सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील 11 तालुक्यांमध्ये 1 हजार 255 व्यक्तींची शनिवारी टेस्ट करण्यात आली. त्यामध्ये 154 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आला असून सहा जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील रुग्णसंख्या 2 हजार 820 झाली आहे. मृतांची संख्या आता 75 झाली आहे.
(तुमचे हक्काचे ‘सुराज्य डिजिटल‘ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि टेलिग्रामवरही उपलब्ध)
शनिवारी मृत्यू झालेल्यांमध्ये अक्कलकोटमधील खासबाग येथील 72 वर्षीय महिला, मैंदर्गीतील 80 पुरुषाचा मृत्यू झाला आहे. मंगळवेढ्यातील गुंगे गल्लीतील 54 वर्षीय पुरुषाचा तर उत्तर सोलापुरातील पडसाळीतील 76 वर्षीय पुरुषाचा आणि बार्शीतील मुल्ला गल्लीतील 82 वर्षीय पुरुषाचा, तर फुले प्लॉटमधील 55 प्लॉटमधील महिलेचा समावेश आहे.
* तालुकानिहाय रुग्णसंख्या
अक्कलकोट 438, बार्शी 695, करमाळा 77, माढा 111, माळशिरस 121, मंगळवेढा 73, मोहोळ 199, उत्तर सोलापूर 220, पंढरपूर 340, सांगोला 43, दक्षिण सोलापूर 503असे एकूण 2 हजार 820 रुग्ण आतापर्यंत जिल्ह्यातील 11 तालुक्यात निष्पन्न झाले आहेत.