Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याची घटना; सोलापूर पोलिसांनी वाटेतच पकडले
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
गुन्हेगारीसोलापूर

अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याची घटना; सोलापूर पोलिसांनी वाटेतच पकडले

Surajya Digital
Last updated: 2020/11/20 at 10:28 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

सोलापूर : येथील तरटी नाका पोलिस ठाणे परिसरातून एका अल्पवयीन मुलीला स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेल्या कामांसाठी आलेल्या परप्रांतीय कामगारांनी पळवून नेल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. फौजदार चावडी पोलिसांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी मध्य प्रदेशातील दोघांना अल्पवयीन मुलीसह इंदूरला जाताना वाटेतच पकडले असून, त्यांना सोलापूरला आणले जात आहे.

शहरात सध्या ठिकठिकाणी सुरू असलेल्या स्मार्ट सिटी अंतर्गत कामांवर परप्रांतीय कामगार काम करत आहेत. शहरातील तरटी नाका येथेही स्मार्ट सिटीचे काम सुरू आहे. दरम्यान, गुरुवारी (ता. 19) सायंकाळी सातच्या सुमारास या परप्रांतीय कामगारांपैकी तिघांनी येथील एका अकरा वर्षाच्या मुलीला घेऊन मालट्रकमधून इंदूरच्या दिशेने निघाले. आपली मुलगी घरात नसल्याचे लक्षात आल्यानंतर अल्पवयीन मुलीच्या आईवडिलांनी तिचा शोध घेतला, मात्र ती कुठेच सापडली नाही. तेव्हा ती मुलगी तिथे काम करणाऱ्या कामगारांसोबत दिसली होती, असे काहीजणांनी सांगितल्याने तिच्या आईवडिलांनी तत्काळ फौजदार चावडी पोलिस ठाणे गाठले.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

लगेच फौजदार पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र बहिरट यांनी पथक तयार करून मोबाईल लोकेशनच्या साहाय्याने धुळे गाठले. पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास एका महिलेसह दोघांना अटक केली. अल्पवयीन मुलीसह तिघांना सोलापुरात आणले जात आहे.

* स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत जुळले प्रेम

स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत सोलापूर शहरात ड्रेनेज पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू आहे. या कामासाठी मध्य प्रदेशातून काही कामगार सोलापुरात आले आहेत. तरटी नाका पोलिस चौकीच्या परिसरात पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू आहे. मागील दीड महिन्यापासून एकाच ठिकाणी काम करणाऱ्या त्या कामगार असलेल्या मुलाची ओळख त्याच परिसरातील अल्पवयीन मुलीसोबत झाली. या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. काम आता काही दिवसांत संपणार असल्याने त्या मुलाने मुलीसोबत पळून जाण्याचा डाव आखला होता.  त्यानुसार पळही काढला.  मात्र मुलीच्या घरच्यांनी वेळेत पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी चक्रे हालवून ताब्यात घेतले.

You Might Also Like

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article ठाकरे परिवाराचा व्यवसाय कोणता ? मुख्यमंत्री ठाकरेंनी स्पष्टीकरण द्यावे
Next Article कार्तिकी एकादशीला दिंड्यांना परवानगी नाहीच, दिंड्या मार्गस्थ होणार नाहीत

Latest News

पहिली ते चौथी हिंदी भाषा नसावी – उपमुख्यमंत्री पवार
Top News June 27, 2025
गुजरात : जगन्नाथ रथयात्रेत बिथरले हत्ती, अनेक जखमी
देश - विदेश June 27, 2025
आषाढी एकादशीनिमित्त पुणे विभागातून आणखी तीन विशेष रेल्वे
Top News June 27, 2025
उबाठा कामगार सेनेचे डॉ.काकडे यांचा रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश
महाराष्ट्र June 27, 2025
युद्धबंदीनंतरही इस्रायलचा इराणला त्यांचे युरेनियम परत करण्याचा इशारा
देश - विदेश June 27, 2025
युद्धविरामानंतर खामेनी यांचा इस्रायल विरुद्धच्या युद्धात विजयाचा दावा
देश - विदेश June 27, 2025
तळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिला – डॉ. जब्बार पटेल
महाराष्ट्र June 27, 2025
पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला
महाराष्ट्र June 27, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?