Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापूर । पी. शिवशंकर यांच्या बदलीने कामगार संघटनेत आनंद, आणले फटाके
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

सोलापूर । पी. शिवशंकर यांच्या बदलीने कामगार संघटनेत आनंद, आणले फटाके

Surajya Digital
Last updated: 2022/11/17 at 7:50 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

□ नव्या आयुक्तपदी शितल तेली-उगले यांची नियुक्ती

सोलापूर : महापालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर यांची अखेर नागपूर येथे वस्त्रोद्योग संचालक या पदावर बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी श्रीमती शितल तेली-उगले (भाप्रसे) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. Solapur. P. Shiv Shankar’s transfer brought joy, fireworks and  sheetal telli in the trade union 

 

 

राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव (सेवा) नितीन गद्रे यांनी तसे आदेश काढले आहेत. त्यानंतर सोलापूर महापालिकेचे बहुचर्चित आयुक्त पी शिवशंकर यांची अखेर बदली झाली आहे. नागपूर येथे वस्त्रोद्योगचे संचालक या पदावर श्रीमती शितल तेली-उगले (भाप्रसे) यांच्या जागी ते पद कनिष्ठ प्रशासकीय श्रेणीत अवनत करून केली आहे.

 

पी. शिवशंकर

 

सध्याच्या पदाचा कार्यभार नगर विकास विभागाचे प्रधान सचिव (२) यांच्या सल्ल्याने अन्य अधिका-याकडे सोपवून नवीन पदाचा कार्यभार त्वरीत स्वीकारावा , असे आदेशात म्हटले आहे.नागपूर येथे वस्त्रोद्योगचे संचालक श्रीमती शितल तेली-उगले (भाप्रसे) यांची सोलापूरचे महापालिका नवे आयुक्त म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

 

महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी सोलापूर शहरात स्मार्ट सिटीच्या माध्यमातून सोलापूरचा चेहरा मोहरा बदलला होता, शिवाय अन्य विकास कामे प्राधान्याने करून नागरिकांची मने जिंकली होती.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

पालिकेत फटाके उडवताना कामगार संघटनेचे अशोक जानराव आणि पोलिसांमध्ये वादावादीचा प्रसंग निर्माण झाला. पालिका आयुक्तांची बदली झाल्यानंतर महापालिका कामगार संघटना कृती समितीचे अशोक जानराव यांनी पालिकेच्या आवारात फटाके आणले होते. त्यावेळी पोलिसांनी त्यांना अटकाव केला. एक कामगार संघटनेचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये थोडवेळ वादावादीचा प्रसंग निर्माण झाला. वादावादी नंतर संबंधित पोलिसांनी आणखी पोलिसांची जादा कुमक पालिका आवारात मागून घेतली.

 

शीतल तेली – उगले

 

आयुक्त पी शिवशंकर यांचे मिळकत कर रिविजन, सार्वजनिक नळ तोड मोहीम, कर्मचाऱ्यांवर कारवाई यासह काही निर्णय वादग्रस्त ठरले होते. दरम्यान काही महिन्यापूर्वी महापालिका कामगार संघटना कृती समितीच्या वतीने कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर आयुक्त पी शिवशंकर यांच्या बदलीसाठी मोर्चाही काढला होता. अनेक वेळा पी शिवशंकर यांची बदली झाल्याची अफवा उठत होती. अखेर आज गुरुवारी शासनाने त्यांच्या बदलीचे आदेश काढले आहेत.

 

□ प्रशासकीय राजवटीत 374 केले ठराव

सोलापूर महापालिकेत प्रशासकीय राजवट सुरू आहे. दरम्यान या राजवटीत आतापर्यंत 374 एकूण ठराव  महापालिका आयुक्त शिवशंकर यांच्या काळात झाले.

सोलापूर महापालिकेत लोकप्रतिनिधींची मुदत मार्च महिन्यामध्ये संपली. त्यानंतर प्रशासकीय राजवट सुरू झाली. प्रशासक म्हणून महापालिका आयुक्त पी शिवशंकर हेच जबाबदारी पार पाडली. मार्च ते आत्तापर्यंत झालेल्या प्रशासकीय उपसमितीच्या बैठकांमध्ये एकूण 374 ठराव करण्यात आले.

यामध्ये सर्वसाधारण विषयी 184  ठराव करण्यात आले. स्थायीचे – 141 , स्थापत्यचे – 18 आणि परिवहनचे – चार असे एकूण 374 ठराव करण्यात आले आहेत. प्रशासकीय कारकीर्दीत पाणी मीटर, बिलिंग, रिविजन यासह विविध वैशिष्ट्यपूर्ण कामांना गती देण्यात आली. मोठे 33 विकास कामांचा यामध्ये समावेश आहे, असेही महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी सांगितले.

You Might Also Like

डॉ. वळसंगकर प्रकरण : २५ दिवस लोटले तरी पोलिसांच्या हाती काहीच नाही

सोलापुरात आतापासूनच बेरजेचे राजकारण सुरू

सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळ संपविण्यासाठीच खासदार झाले – प्रणिती शिंदे

सोलापूरात गुटखा मिळतोय सर्रास दुकाने-टपर्‍यांवर

भारतीय सैन्यदलापुढे पाकला गुडघे टेकावे लागले – प्रणिती शिंदे

TAGGED: #Solapur #PShivShankar's #transfer #brought #joy #fireworks #sheetalteli #ugale #tradeunion, #सोलापूर #पीशिवशंकर #बदली #कामगार #संघटना #आनंद #फटाके #शीतलतेली #उगले
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article दुचाकीस ट्रॉलीची धडक; मामासोबत गावी जाण्यास निघालेल्या भाचीचा मृत्यू
Next Article लांबोटी नदीत रक्षा विसर्जनासाठी गेले असता आढळला महिलेचा मृतदेह

Latest News

रवींद्र जाडेजा आयसीसी कसोटी अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत पहिल्या क्रमांकावर राहणारा पहिला खेळाडू
देश - विदेश May 14, 2025
महाराष्ट्रातील खाद्य संस्कृती जगभरात पोहोचण्याची गरज : विष्णू मनोहर
महाराष्ट्र May 14, 2025
ऑस्कर विजेते हॉलीवूड दिग्दर्शक रॉबर्ट बेंटन यांचे निधन
देश - विदेश May 14, 2025
रेशनकार्डसाठी लाच घेणाऱ्या पुरवठा अधिकाऱ्यास पकडले, खासगी एजंटही जाळ्यात
महाराष्ट्र May 14, 2025
राज ठाकरेंच्या प्रस्तावाला आमचा आजही सकारात्मक प्रतिसाद – संजय राऊत
राजकारण May 14, 2025
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत करा – हर्षवर्धन सपकाळ
महाराष्ट्र May 14, 2025
सातार्‍यात ‘टेस्ला’चे युनिट येणार; जिल्ह्याच्या विकासाला चालना
महाराष्ट्र May 14, 2025
पाकिस्तानच्या वेबसाईट सर्च केल्याच्या संशयावरून मालेगावचा तरुण ताब्यात
महाराष्ट्र May 14, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?