सोलापूर, 10 जुलै (हिं.स.)। प्रसुतीसाठी आलेल्या महिलेला सुखरूप डिलिव्हरी होईल म्हणून दिवसभर गोलचावडी रुग्णालयात उपचाराविना थांबवून ठेवलेल्या महिलेचा बाळासह मृत्यू झाला. विवाहितेच्या पतीच्या तक्रारीवरून मेडिकल बोर्डाने त्यासंदर्भातील चौकशी केली. चौकशीअंती यात डॉ. सुनिता देगावकर यांची चूक असल्याची बाब समोर आली आणि त्यावरून त्यांच्याविरुद्ध आता जोडभावी पेठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेळगी परिसरातील जवाहर नगरातील समिनाला प्रसुतीकळा येत होत्या. त्यामुळे तिचे पती हारून नजीर बागवान यांनी तिला मंगळवार बाजारातील गोलचावडी रुग्णालयात ॲडमिट करून घेतले. त्यावेळी तिला नॉर्मल प्रसुती होईल, असे सांगण्यात आले होते. त्या दिवशी तिला दिवसभर रुग्णालयात थांबवून ठेवले, पण उपचार काहीही केले नाहीत. तिची प्रकृती चिंताजनक झाल्यावर समिनाला श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रूग्णालयात नेण्यास सांगितले.