सोलापूर, १८ ऑगस्ट – सोलापूर-मुंबई सीएसएमटी वंदे भारत एक्सप्रेस आता १६ ऐवजी २० डब्यांची धावणार आहे. चार डबे वाढल्यामुळे ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करू शकणार असून ही सुविधा २८ ऑगस्ट २०२५ पासून सुरू होणार आहे. या निर्णयामुळे सोलापूरहून मुंबई व पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांना वेटिंगची समस्या भेडसावणार नाही.
सोलापूर-मुंबई सीएसएमटी वंदे भारत एक्सप्रेस (२२२२६) ही १० फेब्रुवारी २०२३ रोजी सुरू झाली. प्रवाशांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने डबे वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ही गाडी आता मुंबईतून पुढे नाशिकरोड, मनमाड, संभाजीनगर, जालना आणि नांदेडपर्यंत धावणार आहे. तसेच नांदेडवरून येणारी वंदे भारत मुंबईमार्गे सोलापूरला येणार आहे.
सीएसएमटी मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस (२२२२५) ही २८ ऑगस्टपासून; तर सोलापूर-सीएसएमटी मुंबई वंदे भारत एक्सप्रेस (२२२२६) ही २९ ऑगस्टपासून २० डब्यांसह धावणार आहे.