताऱ्यात पिछाडीवर तर गाळपात आघाडीवर
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsशिवारसोलापूर

सोलापुरात साखर उताऱ्यात पिछाडीवर तर गाळपात आघाडीवर

Surajya Digital
Last updated: 2023/01/17 at 4:50 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

Contents
□ सोलापूरने साखर उत्पादनात १ लाख कोटी क्विंटलचा ओलांडला टप्पास्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)□ यामुळे उताऱ्यात पिछाडीवर राहिला

□ सोलापूरने साखर उत्पादनात १ लाख कोटी क्विंटलचा ओलांडला टप्पा

 

सोलापूर : यंदाच्या गळीत हंगामात सोलापूर जिल्हा ऊस गाळप आणि साखर उत्पादनात राज्यात आघाडीवर असून कोल्हापूर जिल्हा दुसऱ्या स्थानावर आहे तर सोलापूर जिल्ह्याने साखर उत्पादनाचा १ कोटी क्विंटल चा टप्पा ओलांडला असला तरी साखर उताऱ्यात मात्र अत्यंत पिछाडीवर आहे. साखर उताऱ्यात कोल्हापूर जिल्हा पहिल्या क्रमांकावर आहे. In Solapur, farmers are lagging behind in sugar production and leading in silage, Kolhapur

 

चालू गळीत हंगामात राज्यात १०१ सहकारी व ९७ खाजगी अश्या एकूण १९८ कारखान्यांनी गळीत हंगाम सुरू केला आहे.९ जानेवारी पर्यंत सोलापूर विभागातील ४७ कारखान्यांनी १४४.१६ लाख टन ऊसाचे गाळप करून १२३.३७ लाख क्विंटल साखर उत्पादित केली असून साखर उतारा सरासरी ८.५६ टक्के इतका कमी आहे. तर कोल्हापूर विभागातील ३४ कारखान्यांनी १४४.१६ लाख टन ऊसाचे गाळप करून १२३.३७ लाख क्विंटल साखर उत्पादन करीत सरासरी साखर उतारा १०.९५ टक्के आहे.त्यामुळे कोल्हापूर जिल्हा साखर उताऱ्यात अव्वल स्थानी आहे.

 

(९ जानेवारी पर्यंत विभागावार गाळप स्थिती. तक्ता पहा)

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

राज्यातील १९८ कारखान्यांनी ५७९.७० लाख क्विंटल ऊसाचे गाळप करून ५६०.१७ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. तर राज्याचा सरासरी साखर उतारा ९.४९ टक्के इतका आहे. गतवर्षीच्या तुलनेत राज्यात २० लाख टनांनी ऊस गाळप जादा झाले असून साखर उताऱ्यात मात्र काहींशी घट झाली आहे. गतवर्षी याच दरम्यान ९.८२ टक्के इतका साखर उतारा होता.त्यातुलनेत यंदा साखर उतारा कमी झाला आहे.

 

□ यामुळे उताऱ्यात पिछाडीवर राहिला

 

जिल्ह्यात सर्वाधिक ऊस गाळप झाले असले तरी, मात्र साखर उताऱ्यात पिछाडीवर का राहिला आहे. ? याचाही विचार झाला पाहिजे. ऊस उत्पादक  पूर्ण वाढलेला ऊस गळीतास पाठवितात आणि शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन ब्रिक्‍स मशीनद्वारे साखर उतारा चेक केला असता १० टक्केच्या पुढेच उतारा मिळतो. मग कारखान्यांमध्ये मिळणाऱ्या आणि प्रत्यक्ष शेतात मिळणाऱ्या साखर उताऱ्यातील तफावतीकडे आयुक्त कार्यालयाने लक्ष दिले पाहिजे.

 

कोल्हापूर जिल्ह्यात १० टक्के पेक्षा जास्तीचा उतारा आणि सोलापूरमध्ये साडे आठ टक्के कमी दाखवला जात असल्याची गंभीर बाब आहे. या सरासरी साखर उताऱ्याचा पुढील वर्षीच्या एफआरपीवर (FRP) मोठा परिणाम होणार आहे. या घसरलेल्या टक्केवारीमुळे शेतकऱ्यांचे अर्थकारणावर ही कोलमडणार आहे.

 

– बालाजी चव्हाण
(उस उत्पादक शेतकरी, माढा)

 

 

You Might Also Like

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

सोलापूरचे महापालिका उपायुक्त लोकरेंना आ. देशमुख यांनी झापले

संजय राऊतांनाही गुवाहटीला यायचे होते; शहाजीबापूंचा मोठा गौप्यस्फोट

सोलापूर – करमाळ्यात कुंटणखाण्यावर छापा

TAGGED: #Solapur #farmers #lagging #behind #sugar #production #leading #silage #Kolhapur, #सोलापूर #साखर #उतारा #पिछाडी #शेतीवार्ता #गाळप #आघाडी #कोल्हापूर
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article दुधात भेसळ करणारी टोळी पोलिसांनी केली गजाआड
Next Article सीसीएच ॲप प्रकरणी आरोपींच्या कोठडीत वाढ, आरोपींमध्ये नाव वाढवले

Latest News

इस्रायलने शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याने ट्रम्प प्रचंड नाराज
देश - विदेश June 24, 2025
शिवभोजन थाळीचे सहा महिन्यांपासून अनुदान थकले; केंद्र चालविणे झाले कठीण
महाराष्ट्र June 24, 2025
फडणवीसांच्या मतदारसंघात 8 टक्के मतदार वाढले- राहुल गांधी
राजकारण June 24, 2025
महाराष्ट्र विधिमंडळाचा इतिहास प्रेरणादायी – राज्यपाल
महाराष्ट्र June 24, 2025
नीरज चोप्रा ऑस्ट्रावा गोल्डन स्पाइक स्पर्धेत विजयासाठी प्रमुख दावेदार
देश - विदेश June 24, 2025
दाक्षिणात्य अभिनेता श्रीकांतला अंमली पदार्थ प्रकरणी अटक
देश - विदेश June 24, 2025
भारतीयांचे रक्त सांडणाऱ्यांना माफ केले जाणार नाही – पंतप्रधान मोदी
देश - विदेश June 24, 2025
crime
सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक
सोलापूर June 24, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?