Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: गुरु-शिष्यांमध्ये मनोमिलन ? सोलापुरातच घडला योगायोग
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsराजकारणसोलापूर

गुरु-शिष्यांमध्ये मनोमिलन ? सोलापुरातच घडला योगायोग

Surajya Digital
Last updated: 2023/10/02 at 4:58 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

● मोहोळच्या राजकारणाची दिशा बदलणार

मोहोळ : मोहोळ विधानसभा मतदार संघातील राजकारणात काही वर्षांपूर्वी गुरू-शिष्याचे नाते असणाऱ्या दोन नेत्यांमधील कटुता संपली असून त्यांच्यात पुन्हा मनोमिलन झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे आगामी काळात मोहोळच्या राजकारणाची दिशा बदलण्याची चिन्हे दिसत आहेत. राजकारणात कोण कुणाचा कधी शत्रू होईल? कोण कुणाचा कधी मित्र होईल, याचा नेम नाही. ही व्याख्या आता सर्वसामान्यांनाही पाठ झाली आहे. तेव्हा मोहोळ तालुका त्याला अपवाद कसा असू शकेल ? माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे आणि माजी आमदार रमेश कदम या गुरू-शिष्यांमध्ये सोलापूरच्या साक्षीने एकोपा झाल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

 

मोहोळच्या राजकारणात ढोबळेंनी आमदारकी जिंकून आपले बस्तान बसवले होते. आपण एक चांगला कार्यकर्ता घडवू या भावनेने त्यांनी मूळचे अकलूजचे आणि बोरिवलीत स्थायिक झालेले कदम यांना मोहोळमध्ये आणले. वाघोली येथील सूत गिरणीची थोडी बहुत जबाबदारी दिली. जनसंपर्क आणि मेळावे यातून कदम यांचा तालुक्यात संपर्क वाढत गेला. यातूनच ढोबळे यांच्याकडे गुरू तर कदम यांच्याकडे शिष्य म्हणून पाहिले जावू लागले. पुढे कदम यांनी आमदारकीची तयारी सुरू केली. २०१४ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून आरक्षित जागेवर कदम यांना उमेदवारी मिळाली. ढोबळेंचे पंख छाटण्यासाठी राष्ट्रवादीतील एका गटाने कदम यांना रसद पुरवली. ढोबळे यांनी अपक्ष म्हणून भवितव्य अजमावले पण मोहोळच्या जनतेने त्यांना नाकारले. कदम विजयी झाले. तिथेच गुरु शिष्याच्या नात्यात शत्रूत्व निर्माण झाले. आमदारकी मिळाल्यानंतर कदम यांच्यामागे शुक्लकाष्ठ लागले.

अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळातील भ्रष्टाचार प्रकरणी त्यांना तुरुंगात जावे लागले. तब्बल नऊ वर्षांनी कदम हे जामीनावर बाहेर आल्यानंतर गेल्याच आठवड्यात मोहोळमध्ये त्यांचे जंगी स्वागत झाले. गेल्या चार पाच दिवसात कदम हे मोहोळसह सोलापुरातील कार्यकर्त्यांना भेटत आहेत.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

○ अन् गहिवरून आले…

शनिवारी सोलापुरात योगायोग घडून आला. पार्क चौकात ढोबळे यांचे खादी भवनचे कार्यालय आहे. त्याच्याच खाली कदम हे कार्यकर्त्यांसमवेत एका कामासाठी थांबले होते. दरम्यान ढोबळे यांची गाडी तिथे आली. ढोबळेंनी कदमांना पाहिले. चला वरती म्हणत त्यांना आपल्या कार्यालयात नेले. कार्यालयात गप्पा रंगल्यानंतर दोघांनाही गहिवरून आले.

○ राजकारणाची दिशा बदलणार

 

रमेश कदमांनी केलेले प्रामाणिक काम आजही तरुणाच्या स्मरणात राहीले आहे. म्हणूनच नुकत्याच झालेल्या त्यांच्या सभेला मोहोळ तालुक्यात इतिहास घडवण्यासारखी गर्दी झाली होती. आता ढोबळे हे भाजपवासी झाले आहेत तर कदमांनी अद्याप पक्ष ठरवला नाही. परंतु दोघांचे मनोमिलन झाल असल्याचे समजते. जर खरेच हे मनोमिलन झाले असेल तर मोहोळच्या राजकारणाची दिशा बदलणार का ? अशी चर्चा होवू लागली आहे.

You Might Also Like

शिवसेना पक्ष-चिन्ह वाद : ऑगस्टमध्ये अंतिम सुनावणी

सोलापूर : लक्ष्मण हाके समाजात जातीय विष पेरतात – उमेश पाटील

शेतकऱ्यांच्या समस्या तातडीने सोडवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देणार – खा प्रणिती शिंदे

गुन्हेगारी रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करावेत – डॉ. नीलम गोऱ्हे

सोलापूर : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत तारण ठेवलेले सोने निघाले बनावट

TAGGED: #Guru-disciples #harmony #Coincidence #happened #Solapur #Mohol #politics #formerminister #LaxmanraoDhoble #exmla #RameshKadam, #गुरु-शिष्य #मनोमिलन #सोलापूर #योगायोग #माजीमंत्री #लक्ष्मणरावढोबळे #मोहोळ #राजकारण #माजीआमदार #रमेशकदम
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article टोमॅटोच्या भावामुळे शेतकऱ्याचा सोलापुरात रास्ता रोको, शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ
Next Article पंढरपूर मंदिर समितीपुढे पेच; कार्तिकी पुजेचा मान कोणत्या उपमुख्यमंत्र्यांना द्यायचा ?

Latest News

शिवसेना पक्ष-चिन्ह वाद : ऑगस्टमध्ये अंतिम सुनावणी
राजकारण July 14, 2025
मालवणमधील ‘उबाठा’ च्या 4 माजी नगरसेवकांचा समर्थकांसह भाजपामध्ये प्रवेश
महाराष्ट्र July 14, 2025
राज ठाकरेंच्या विरोधात पोलीस महासंचालकांकडे तक्रार
देश - विदेश July 14, 2025
विमानात कोणतीही यांत्रिक समस्या नव्हती – कॅम्पबेल विल्सन
देश - विदेश July 14, 2025
चिनी उपराष्ट्रपतींसोबतच्या भेटीतून सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होईल – एस. जयशंकर
देश - विदेश July 14, 2025
ज्येष्ठ कन्नड अभिनेत्री बी. सरोजा देवी यांचे निधन
देश - विदेश July 14, 2025
प्रवासी सुरक्षा वाढविण्यासाठी रेल्वे डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार
देश - विदेश July 14, 2025
लंडनमध्ये उड्डाणानंतर विमान कोसळण्याची दुर्घटना
Top News July 14, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?