सोलापूर, 8 एप्रिल (हिं.स.) : मनपा आयुक्त ऍक्शन मोडवर आले आहेत. मनपा आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी स्वतः फिल्डवर जात पाणीपुरवठा यंत्रणेची पाहणी केली. ओम्बासे यां शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाणी टाकीला भेट देत प्रत्यक्ष पाहणी केली आहे. तसेचं शहरात प्रत्यक्ष पाणी सोडणारे चावीवाले आणि नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आहेत.
यावेळी मनपा आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सुरळीत पाणीपुरवठा करण्यासंदर्भात सूचना दिल्या आहे. त्यानंतर मनपा आयुक्त सचिन ओम्बासे, अतिरिक्त आयुक्त रवी पवार, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्यासह पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली आहे.