Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापूर जनता सहकारी बँकेवर पुन्हा परिवार पॅनलचेच वर्चस्व
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

सोलापूर जनता सहकारी बँकेवर पुन्हा परिवार पॅनलचेच वर्चस्व

Surajya Digital
Last updated: 2021/03/16 at 9:33 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

सोलापूर : सोलापूर जनता सहकारी बँकेच्या निवडणुकीत सत्ताधारी परिवार पॅनलचे सर्वच्या सर्व उमेदवार आघाडीवर असून बँकेवर पुन्हा एकदा संघ परिवाराचेच वर्चस्व असल्याचे सिद्ध झाले आहे.

या निवडणुकीत परिवार पॅनलने सर्व 17 जागांसाठी 17 उमेदवार उभे केले होते. हे सर्व ऊमेदवार तिसऱ्या फेरीअखेर विजयाच्या ऊंबरठ्यावर आहेत. रात्री उशिरापर्यंत मतमोजणी सुरू होती. अधिकृत निकाल उद्या  जाहीर होणार आहे.

मल्टीस्टेट शेड्युल्ड दर्जा असलेल्या सोलापूर जनता सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या 17 सदस्यांची निवड करण्यासाठी रविवारी ( ता. 14 मार्च) मतदान झाले. मतदान कमी झाले तरीही सभासदांनी सत्ताधारी पॅनेललाच झुकते माप दिल्याचे मतमोजणी नंतर दिसून येत आहे. कारण विरोधी बचाव परिवाराचे उमेदवार आणि सत्ताधारी उमेदवार यांच्यात खूप मोठ्या मतांची तफावत दिसून येत आहे. यावरून मतदारांनी एकतर्फी मतदान करून सत्ताधाऱ्यांच्याच हातात पुन्हा सत्ता दिली आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

सोलापूर महापालिकेपासून 25 किलोमीटरचे क्षेत्रासाठी 10 संचालक, महापालिकेपासून 25 किलोमीटर बाहेरील क्षेत्रासाठी 4 संचालक, महिला प्रवर्गातून 2 संचालक आणि अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातून एक उमेदवार अशा एकूण 17 संचालकांची निवड सभासदांनी केली आहे.

* सभासदांनी मतदानाकडे फिरवली पाठ

वाढते ऊन आणि वाढता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदारांनी पर्यायाने बँकेच्या सभासदांनी मतदानाकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले होते. कारण बँकेचे सोलापूर एकूण 53 हजार 538 मतदार मतदानासाठी पात्र असतानाही अवघ्या 14 हजार 151 मतदारानांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. एकूण 26.43  टक्के मतदान झाले.

“परिवार पॅनलच्या माध्यमातून उच्चशिक्षित सेवाभावी, कर्तव्यदक्ष व प्रशासकीय अनुभव असणारे उमेदवार उभे केले होते. त्या सर्व उमेदवारांना मतदारांनी भरभरून मतदान करून प्रचंड बहुमताने निवडून दिलेे. रा.स्व.संघाच्या प्रेरणेतून व मार्गदर्शनाखाली निवडून आलेले सर्व उमेदवार चांगली कामगिरी करतील”

– किशोर देशपांडे, पॅनल प्रमुख, परिवार पॅनल

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #Solapur #JanataSahakariBank #againdominated #thefamilypanel, #सोलापूर #जनतासहकारी #बँकेवर #परिवार #पॅनलचेच #वर्चस्व
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article गृहराज्यमंत्री देसाई आणि उदयनराजेंच्या मैत्रीचा आणखी एक ‘किस्सा’
Next Article शहराच्या झोपडपट्टीभागात चालत होता कुंटणखाना; दोघा महिलांना अटक

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?