Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापूर शहर- ग्रामीणमध्ये कोरोना बाधित 13 हजार पार तर मृत्यू 592; ग्रामीणमध्ये दीड हजारांनी अधिक रुग्ण
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

सोलापूर शहर- ग्रामीणमध्ये कोरोना बाधित 13 हजार पार तर मृत्यू 592; ग्रामीणमध्ये दीड हजारांनी अधिक रुग्ण

Surajya Digital
Last updated: 2020/08/16 at 11:02 AM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

सोलापूर : सोलापूर शहर – ग्रामीणचा आतापर्यंतचा अहवाल पाहता एकूण बाधितांचा आकडा 13 हजार पार झाला आहे. कोरोनाबळीची संख्या 592 आहे. साडेआठ हजाराहून अधिकजणांनी कोरोनावर मात केली आहे.

सध्या ग्रामीणचा बाधितांचा आकडा वाढत आहे. सध्या तर शहराच्या तुलनेत दीड हजाराने (1,585) ग्रामीणमध्ये बाधितांची संख्या अधिक आहे. तसेच कोरोनामुक्तीचे प्रमाण शहरात जादा (199) असले तरी मृत्यूचे प्रमाण मात्र शहरात अधिक आहे.

15 अॉगस्टपर्यंतचा अहवाल पाहता शहरात कोरोनामुक्तीची संख्या 4 हजार 479 तर ग्रामीण 4 हजार 280 आहे. बाधितांचा आकडा शहरात 5 हजार 805 तर ग्रामीणमध्ये 7 हजार 390 आहे. मृत्यूची संख्या पाहता शहरात 387 तर ग्रामीणमध्ये 205 आहे. एकूण शहर – ग्रामीण बाधित 13 हजार 195, मृत्यू 592 तर कोरोनामुक्त 8 हजार 759 असा आहे.

सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. शनिवारी ग्रामीण भागातील तब्बल 330 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 194 पुरुष तर 136 महिलांचा समावेश होतो. 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.काल शनिवारच्या अहवालात शहरात सुदैवाने मृत्यूची नोंद झाली नाही. मात्र ग्रामीणमध्ये आठजणांचा मृत्यू झाला.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

काल शनिवारी, यशवंतनगर (ता. माळशिरस) येथील 70 वर्षीय पुरुष, अकलूज (ता. माळशिरस) येथील 53 वर्षे पुरुष, कोन्हेरी (ता.मोहोळ) येथील 70 वर्षीय पुरुष, शिरनांदगी (ता. मंगळवेढा) येथील 65 वर्षांची महिला, कुर्डू (ता. माढा) येथील 70 वर्षांची महिला, पापनस (ता. माढा) येथील 35 वर्षीय पुरुष, बालाजी कॉलनी, सोलापूर रोड, बार्शी येथील 52 वर्षीय पुरुष, श्रीपत पिंपरी (ता. बार्शी) येथील 80 वर्षांची महिला यांचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आता 205 इतकी झाली आहे. अद्यापही दोन हजार 905 जण रुग्णालयात उपचार घेत आहेत तर चार हजार 280 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. अद्यापही 152 जणांचा अहवाल प्रलंबित आहे.

You Might Also Like

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

उजनी धरणातून ३ महिन्यात सोडले २०० टीएमसी पाणी

TAGGED: #सोलापूर #शहरग्रामीण #बाधित13हजार #कोरोनामुक्तआठहजार
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article तीन ट्रॉफी जिंकणारा एकमेव कर्णधार; एक स्वप्न कायमचे राहिले अधुरे, होतोय आजही एका गोष्टीचा पश्चात्ताप
Next Article उजनीची वाटचाल अर्धशतकाकडे; बंडगार्डन, दौंडच्या विसर्गात वाढ, शेतक-यांतून समाधान

Latest News

उद्धव ठाकरेंनीच भुमरे पिता-पुत्रांना घडवले – अंबादास दानवे
राजकारण October 11, 2025
मविआचे शिष्टमंडळ 14 ऑक्टोबरला घेणार निवडणूक आयोगाची भेट
महाराष्ट्र October 11, 2025
इंडिगोच्या विमानाची विंडशील्ड तुटली; 76 प्रवासी बचावले
देश - विदेश October 11, 2025
बीएलएने जामरानमध्ये पाक सैन्याला रसद पुरवठ्यावर घातली बंदी
महाराष्ट्र October 11, 2025
अमरावतीत गोवंश तस्करांचा ट्रक पकडला; १८ लाखांची २९ जनावरे ताब्यात
महाराष्ट्र October 11, 2025
लाडक्या बहिणी झाल्या त्रस्त; योजनेत ई-केवायसीचा गोंधळ
महाराष्ट्र October 11, 2025
आयपीएल लिलाव १३ ते १५ डिसेंबर दरम्यान होण्याची शक्यता
खेळ October 11, 2025
स्थानिक स्वराज्य निवडणुका 15 नोव्हेंबर नंतर कामाला लागा – मुख्यमंत्री
राजकारण October 11, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?