Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापूर-गोवा विमानसेवेच्या वेळापत्रकात लवकरच बदल
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूर

सोलापूर-गोवा विमानसेवेच्या वेळापत्रकात लवकरच बदल

admin
Last updated: 2025/09/04 at 4:05 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

सोलापूर, 4 सप्टेंबर। होटगी रोड विमानतळावर नाईट लॅंडिगची सोय नसल्याने गोव्याला जाणाऱ्या विमानसेवेसाठी सायंकाळची वेळ गैरसोयीची ठरू लागली आहे. यामुळे सोलापूर- गोवा मार्गावरील विमानसेवेच्या वेळेत लवकरच बदल होण्याची शक्यता आहे. याबरोबरच उडाण योजनेचा लाभ घेण्यासाठी भविष्यात मोपा विमानतळाऐवजी दाबोळी विमानतळाचा वापर करण्याचा फ्लाय-९१ कंपनीचा विचार आहे. रविवारी सायंकाळी ५.१० मिनिटाने गोव्यातून सोलापूरला येणारे विमान पावसामुळे दृश्यमानता कमी असल्याने सायंकाळी ६.१५ मिनिटाने म्हणजे एक तास उशिराने आले, तर परतीच्या प्रवासासाठी उड्डाणाची नियमित वेळ सायंकाळी ५.३५ मिनिटांची असताना सायंकाळी ६.५५ मिनिटांनी ते गोव्याकडे झेपावले. पाऊस व हिवाळ्यात धुक्यांमुळे वारंवार अशा घटना घडू शकतात. दिवसभर वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन येणाऱ्या या विमानाला वेगवेगळ्या ठिकाणांच्या हवामानानुसार वेळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हिवाळ्यात लवकर सूर्यास्त होत असल्याने व सोलापूरला नाइट लॅंडिगची सोय नसल्याने सायंकाळच्या वेळेत लवकरच बदल करण्याचा विचार कंपनी करत आहे. लवकरच सोलापूर विमानतळावरून स्टार एअरलाइन्सची मुंबई- सोलापूर- बंगळूर अशी विमानसेवा सुरू होणार आहे. दोन्ही कंपन्यांच्या समन्वयातून नवीन वेळापत्रक जाहीर होऊ शकते.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापूर : महिलेची भीमा नदीत उडी घेऊन आत्महत्या
Next Article सोलापूर : देवरनिंबर्गीच्या सरपंचाचा गोळ्या झाडून खून

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?