Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापुरातून 50 हजार बांधकाम कामगारांचा मोर्चा मंत्री मुश्रीफ यांच्या घरावर धडकणार
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

सोलापुरातून 50 हजार बांधकाम कामगारांचा मोर्चा मंत्री मुश्रीफ यांच्या घरावर धडकणार

Surajya Digital
Last updated: 2021/10/18 at 9:23 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

सोलापूर : बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात 11 हजार कोटी  रुपये जमा आहेत. त्या जमा रकमेतून यंदाच्या दिवाळीला भेट 10 हजार रुपये देण्यात यावे. तसेच बांधकाम कामगार नोंदणीसाठी लादण्यात आलेल्या जाचक अटी रद्द करावे तसेच सर्व प्रलंबित प्रकरणे निकाली काढावे अन्यथा 29 ऑक्टोबर रोजी राज्यभरातील 50 हजार बांधकाम कामगारांना घेऊन राज्य कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरांवर मोर्चा काढण्याचा इशारा सिटूचे राज्य महासचिव ऍड. एम. एच. शेख यांनी दिला.

आज सोमवारी रोजी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स (सिटू) च्या वतीने मागणी दिवस पाळण्याची हाक देण्यात आली असून त्या अनुषंगाने सोलापुरात आज बांधकाम कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सहा.कामगार आयुक्त कार्यालय येथे धरणे आंदोलन करण्यात आले.

यावेळी सिटूचे राज्य महासचिव अँड.एम.एच.शेख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा.अब्राहम कुमार, शंकर म्हेत्रे, सिद्राम म्हेत्रे,अमित मंचले, श्रीकांत कांबळे, युवा महासंघाचे जिल्हा सचिव अनिल वासम, चिदानंद चानापागुल, तानाजी जाधव, भास्कर कुनशीकर यांच्या शिष्टमंडळाने  नोंदणी अधिकारी तथा दुकाने निरीक्षक ए.जी.पठाण यांना निवेदन दिले.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

बांधकाम कामगारांची ऑनलाइन नोंदणी व पुनर्रनोंदणी तात्काळ व्हावी अथवा ऑनलाइन अर्ज स्वीकारावे.कामगारांच्या विविध प्रलंबित प्रकरणे व थकीत लाभ त्वरीत पूर्तता करावे. अवजारे खरेदी लाभाचे प्रलंबित प्रकरणे त्वरित मंजूर करावे.कोविड 19 चे थकीत अनुदान त्वरित देऊ करावे. 5 वर्षाची नूतनीकरण वर्गणी भरलेल्या नोंदणीकृत कामगारांना सर्व अनुदान अदा करावे. तसेच थकीत प्रसूती लाभ, पाल्यांची शिष्यवृत्ती तातडीने अदा करावी. या मागण्या घेऊन धरणे आंदोलन करण्यात आले.

* मार्डी येथील रुग्णालयाच्या आवारात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या 

सोलापूर – मार्डी (ता.उत्तर सोलापूर) येथील सरकारी दवाखान्याच्या आवारात असलेल्या लिंबाच्या झाडाला एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना काल रविवारी रात्रीच्या सुमारास घडली.
सोमनाथ अंकुश वाघमारे (वय१९ रा.मार्डी) असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो काल रात्री ८ वाजेच्या सुमारास घरापासून जवळच असलेल्या दवाखाना आवारातील लिंबाच्या झाडाला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतला होता. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्याला फासातून सोडवून तालुक्याचा पोलिसांनी शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र तो उपचारापूर्वीच मयत झाला. मयत सोमनाथ हा अविवाहित असून तो मजुरी करीत होता. त्याच्या पश्चात आई-वडील एक भाऊ आणि चार बहिणी असा परिवार आहे. या घटनेची नोंद तालुका पोलिसात झाली असून या मागचे कारण समजले नाही. पोलीस नाईक खवतोडे पुढील तपास करीत आहेत .

You Might Also Like

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

TAGGED: #march #construction #workers #Solapur #house #Minister #Mushrif, #सोलापूर #बांधकाम #कामगार #मोर्चा #मंत्री #मुश्रीफ #धडकणार
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article राज ठाकरे दिवाळीनंतर करणार अयोध्यावारी
Next Article बेकायदा डिझेल निर्मिती आणि विक्री करणाऱ्या टोळीला अटक

Latest News

वाढीव मतांवरील निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार – प्रकाश आंबेडकर
राजकारण June 26, 2025
आता फोन केल्यावर बिग बींचा आवाज ऐकू येणार नाही; सरकारकडून सायबर फ्रॉड कॉलर ट्यून बंद
Top News June 26, 2025
‘’ लहान मुलाप्रमाणे चालायला शिकतोय’’; अंतराळातून शुभांशू शुक्लांचा व्हिडिओ कॉल
देश - विदेश June 26, 2025
हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा
महाराष्ट्र June 26, 2025
राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ ‘काम करण्यासाठी सर्वोत्तम संस्था – 2025’ पुरस्काराने सन्मानित!
देश - विदेश June 26, 2025
ऑपरेशन सिंधू : इराणमध्ये अडकलेले आणखी २७२ नागरिक परतले
देश - विदेश June 26, 2025
मुंबईत ६ जुलैला विठ्ठलनामाच्या गजरात भक्तीमय संगीत सोहळा – ‘अवघे गर्जे पंढरपूर’!
महाराष्ट्र June 26, 2025
विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून मुंबईत
महाराष्ट्र June 26, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?