Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापुरात इनोव्हाकार आणि ट्रकचा भीषण अपघात, पाच ठार तर चार जखमी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Top News

सोलापुरात इनोव्हाकार आणि ट्रकचा भीषण अपघात, पाच ठार तर चार जखमी

Surajya Digital
Last updated: 2022/04/25 at 10:55 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

सोलापूर  : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात ट्रक आणि इनोव्हा कारचा भीषण अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून 4 जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ही आज घटना सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली.  या  दुर्दैवी अपघातात 1 वर्ष तर ७ वर्षांच्या चिमुरड्याचा मृतात समावेश आहे. प्रत्यक्षदर्शी हा अपघात पाहून हळहळ व्यक्त करीत होते. 

अपघातात जखमी झालेल्या चार जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकला मागून येणाऱ्या कारने धडक दिल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. शासकीय रूग्णालयामध्ये डॉक्टरांनी मयत आणि जखमींची नावे सांगितली.

मरण पावलेल्या मध्ये सचिन अण्णासाहेब शितोळे (वय 35 रा. धारवाड), दिलीप जाधव (वय 37, रा. मिरज) सोनाबाई जाधव (वय 55, रा. मिरज) गौरी दिलीप जाधव (वय ५ )व लाडू दिलीप जाधव (वय ३ दोघे रा. मिरज) यांचा समावेश आहे. वर्षा सचिन शितोळे (वय 28 , रा. धारवाड, हुबळी), इशा जाधव ( वय५), विनायक देवकर (वय १६ रा. हुबळी) वर्षा शितोळे,( वय 28 रा. धारवाड ), रेखा दिलीप जाधव (वय 35, रा. मिरज सांगली) अशी जखमींची नावे आहेत. या घटनेचे वृत्त कळताच जोडभावी पेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत तात्काळ आपल्या पथकासह त्या ठिकाणी दाखल झाले. त्यांनी जखमींना शासकीय रुग्णालयात पाठवले. कारमधून सर्वजण सांगोलामार्गे बिदरकडे जात होते, अशी माहिती मिळत आहे.

दुपारच्या वेळी खूप उकाडा असल्याने ट्रकचालक दिवसा उन्हात वाहन चालवणे टाळतात आणि ट्रक रस्त्याच्या बाजूला लावतात. मात्र, इतर वाहनचालक घाईत असल्याने अशा अपघाताच्या घटना घडतात. अशातच हा  भीषण अपघात  झाला आहे.

Innovator and truck crash in Solapur, five killed and four injured

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकवर इनोव्हाची समोरासमोर धडक झाली. त्यामुळे हा भीषण प्रकार घडला. या घटनेमुळे परिसरात घबराटीचे वातावरण आहे. त्यामुळेच वेळीच वेगावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.

(एमएच क्यू डब्लू 9587) हा माल वाहतूक ट्रक रस्त्याच्या कडेला थांबला होता. या ट्रकला पाठीमागून भरधाव आलेल्या इनोव्हा कारने जोराची धडक दिली. या भीषण अपघातात कारमधील पाचजण जागीच ठार झाले. कारची धडक इतकी जोरदार होती की अपघातात कारचा चेंदामेंदा झाला. कारचा दर्शनी भाग थेट ट्रकच्या खाली गेला आहे. क्रेन लावून कारला बाहेर ओढून काढले.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मदतकार्य सुरू करण्यात आले. जखमींना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे.

You Might Also Like

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण

उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन

केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी

‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा

हिमाचल प्रदेशमध्ये प्रवाशांनी भरलेली बस उलटली; ४४ प्रवासी जखमी

TAGGED: #Innovator #truck #crash #Solapur #five #killed #injured, #सोलापूर #इनोव्हाकार #ट्रक #भीषण #अपघात #पाच #ठार #जखमी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article नवनीत राणांना तुरुंगात हीन वागणूक, दलित असल्याची करून दिली जातीय जाणीव
Next Article लोडशेडिंग बंद करण्यासाठी मोहोळमधून ऊर्जामंत्र्यांना पाठविला कोळसा

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?