सोलापूर, 8 ऑगस्ट – दक्षिण-पश्चिम रेल्वेच्या हुबळी विभागातील अलमट्टी-जनमकुंटी-मुगळोळी-बागलकोट या ३५ किमी रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण अंतिम टप्प्यात आले असून, यासाठी १४ ते २४ ऑगस्टदरम्यान अनेक गाड्या रद्द किंवा मार्गांतरित करण्यात येणार आहेत. यामध्ये सोलापूर-होस्पेटसह नऊ गाड्यांचा समावेश असून, हम्पी होस्पेट, विजयपूर, धारवाडसह दक्षिण कर्नाटकात जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होणार आहे.
रेल्वे प्रशासनाने सोलापूर, पंढरपूर, विजयपूर, धारवाड, होस्पेट आणि हुबळी मार्गांवरील प्रवाशांना या कालावधीत पर्यायी प्रवासाचे नियोजन करण्याचे आवाहन केले आहे. दुहेरीकरणानंतर गाड्यांची गती वाढून वेळेची बचत होणार आहे. तसेच पंढरपूर- म्हैसूर गोलगुंबज एक्स्प्रेस २३ ऑगस्टला पंढरपूरहून ६० मिनिटे उशिरा सुटेल. प्रवाशांनी प्रवासापूर्वी रेल्वेच्या अधिकृत वेबसाइट किंवा स्थानिक स्थानकावर तपशील तपासावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
मार्गांतरित व रद्द गाड्या:
-
यशवंतपूर- विजयपूर एक्स्प्रेस : विजयपूरऐवजी बागलकोटपर्यंत धावेल (१३ ते २२ ऑगस्ट)
-
विजयपूर- यशवंतपूर एक्स्प्रेस : बागलकोटहून सुरू होईल (१४ ते २३ ऑगस्ट)
-
म्हैसूर- बागलकोट बसवा एक्स्प्रेस : विजयपूरऐवजी बागलकोटपर्यंत धावेल
-
मुंबई- होस्पेट सुपरफास्ट : विजयपूरपर्यंत धावेल (१३ ते २२ ऑगस्ट)
-
होस्पेट- मुंबई सुपरफास्ट : विजयपूरहून सुरू होईल (१४ ते २३ ऑगस्ट)
-
मंगळूर- विजयपूर एक्स्प्रेस : बागलकोट/हुबळीपर्यंत धावेल
-
विजयपूर- मंगळूर एक्स्प्रेस : बागलकोट/हुबळीहून सुरू होईल
-
हुबळी- विजयपूर पॅसेंजर : बागलकोटपर्यंत धावेल (१४ ते १९ ऑगस्ट)