सोलापूर : सोलापूर ग्रामीण मध्ये काल नऊजणांचा कोरोनाने मृत्यू झाला होता. माञ आज शुक्रवारी ही परत सहाजणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण ग्रामीणमध्ये वाढले असून सर्वाधिक मृत्यू बार्शी आणि अक्कलकोट तालुक्यात झाले आहेत. (सर्व बातम्या वाचण्यासाठी सुराज्य डिजिटल वर क्लिक करा)
आज शुक्रवारी नव्या 108 कोरोना रुग्णांची भर पडली आहे. आता एकूण रुग्णसंख्या 2 हजार 529 झाली असून आज अंकलगी, पितापूर (ता. अक्कलकोट), वैरागमधील तिघांचा तर पंढरपुरातील अनिल नगरात राहणाऱ्या 45 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला.
आतापर्यंत बार्शीत 19, अक्कलकोटमधील 12, उत्तर व दक्षिण सोलापुरातील प्रत्येकी आठ तर पंढरपुरातील चार, मोहोळमधील सात, तर माढ्यातील तीन आणि करमाळा व सांगोला तालुक्यातील प्रत्येकी एकाचा कोरोनाने बळी घेतला आहे.
* तालुकानिहाय रुग्ण
अक्कलकोट 424, बार्शी 614, करमाळा 60, माढा 94, माळशिरस 104, मंगळवेढा 64, मोहोळ 183, उत्तर सोलापूर 210, पंढरपूर 261, सांगोला 31, दक्षिण सोलापूर 484 असे एकूण दोन हजार 529 रुग्ण आतापर्यंत जिल्ह्यातील 11 तालुक्यात सापडले आहेत.