Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापूर । डंपरच्या धडकेत चिमुकल्याचा जागीच मृत्यू, चार महिन्यात चौथा बळी; आणखी किती बळी घेणार ?
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

सोलापूर । डंपरच्या धडकेत चिमुकल्याचा जागीच मृत्यू, चार महिन्यात चौथा बळी; आणखी किती बळी घेणार ?

Surajya Digital
Last updated: 2023/01/22 at 9:32 PM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

□ छत्रपती संभाजी महाराज चौकातील घटना

सोलापूर : शहरात आज रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास अत्यंत दुर्दैवी घटना घडली. जुना पुना नाका छत्रपती संभाजी महाराज पुतळाजवळ अवजड डंपर खाली चिरडून एका १० वर्षाच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे. Solapur. Toddler dies on the spot in dumper collision, fourth victim in four months; Two killed in Pandharpur accident

Contents
□ छत्रपती संभाजी महाराज चौकातील घटनास्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा) 》 पंढरपूर | कंटनेर व दुचाकी धडकेत दोघे ठार

 

ही घटना इतकी भयानक होती की,पाहणाऱ्यांचे काळीज हेलावून गेले. याबाबत मिळालेली माहिती अशी की, श्रीपाद पवन कवडे (वय – १०) हा आपल्या आई, मुलगा व बहिणीसह शिवाजीनगर बाळे येथील पाहुण्यांच्या घरून शिंदे चौकातील आपल्या घरी एम.एच.१३.सी.व्ही.७९५६ या दुचाकीवरून परतत असताना पाठीमागून आलेल्या एम.एच.१३ सी.यु.४९८७ या डंपरने धडक दिली.

 

यात श्रीपाद पवन कवडे (वय-१०,रा.शिंदे चौक सोलापूर) याचा डंपरच्या पाठीमागील चाकाखाली येऊन जागीच मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळतात फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटना पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली. उपस्थित नागरिकांनी संताप व्यक्त करत चालकाला चोप दिला.

नागरिकांच्या गर्दीतून डंपर काढून पोलिसांनी डंपरसह चालकाला ताब्यात घेतले तर मुलांचा मृतदेह सोलापूर शहारातील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला. फौजदार चावडी पोलीस ठाण्यात तसेच सिव्हिल हॉस्पिटलमध्ये शिंदे चौकातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती. या घटनेची प्राथमिक नोंद सिव्हिल पोलीस चौकीत तसेच फौजदार चावडी पोलीस ठाण्यात झाली. डंपर चालकाच्या विरोधात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. तसेच हा डंपर कुणाचा आहे, कुठून आला, या डंपरला शहरात येण्याची परवानगी होती का याचा तपास पोलीस करीत आहेत.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

 

□ अश्रूंच्या धारा थांबत नव्हत्या

श्रीपाद हा अतिशय गुणी गुणवंत मुलगा अचानक असा निघून गेल्याने आई – वडिलांचा काळीज, मन हेलावून टाकणारा होता. आई वारंवार बेशुद्ध पडत होती. तर वडिलांच्या डोळ्यातील अश्रूच्या धारा थांबवत नव्हत्या. बहिण रडून – रडून हातबल झाली होती.

 

□ दमानी शाळेतील चौथीत होता श्रीपाद

 

 

श्रीपाद हा दमानी शाळेत इयत्ता चौथी मध्ये शिकत होता. लहानपणापासूनच तो विविध स्पर्धेत भाग घेऊन बक्षिसे मिळवत असल्याने आई-वडिलांना त्याचा अभिमान होता. शाळेत सुद्धा तो सर्व मुलांचा आणि वर्ग शिक्षकांचा आवडता विद्यार्थी होता. दि.१० डिसेंबर रोजी शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या स्पर्धेत त्याने प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळवले होते.

□ चार महिन्यात चार बळी; अजून डंपर किती बळी घेणार ?

 

गेल्या तीन – चार महिन्यात शहरात विविध ठिकाणी डंपरच्या धडकेने तीन ते चार बळी गेले आहेत. डंपर हा शहरात प्रवेश करताना अतिशय वेगात येतो. बऱ्याच वेळा डंपरमध्ये मोठ्या आवाजात गाणी लावलेले असतात. त्यामुळे चालकाचे गाडीवर नियंत्रण राहत नसल्याने डंपर आणखी किती बळी घेणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

 

》 पंढरपूर | कंटनेर व दुचाकी धडकेत दोघे ठार

पंढरपूर – तालुक्यातील सोनके गावा नजीक ट्रकने समोरून धडक दिल्यामुळे दुचाकी वरील एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसऱ्याच उपचारापूर्वी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (ता. 21) दुपारी घडली.

महूद रोडवर कंटनेर व दुचाकी मधील अपघात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला लोटेवाडी येथे म्हसोबा दर्शनासाठी गेलेल्या मनोज शिरगिरे व संदिप पवार या दुचाकास्वारींचा कंटेनरने उडवल्यावर जागीच मृत्यू झाला. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या युवकांचा मेंदू डोक्याबाहेर पडलेले चित्र थरकाप उडवणारे होते.

 

 

घटनास्थळी गर्दी, दुर्दैवी मृत्यू मुळे हळहळ व्यक्त केली जात होती. या अपघातात मनोज राजाराम शिरगिरे रा. अजनसोंड आणि संदीप हनुमंत पवार रा. खेडभोसे यांचा मृत्यू झाला आहे. मनोज हा आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास आपल्या दुचाकी (क्र. एम.एच. 45 क्यु. 9972 ) वरून पंढरपूरकडे येत होते तर महूद कडे जाणाऱ्या एम.एच.46 एच.4588 त्यांना समोरून जोरात धडक दिली.

 

यामध्ये मनोज हा खाली पडला असता त्याच्या डोक्यावरून ट्रकच चाक गेल्याने तो जागीच मयत झाला तर त्याचा मित्र संदीप हा जखमी झाला होता मात्र उपचाराला घेऊन जातानाच त्यांचा देखील मृत्यू झाला. घटनेनंतर ट्रक चालकाने तेथून पळ काढल्यामुळे त्याचा पोलीस शोध घेत आहेत.

You Might Also Like

सोलापूर : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत तारण ठेवलेले सोने निघाले बनावट

सोलापूर जिल्ह्यातील सरपंचांसाठी नव्याने आरक्षण सोडत काढली जाणार

सोलापूर : रुग्णालयात उपचाराविना थांबवून ठेवलेल्या नवजातासह आईचा मृत्यू

सोलापुरातील स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी

उजनीतून ३७ लाख युनिट वीजनिर्मिती

TAGGED: #Solapur #Toddler #dies #onthespot #dumper #collision #fourth #victim #fourmonths #Twokilled #Pandharpur #accident, #सोलापूर #डंपर #धडकेत #चिमुकल्याचा #जागीच #मृत्यू #चारमहिन्यात #चौथा #बळी #पंढरपूर #अपघात #दोनठार
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article ऊस तोडणी, वाहतूक खर्चाबाबत अभ्यास गट; साखर आयुक्तांचे आदेश
Next Article आंबेडकर – ठाकरे यांनी जाहीर केली युती; शरद पवारही होतील सामील

Latest News

कपिल शर्माच्या हॉटेलवरील हल्ल्यात खलिस्तानी दहशतवाद्यांचा हात
देश - विदेश July 11, 2025
अमेरिकेकडून लेखी हमी मिळेपर्यंत अणु चर्चा नाही -इराण
देश - विदेश July 11, 2025
गुजरात पूल दुर्घटना : मृतांचा आकडा १७ वर तर ३ जणांचा शोध अजूनही सुरू, ४ अधिकारी निलंबित
देश - विदेश July 11, 2025
सोलापूर : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत तारण ठेवलेले सोने निघाले बनावट
सोलापूर July 10, 2025
सोलापूर जिल्ह्यातील सरपंचांसाठी नव्याने आरक्षण सोडत काढली जाणार
सोलापूर July 10, 2025
crime
सोलापूर : रुग्णालयात उपचाराविना थांबवून ठेवलेल्या नवजातासह आईचा मृत्यू
सोलापूर July 10, 2025
पावसाळ्यात वाढला डेंग्यूचा धोका; सहा महिन्यात २८७ जणांना डेंग्यूची लागण
महाराष्ट्र July 10, 2025
सोलापुरातील स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी
सोलापूर July 10, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?