Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मंगळवेढ्यात बँकेसमोर तरुणावर जीवघेणा हल्ला, सोलापुरात मॅच सट्टा बाजारप्रकरणी चार उच्चशिक्षित तरुणांना अटक
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

मंगळवेढ्यात बँकेसमोर तरुणावर जीवघेणा हल्ला, सोलापुरात मॅच सट्टा बाजारप्रकरणी चार उच्चशिक्षित तरुणांना अटक

Surajya Digital
Last updated: 2021/11/12 at 4:57 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

सोलापूर : मंगवेढ्यात एका तरुणावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. ही घटना आज सकाळी 10.15 च्या सुमारास शहरातील चोखामेळा चौक येथील आयसीआयसीआय बँकेसमोर घडली आहे. आनंद शिवपुजे असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्यास उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.

आयसीआयसीआय बँकेसमोर हा प्रकार घडला आहे. आनंद शिवपुजे असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान खुनी वार करताना जखमी तरुणाने बँकेत प्रवेश केला व आरोपीला रोखून धरले होते. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून आरोपीला लगेच ताब्यात घेतले आहे. सेक्युरिटी दत्तात्रय गोडसे यांनी लागली धाव घेतल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, यातील जखमी हा मूढवी या गावातील रहिवासी असून आरोपी याने मागील भांडणाचा राग मनात धरून कोयत्याने खुनी हल्ला केल्याचे प्रथमदर्शींनी सांगितले. चोखामेळा चौकामध्ये लोकांची गर्दी मोठ्या प्रमाणात झाले होती. या घटनेमुळे शहरात बातमी वाऱ्यासारखी पसरली. बँकेचे कामकाज दोन तासाने पंचनामे होऊन सुरू झाले आहे.

घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री पाटील, पोलीस निरीक्षक बापू पिंगळे, एपीआय आवटे हवालदार सुनील गायकवाड, तुकाराम कोळी, पी सी तांबोळी दत्तात्रय येलपले. जमीर मुजावर यांनी भेट दिली.

* सोलापुरात मॅच सट्टा बाजारप्रकरणी चार उच्चशिक्षित तरुणांना अटक

सोलापूर : टी-20 विश्वचषक क्रिकेट मॅच यांच्यावरच सट्टा बाजार करणाऱ्या तिघांना पोलीस आयुक्तांच्या भरारी पथक तसेच विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या पथकाने  छापा टाकून  अटक केली.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

या घटनेची हकीकत अशी की, 10 नोव्हेंबर रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास जुळे सोलापुरातील प्रेम नगर येथील शालिनी आर्किड आपारमेंटच्या चौथ्या मजल्यावर प्लॉट नंबर 402 मध्ये अमोघ आनंद साखरे (वय 24 व्यवसाय शिक्षण रा. पूर्व मंगळवार पेठ महादेव गल्ली सोलापूर) , नागेश सुभाष  येलमेली (वय 36 व्यवसाय इंजिनियर राहणार शाहीर वस्ती भवानी पेठ सोलापूर ) , शिवराज पांडुरंग हक्के, (वय 32 व्यवसाय मजुरी राहणार मराठा वस्ती सोलापूर), प्रभाकर राजशेखर उपासे (वय 28 व्यवसाय व्यापारी राहणार पश्चिम मंगळवार पेठ सोलापूर) असे चौघे मिळून आले. त्या ठिकाणी विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेवर सट्टा चालवीत असल्याची गुप्त बातमी भरारी पथकाचे प्रमुख सहायक पोलिस निरीक्षक जीवन निरगुडे यांना मिळाली.

जुळे सोलापूर ही सोलापुरातील अतिशय उच्च नागरिकांची सोसायटी म्हणून ओळखली जाते. या सोसायटीमध्ये सोलापूर शहर पोलिसांनी छापा कारवाई करून टी-20 विश्वचषकाच्या मॅचेसवर सट्टा घेणाऱ्या चार उच्चशिक्षित तरुणांना अटक केले आहे.

या कारवाई दरम्यान 2 लाख 66 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई विजापूर नाका पोलीस ठाणे आणि पोलीस आयुक्तांनी स्थापन केलेल्या भरारी पथकाने केली आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धा किंवा टी 20 विश्वचषक क्रिकेट मॅचेसवर सट्टा घेणाऱ्याचा मोठे रॅकेट असल्याची माहिती भरारी पथकाने दिली आहे. लवकरच या रॅकेटच देखील पर्दाफाश करून मोठ्या माश्याना बेड्या ठोकणार असल्याची माहिती दिली आहे.

भरारी पथक आणि विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी सट्टा घेत असलेल्या अपार्टमेंट मधील फ्लॅटची संपूर्ण झडती घेतली. या झडती दरम्यान 17 मोबाईल हँडसेट, 2 लॅपटॉप, 1 नोटबुक, 1 हॉटमशीन, 14 हजार रुपयांची रोखड असा एकूण 2 लाख 66 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

You Might Also Like

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

TAGGED: #attack #youth #bank #match #betting #marketcase #solapur #arrested, #मंगळवेढा #तरुणावर #जीवघेणा #हल्ला #मॅचसट्टा #बाजारप्रकरणी #उच्चशिक्षित #तरुण #अटक
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article आता दुचाकीतही मिळणार एअर बॅगची सुरक्षा
Next Article वृध्द वारक-यांना विठुराया पावला, दर्शनास परवानगी; कार्तिकी वारीसाठी खासगी वाहनांची सोय

Latest News

वाढीव मतांवरील निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार – प्रकाश आंबेडकर
राजकारण June 26, 2025
आता फोन केल्यावर बिग बींचा आवाज ऐकू येणार नाही; सरकारकडून सायबर फ्रॉड कॉलर ट्यून बंद
Top News June 26, 2025
‘’ लहान मुलाप्रमाणे चालायला शिकतोय’’; अंतराळातून शुभांशू शुक्लांचा व्हिडिओ कॉल
देश - विदेश June 26, 2025
हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा
महाराष्ट्र June 26, 2025
राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ ‘काम करण्यासाठी सर्वोत्तम संस्था – 2025’ पुरस्काराने सन्मानित!
देश - विदेश June 26, 2025
ऑपरेशन सिंधू : इराणमध्ये अडकलेले आणखी २७२ नागरिक परतले
देश - विदेश June 26, 2025
मुंबईत ६ जुलैला विठ्ठलनामाच्या गजरात भक्तीमय संगीत सोहळा – ‘अवघे गर्जे पंढरपूर’!
महाराष्ट्र June 26, 2025
विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून मुंबईत
महाराष्ट्र June 26, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?