Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापुरात नियमापेक्षा जादा गर्दी दिसली की होणार सील, सामूहिक कार्यक्रमाला बंदी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

सोलापुरात नियमापेक्षा जादा गर्दी दिसली की होणार सील, सामूहिक कार्यक्रमाला बंदी

Surajya Digital
Last updated: 2021/02/20 at 11:29 AM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

सोलापूर : शहरातील कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी महापालिकेने मंगलकार्यालय, हॉटेल, जीम, बागा, कोचिंग क्लास व दुकानांमध्ये नियमापेक्षा जास्त गर्दी आढळल्यास दंड व एक महिन्यासाठी दुकानाला सील ठोकण्याचा इशारा दिला आहे. त्याचबरोबर मिरवणुका, यात्रा, स्पर्धा, मोर्चा उपोषण व सामूहिक कोणत्याही कार्यक्रमाला बंदी घालण्यात आली आहे.

सर्व खाजगी दवाखान्याची तपासणी होणार आहे. अशा दवाखान्यात सर्दी, पडसे, खोकल्याची लक्षणे असलेल्या रुग्णाची चाचणी करण्यात येईल. कोव्हीड सेंटरमधील व्हेंटीलेटर तयारी व इतर सुविधांची पाहणी करण्यात येईल. संपर्कातील व्यक्तींची तपासणी कडकपणे करण्यात येईल.

महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी काल शुक्रवारी रात्री उशिरा कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी साथरोग प्रतिबंधक कायद्यान्वये नवे निर्बंध लागू केले आहेत. मंगलकार्यालयात होणा-या लग्न व इतर समारंभाची विभागीय कार्यालयाने दररोज तपासणी करावी. लग्नाला परवाना बंधनकारक असून, ५० लोकच आहेत की नाही याची खातरजमा करावी. नियमांचे उल्लंघन आढळल्यास नोटीसा देऊन १० हजार दंड करावा.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

दुस-यांदा नियमांचे उल्लंघन झाल्यास मंगलकार्यालय महिन्यासाठी सील करावे असे आदेश दिले आहेत. कोंचींग क्लासलाही हा नियम लागू करण्यात आला आहे. बाजार समिती, मंडई, माल्स, शॉपिंग सेंटरमधील दुकानदार, फेरीवाल्याना कोरोना चाचणी बंधनकारक असेल व त्यांनी मास्क, फिजिकल डिटस्टन्सचे पालन करणे बंधनकारक असेल. ज्या ठिकाणी उल्लंघन दिसेल त्यांना दोन हजार दंड व दुस-या वेळेस प्रकार आढळल्यास दुकान एक महिन्यासाठी सील करण्यात येईल. त्याचबरोबर दररोज रेल्वे, बसस्थानक, जीम, उद्यान, क्रीडा स्पर्धांची मैदाने, चित्रपटगृह, हॉटेल, बारची तपासणी करण्यात येईल. जेथे नियमांचे उल्लंघन आढळेल त्यांना १० हजार दंड व दुस-यावेळेस महिन्यासाठी आस्थापना बंद करण्यात येईल. लहान मुले व ज्येष्ठांनी घरातच रहावे.

* अशी आहे गर्दीची नियमावली

मिरवणुका, स्पर्धा, यात्रा, मोर्चा, उपोषण व इतर सामुहिक कार्यक्रमास बंदी असेल. पार्थनास्थळे, मंदिर, चर्चमधील दैनंदिन धार्मिक कार्यक्रम सुरू असतील. श्री सिद्धेश्वर मंदिरात दररोज ५०० भाविकांना प्रवेश देण्यास परवानगी असेल तर मठांमध्ये २० जणांना परवानगी असेल. शासकीय कार्यालयातही गर्दी करता येणार नाही. निवेदनासाठी फक्त ५ व्यक्तींना परवानगी असेल. संबंधित विभागाचे अधिकारी दररोज या नियमांची तपासणी करून कारवाई करतील.

You Might Also Like

सोलापूर शहर-जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांत सरकार विरोधात खदखद

सोलापूर-मुंबई विमानसेवा महिन्यात सुरू करण्याचा प्रयत्न

सोलापूर एमआयडीसीत 56 बेकायदा बांधकामे

सोलापुरात इतर आजारांसाठी दाखल रुग्णांपैकी 7 जण कोरोना पॉझिटिव्ह

उजनी धरणात मुसळधार पावसामुळे अवघ्या ३ दिवसांत 12 टीएमसी पाणीसाठा;

TAGGED: #Solapur #ifthereismorecrowd #thanthenorm #therewillbe #seal #ban #on #massevents, #सोलापुरात #नियमापेक्षा #जादागर्दी #होणारसील #सामूहिककार्यक्रमाला #बंदी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article माघ वारी : पंढरपूर शहर व परिसरातील 10 गावात संचारबंदी
Next Article ‘जाऊ द्या ना ताई… नाहीतर ट्रकभर चौकशा कराव्या लागतील’, शेलारांचा सुप्रिया सुळेंना टोला

Latest News

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत लाभार्थी मेळाव्याचे आयोजन
महाराष्ट्र May 31, 2025
राजधानीत अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी
देश - विदेश May 31, 2025
अहिल्यादेवी होळकर यांना जन्मत्रिशताब्दीनिमित्त राज्यपालांचे अभिवादन
महाराष्ट्र May 31, 2025
देशात कोरोना रुग्णांची संख्या 2710 झाली
देश - विदेश May 31, 2025
अतिवृष्टी बाधित गावे मदतीपासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता घ्या – जयकुमार गोरे
महाराष्ट्र May 31, 2025
शेतकऱ्यांच्या सुचनांना प्राधान्य – कृषीमंत्री
महाराष्ट्र May 31, 2025
महिलांनो, एसटी प्रवासात मोबाइल व दागिन्यांची घ्या विशेष काळजी
महाराष्ट्र May 31, 2025
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देणार – पालकमंत्री बावनकुळे
महाराष्ट्र May 31, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?