Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पिण्याच्या पाण्यासाठी महापालिकेसमोर मटकाफोड आंदोलन, तोंडाला काळे फासण्याचा इशारा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

पिण्याच्या पाण्यासाठी महापालिकेसमोर मटकाफोड आंदोलन, तोंडाला काळे फासण्याचा इशारा

Surajya Digital
Last updated: 2023/05/26 at 5:03 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा) 》 पत्रकारांच्या गृहप्रकल्पास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट, सहकार्याचे आश्वासन

सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या – ढिसाळ नियोजनामुळे शहरात वारंवार पिण्याच्या पाण्याची टंचाई होत आहे. महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी शहरात नाहीत. या पाणीटंचाईचा सोलापूर शहर युवक काँग्रेसच्यावतीनं आज पालिकेसमोर मडकी फोडून निषेध केला. Solapur, protest against drinking water in front of municipal corporation Solapur warning of black face

येत्या आठ दिवसात पाणी पुरवठा सुरळीत न केल्यास संबंधितांना अधिकाऱ्यांना काळे फासु, असा इशाराही युवक काँग्रेसने दिला.

काल गुरुवारी सोलापूर दौऱ्यावर आलेल्या उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी पाण्याच्या प्रश्नावर लक्ष न घालता नवीन इमारती उद्गाटन याकडेच लक्ष दिले. राज्यकर्त्यांना पाणी प्रश्नाचं गांभिर्य नाही का? असा सवाल युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष गणेश डोंगरे यांनी उपस्थित केला.

प्रवेशद्वारासमोर नाकर्त्या भाजप आणि प्रसाशनाच्या विरोधात बोंबाबोंब करून मटकाफोड़ आंदोलन करण्यात आले.  यावेळी नागरिक त्रस्त मंत्री उद्घाटनात व्यस्त, नाकर्त्या भाजप सरकारचा निषेध असो, पाणी दया नाही तर खुर्च्या खाली करा, अश्या जोरजोरात घोषणाबाजी करण्यात आली.

यावेळी श्रीकांत वाडेकर, प्रविण जाधव, विश्वराज चाकोते,तिरुपती परकीपंडला, महेश लोंढे, शरद गुमटे, समीर काझी, दाऊद नदाफ, किरण राठोड, आकाश भोसले, निखील पवार आदी पदाधिकारी उपस्थित होते.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

》 पत्रकारांच्या गृहप्रकल्पास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट, सहकार्याचे आश्वासन

 

सोलापूर : पत्रकारांसाठी साकारत असलेला गृहनिर्माण प्रकल्प लवकरच पूर्ण होण्यासंदर्भात संबंधितांना सूचना देऊन आपण सर्वतोपरी मदत करू, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापुरात दिली.

 

गुरुवारी (ता. २५), फडणवीस सोलापूर दौऱ्यावर होते. महसूल भवनाच्या उद्घाटनानंतर ते हुतात्मा स्मृती मंदिर येथे महापालिकेने आयोजित केलेल्या कामासाठी मार्गस्थ होत असताना भाजपचे ‘प्रदेश सदस्य शहाजी पवार यांनी आग्रह केल्यानंतर त्यांनी विजापूर रस्त्यावर पत्रकारांसाठी उभारण्यात येत असलेल्या प्रकल्पाला धावती. भेट दिली.

यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, शहाजी पवार हे उपस्थित होते. यावेळी फडणवीस यांनी प्रकल्पाची माहिती जाणून घेतली. हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण होण्याबाबत संबंधित विभागाला सूचना देऊ आणि शासन या प्रकल्पाच्या परिपूर्तीसाठी निश्चितच सहकार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

भूमिपूजन समारंभाला आपण उपस्थित होतो, याची आठवण विखे-पाटील यांनी यावेळी करून दिली.

 

श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांनी प्रकल्पाबाबत सविस्तर माहिती दिली. पत्रकारांसाठी मंजूर केलेला हा राज्यातील पहिला गृहप्रकल्प असून त्याचे भूमिपूजन आपल्याच हस्ते झाले आहे. या घराच्या चाव्याही आपल्याच हस्ते आम्हाला मिळाव्यात, अशी अपेक्षा त्यांनी फडणवीस यांच्याकडे व्यक्त केली.

You Might Also Like

भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर

भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत

सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल

पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर

मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या

TAGGED: #Solapur #smc #protest #drinkingwater #front #municipalcorporation, #warning #blackface, #पिण्याच्या #पाणी #महापालिका #मटकाफोड #आंदोलन #तोंडाला #काळे #फासण्याचा #इशारा #युवककाँग्रेस #सोलापूर
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article पत्नीच्या अनैतिक संबंधाला कंटाळून पतीची आत्महत्या; पत्नीसह चार जणावर गुन्हा दाखल
Next Article जून – जुलैमध्ये शिक्षक भरती; ‘अंतरिम’नंतर संचमान्यता होणार अंतिम

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?