विष्णू सुरवसे
सोलापूर : बहुचर्चित सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, आता आखाडा चांगलाच तापत असून निवडणुकीमधील दोन्ही पॅनेलच्या नेतेमंडळींकडून हालचाली जोरकसपणे सुरु आहेत. जोर-बैठकांचा सिलसिला दिवस-रात्र सुरु आहे. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यासह माजी आमदार दिलीप माने तसेच कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे आदींच्या दृष्टीने ही निवडणूक प्रतिष्ठेची होत आहे. तर आमदार सुभाष देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख यांच्यासह सिद्धाराम म्हेत्रे, बळीराम साठे, बाळासाहेब शेळके आदींच्या बाजार समितीमधील अस्तित्वाची निवडणूक होत आहे. या अनुषंगाने, कल्याणशेट्टी पॅनलकडून फिल्डिंग लावली जात आहे. तर देशमुख पॅनलकडून सेटिंग सुरु आहे.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती च्या निवडणूकिस महत्व प्राप्त होताना दिसून येत आहे.आगामी जिल्हा परिषद व ग्रामपंचायत निवडणूकीची पूर्व तयारी म्हणून ओळख निर्माण होताना दिसून येत आहे. सन 2024- 2029 पंचवार्षिक निवडणूक साठी आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली माजी आमदार दिलीप माने,कॉंग्रेसचे नेते सुरेश हसापुरे यांनी बलाढ्य ताकदीच्या आधारे ‘फिल्डिंग’ लावली आहे. तर उत्तर,दक्षिण व अक्कलकोट तालुक्यात त्यांच्या हालचाली सुरु आहेत.
तर दुसर्या बाजूने सिद्धेश्वर परिवर्तन पॅनल मधून भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आमदार विजयकुमार देशमुख, बळीराम साठे, माजी आमदार सिद्धराम म्हेत्रे,एकनाथ शिंदे(शिवसेना)गटाचे जिल्हा अध्यक्ष मनीष काळजे यांना सोबत घेत सुभाष देशमुख यांनी सत्ता हाती घेण्यासाठी सेटिंग सुरू केली आहे. यामुळेच भाजप विरुद्ध भाजप असा लढाई बाजार समितीच्या निवडणुकीत पाहायला मिळत आहे. अक्कलकोटचे आमदार सचिन मार्गदर्शनाखाली सिध्देश्वर शेतकरी विकास पॅनलच्या माध्यमातून आजी माजी नेते निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत.
चौकट
अशी होत आहे टक्कर…
आमदार कल्याणशेट्टी पॅनल
* सहकारी संस्था सर्वसाधारण
नरोळे श्रीशैल बसवेश्वर, पाटील उदय ऊर्फ रेवणसिध्द चंद्रकांत,पाटील प्रथमेश वसंत,बनसोडे नागप्पा म्हाळप्पा,माने दिलीप ब्रह्मदेव, शिवदारे राजशेखर विरपाक्षप्पा,हसापुरे सुरेश सिद्रामप्पा,
* सहकारी संस्था महिला राखीव
अलगोंडा इंदूमती परमानंद, विभुते अनिता केदार.
* सहकारी संस्था इतर मागासवर्ग
मार्तंडे अविनाश श्रीधर,
* सहकारी संस्था विमुक्त जाती भटक्या जमाती
पाटोळे सुभाष रामचंद्र
* ग्रामपंचायत सर्वसाधारण-
पाटील संगमेश कल्लण्णा,वानकर गणेश प्रकाश
* ग्रामपंचायत अनुसुचित जाती अनुसुचित जमाती :
रोकडे रविंद्र पंडीत,
* ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल घटक
कळके सुनिल ब्रह्मानंद,
* व्यापारी मतदार संघ :
दोन जागेसाठी पाच उमेदवार रिंगणात आहेत मात्र पॅनलमध्ये जागा गेल्याने स्वतंत्र चिन्ह दिले आहे.
हमाल-तोलार मतदार संघ :
एक जागा असून विकास पॅनलकडून गफ्फार चांदा यांना उमेदवारी मिळाली आहे.व्यापारी संघटनेकडून वैभव बरबडे, मुस्ताक चौधरी हे आहेत.
———————————————-
* श्री सिध्देश्वर बाजार समिती परिवर्तन पॅनल
ग्रामपंचायत सर्वसाधारण
देशमुख मनिष सुभाष-सोलापूर,चिवडशेटटी रामप्पा चंद्रशेखर-होटगी,
*ग्रामपंचायत अनुसूचित जाती/जमाती-गायकवाड अतुल हरी-होटगी,
* ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल घटक-शहा यतीन विजयकुमार-भंडारकवठे,
* सहकारी संस्था – सर्वसाधारण
हविनाळे चन्नगोंडा गुरुसिध्दप्पा-बरुर,आसबे रमेश नामदेव-अकोले मंद्रुप,बबलेश्वर भिमाशंकर कलप्पा- भंडारकवठे,पाटील आप्पासाहेब मल्लीनाथ-वडकबाळ,पाटील बाळासाहेब दादाराव-विंचूर, पाटील संग्राम प्रतापराव-कौठाळी,अचलारे धनेश सुभाष-बोरामणी,
* सहकारी संस्था – महिला राखीव
पुजारी निलाबाई गुरप्पा-वडकबाळ,गुरव पुष्पा मल्लिकार्जुन-हणमगाव,
* सहकारी संस्था – इतर मागासवर्ग
तेली सुभाष गुरण्णा-होनमुर्गी,
*सहकारी संस्था – विमुक्त जाती, भटक्या जमाती-टेळे संदीप अमृत- औराद.
चौकट
मतदारांचे आकडे बोलतात…
* एकूण मतदार संख्या 5421
-व्यापारी मतदार संघ 1276,
-हमाल- तोलार मतदार 1084,
-ग्रामपंचायत मतदार संघ 1176,
– सोसायटी मतदार संघ- 1895 .
::::::::::::::::::
बाळासाहेब शेळके कडाडले
म्हणाले, कल्याणशेट्टींना विश्वासाने गळा कापला
उमेदवारीसंबंधी पत्ता कट झाल्यानंतर बाळासाहेब शेळके हे नाराज होते. दरम्यान त्यांनी शुक्रवारी प्रसारमाध्यमांपुढे आपली भूमिका मांडली. आमदार सचिन कल्याणशेट्टींनी आमचा विश्वास घात करीत केसाने गळा कापला. आम्ही आता आमदार सुभाष देशमुख पॅनलला पाठिंबा देण्याचे ठरवले आहे. या निवडणुकीसाठी आमदार सुभाष देशमुख आणि आमदार विजयकुमार देशमुख यांना साथ करणार आहोत. या निवडणुकीला मोठ्या ताकदीने सामोरे जाणार आहोत. आमदार सचिन कल्याणशेट्टी हे राहु अन् केतुला सहकार्य करीत आहेत, असेही बाळासाहेब शेळके म्हणाले.